इक्रिसॅट तंत्रज्ञान | भुईमुग | ICRISAT in Groundnut crop |

इक्रिसॅट तंत्रज्ञान



भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे प्रामुख्याने 3 हंगाम आहेत. खरिपामध्ये भुईमूगाखालील क्षेत्र उन्हाळी भुईमुगाच्या पेक्षा अधिक असते. 

 

 *भुईमुगामध्ये वापरले जाणारे इक्रिसॅट पद्धत:-*


 भुईमूग लागवडीच्या या पद्धतीस गादीवाफा सरी पद्धत असे म्हणतात. या पद्धतीत प्रत्येक मीटरवर 30 सेंटीमीटर रुंदीची सरी सोडावी म्हणजे 70 सेंटीमीटर चा रुंद वरंबा तयार होईल. त्यावर वीस सेंटीमीटर अंतरावर चार ओळी पाडून भुईमुगाचे बी टोकण लागवड करतात.


इक्रिसॅट पद्धतीच्या रुंद गादी वाफ्यावर पेरणी केल्याने मऊ व भुसभुशीत वरब्यामध्ये मुळांची वाढ व शेंगांचे पोषण उत्तम होते. जास्तीचे पाणी निचरा होऊन बाजूच्या सार्‍यातून शेता बाहेर जाते. रुंद वरंबावर बी टोकन करण्यापूर्वी  खत मात्रा पेरून द्यावी. त्यानंतर पाणी देऊन वाफे ओलसर करून शिफारशीत तणनाशकाची फवारणी करू शकता. त्यानंतर वाफ्यावर पॉलिथिन शीट अंथरून बसवले जाते.पॉलिथिनला वीस सेंटीमीटर ओळीतील अंतर ठेवून दोन रोपांना देखील 20 सेंटिमीटर अंतरावर चार सेंटीमीटर व्यासाची छिद्रे तयार केले जातात. सत्य छिद्राच्या ठिकाणी दोन बिया टाकल्या जातात.पॉलिथिनची रुंदी 90 ते 95 सेंटिमीटर असते आणि रुंद वरंबा यावर 70 सेंटिमीटर ठेवून उर्वरित पॉलिथिनच्या दोन्ही बाजू सरीच्या खोबणीत मातीत दाबावेत.त्यामुळे फिल्म सरकत नाही.गादीवाफा उताराला आडवे असावेत.


*भुईमूग लागवडीच्या इक्रिसॅट पद्धतीचे फायदे:-*


* जास्त झालेले सरीतील पाणी काढून देता येते किंवा पाणी द्यायचे झाल्यास सरी तून देता येते.

* पाण्याचा निचरा चांगला होतो.

* मुळांच्या जवळ हवा खेळती राहते.

* ओळीतील रोपांना चांगला सूर्यप्रकाश मिळतो.

* भुसभुशीत मातीत शेंगा चांगल्या पोसतात.

* उत्पन्नात दोन ते तीन पट वाढ होते.

संदर्भ-कृषी जागरण 



एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest