पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कपाशी पिकावर येणाऱ्या बोंडअळ्यांचे प्रकार | Types of bollworms on cotton crop

इमेज
  कापूस पिकावर मुख्यत्वे 16 प्रकारच्या किडी आढळून येतात.त्यापैकी 3 प्रकार हे बोंडअळीचेच आहेत. तर कोणकोणत्या प्रकारच्या बोंडअळ्या कापसावर येतात त्या ओळखाव्या कश्या आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे याचा आढावा घेऊयात. ● *घाटेअळी/कॉटन बॉल वर्म(Helicovorpa armigera)* कापसातील हिरवी बोंडअळी म्हणजेच हरभऱ्यातील घाटेअळी आणि तूर तसेच सोयाबिनातील शेंगा पोखरणारी अळी होय. लागवडीनंतर 75 ते 110 दिवसापर्यंत दिसून येतात. * जीवनचक्र: -* ही कीड पतंग-अंडी-अळी-कोष आणि पुन्हा पतंग या अवस्थेतून आपले जीवनचक्र पूर्ण करते.एक मादी पतंग एका वेळी 250 ते 300 अंडी देते यातील अळी अवस्था पिकास नुकसान करते.एक ते दीड महिन्यात जीवनचक्र पूर्ण होते आणि एका वर्षात 10 ते 12 पिढ्या जन्माला येत येतात आणि कापूस सोडून बाकीच्या पिकावर सुद्धा उपजीविका करत असल्याने या किडीवर नियंत्रण मिळवणे खुप कठीण होतेय. इतर पिके :- सोयाबीन,तूर,भेंडी,मिरची,तंबाखू,भुईमूग,टोमॅटो,मक्का, ज्वारी आणि इतर 80 पिके * ओळखावे कसे ?* ●किडीचा पतंग दुधी पांढऱ्या व थोडा राखाडी रंगाचा असतो. ●अळी पूर्ण हिरवी असते,कधीकधी वातावरणातील बद

कामगंध सापळा (फेरोमोन ट्रॅप) | Pheromone Trap | सापळयाचे फायदे |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱    एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगँध सापळे महत्वाची भूमिका बजावतात.जे कीटकनाशकांवर होणारा खर्च कमी करून प्रभावी किटव्यवस्थापन करतात.  कामगंध सापळे समजून घेण्याआधी किडीचे जीवनचक्र जाणून घेतले पाहिजे. विविध किडी प्रामुख्याने पतंग-अंडी-अळी-कोष आणि पुन्हा पतंग या चार अवस्थेत आपले जीवनचक्र पूर्ण करतो. त्यामधील पतंग अवस्था सापळ्याकडे आकर्षित होते.परिणामी परिसरातील पतंग मोठ्या प्रमानात पकडून पुढे घातली जाणारी अंडी थांबवली जातात. 👇कामगंध सापळ्यात दोन महत्वाचे भाग असतात👇 ●ल्युर ●सापळा ●ल्युर :-किडीचे पतंग विरुद्धलिंगी पतंगासोबत संवाद साधण्यासाठी विशिष्ट प्रकारचा वास आपल्या शरीरातून सोडतात. तोच वास कृत्रिम रित्या एखाद्या रबर,प्लास्टिक ट्यूब किंवा लाकडी ब्लॉक मध्ये समाविष्ट करून त्या किडीस आकर्षित केले जाते.अश्या वस्तुंना ल्युर(प्रलोभन) म्हणतात.  *ल्युर मध्ये नेहमी मादी पतंगाचा वास असतो,परिसरातील सर्व नर पतंग त्या वासाकडे आकर्षित होऊन सापळ्यात  अडकतात परिणामी त्याचे मादीसोबतचे मेटिंग थांबते.*  *एक मादी एकावेळी 250-300 अंडी देते व आपल्या जीवनात 1000-1500 इतक्या मोठ्या प्रमानात अंड

ऊसामधील कांडी कीड। Sugarcane Internode Borer | एकात्मिक व्यवस्थापन ।

इमेज
 IPM SCHOOL ऊसामधील कांडी कीड(Sugarcane Internode Borer) ऊस पिकामध्ये विविध प्रकारच्या साधारणपणे २८८ किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यातील सुमारे २४ किडींमुळे ऊस उत्पादनात सुमारे १५ ते २० टक्के, तर साखर उताऱ्यात २ टक्क्यांपर्यंत घट येते. उसामध्ये कांडे कीड (Internode Borer) आणि खोडकीड या दोन प्रमुख किडींचा अधिक प्रादुर्भाव आढळून येतो. कांडे किडीमुळे ऊस उत्पादनात ३५ टक्के, तर साखर उताऱ्यात २.९ ते ३ टक्क्यांपर्यंत घट येते. तर खोडकिडीमुळे ऊस उत्पादनात ३३ टक्के आणि साखर उताऱ्यात १ ते १.५ टक्क्यापर्यंत घट येते. जीवनक्रम:- अंडी- * पानाच्या दोन्ही बाजूंस मध्य शिरेलगत तसेच पानाच्या आवरणावरदेखील ८ ते १० बॅचमध्ये पुंजक्यात आढळतात. * अंड्याच्या एका पुंजक्यामध्ये १० ते ८० अंडी आढळतात. * नुकतीच दिलेली अंडी चपटी, अंडाकृती, चमकदार व पांढरी मेणचट असतात. * एक मादी पतंग ४०० पर्यंत अंडी देऊ शकते. अळी:-* अंड्यामधून ५ ते ७ दिवसांत अळी बाहेर पडते. * अळी २.५ सेंमी लांब, तपकिरी डोके, पांढऱ्या रंगाची असून शरीरावर ४ नारंगी रंगाचे पट्टे असतात. सुरुवातीला पानांवर उपजीविका करते. नंतर उसाच्या कांड्याला छिद्र पाडण्याला

कीटकनाशकांचा PHI | पीक काढणी पूर्व प्रतीक्षाकाळ | PHI of Insecticides |

इमेज
कीटकनाशकांचा PHI(पीक काढणी पूर्व प्रतीक्षाकाळ)काय असतो?तो कसा ओळखावा कीडनाशकाच्या प्रत्येक लेबल क्लेममध्ये म्हणजे त्याच्या शिफारशींच्या तक्त्यामध्ये एक कॉलम असतो तो पीएचआयचा. पीएचआय म्हणजे शेवटची फवारणी ते पीक काढणी यांच्यातील कालावधी किंवा फवारणीचा काढणीपूर्व प्रतीक्षाकाळ (PHI). कोणतेही कीडनाशक जेव्हा वापरले जाते, तेव्हा त्या संबंधित पिकावर त्याचे अवशेष हे राहतातच. मात्र हे अवशेष किती प्रमाणात राहावेत (जेणेकरून मानवी आरोग्यासाठी ते धोकादायक राहणार नाहीत) त्याची एक मर्यादा ठरवून दिली आहे. पीक काढणी करण्यापूर्वी फवारणी केव्हा थांबवावी जेणेकरून या मर्यादेपेक्षा (एमआरएल) जास्त अवशेष राहणार नाहीत, तो कालावधी किंवा दिवस म्हणजेच पीएचआय (PRE HARVEST INTERVAL ). या गोष्टी देखील शेतकऱ्यांनी विचारात घ्याव्या जेणे करून कीटकनाशक अवशेष विरहित शेतीमाल उत्पादित करून त्याची गुणवत्ता व भाव दोन्ही वाढेल. एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇 https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

कीटकनाशकांचे लेबल क्लेम म्हणजे काय? | Label Claim of Pesticides |

इमेज
कीटकनाशक किंवा तणनाशकांचे लेबल क्लेम म्हणजे काय? जेव्हा आपण एखादे किटकनाशक, तणनाशक किंवा बुरशीनाशक जेव्हा खरेदी करतो. तेव्हा त्याच्यासोबत एक माहितीपत्रक सोबत जोडलेले असते. त्या माहितीपत्रकावर त्याचे मार्केट नाव, रासायनिक संरचना,मुख्यतः कोणत्या पिकावर वापरायचे, कोणत्या किडीवर नियंत्रण मिळवते, आंतरप्रवाही, स्पर्षजन्य, पोटविष यापैकी कोणत्या प्रकारात मोडते. फवारणी नंतर किती कालावधी नंतर पीक काढणी करावी(PHI). ही सर्व माहिती त्यावर दिलेली असते. तर लेबल क्लेम म्हणजेच काय उत्पादित किटनाशक कोणत्या पिकासाठी, कोणत्या किडीसाठी, किती प्रमाणात शिफारसीत आहे याचे प्रमाणपत्र होय,ज्यावरून वापरकर्त्यास उत्पादनाची हमी व पडताळणी करता येते. लेबल क्लेम मंजूर कोण करते? एखादे नवीन कीटनाशक संशोधित होते तेव्हा त्या रसायनाची सर्व स्तरावर चाचण्या पार पडतात व वर्षातील विविध हंगामात पडताळणी होते,या चाचण्या व्यतिरिक्त पर्यावरणासाठी हे उत्पादन किती सुरक्षित आहे या त्याच्या विषारीपणाबाबतीत चाचण्या घेतल्या जातात.त्यानंतर अहवाल केंद्रीय कीटनाशक मंडळ आणि नोंदणी समिती,फरीदाबाद,हरियाणा या केंद्रीय पडताळणी मंडळाकडे सादर केला

जैविक खतांचे महत्व व फायदे | Importance and benefits of organic fertilizers

इमेज
  आपण वापरलेल्या जैविक खतांचे महत्व व फायदे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जिवाणूचा वापर करता येतो, त्याला *'जैविक खत'* असे म्हणतात. सूक्ष्म जिवाणू सेंद्रिय पदार्थाच्या जलदरीत्या विघटनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. म्हणून मातीची सुपीकता तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी या सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जैविक खते पर्यावरण पूरक आहेत. जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविक सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य तसेच जिवाणूजन्य रोगांचे देखील नियंत्रण होते. जैविक खतांमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन रसायनासाठी लागलेला खर्च सुद्धा कमी होतो. जमिनीचा पोत सुधारतो तसेच पेरणीपूर्वी जैविक खतांद्वारे बीजप्रक्रिया केल्यास बियाणांची उगवणक्षमता वाढते. तसेच १५ ते २० टक्के उत्पादनात वाढ होऊन उत्पादन खर्च कमी होतो. जिवाणू खत संपूर्ण सेंद्रिय व सजीव असल्याने त्यामध्ये कोणताही उपायकारक टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नसतो. * जैविक खतांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत* * अ. नत्र स्थितीकरण करणारे जिवाणू* रायझोबिअम - हे जिव

कीटकनाशकांपासून विषबाधा होऊ नये याची काळजी | Be careful not to get poisoned by pesticides

इमेज
आपण पिकात येणाऱ्या विविध किडींसाठी अनेक प्रकारची कीटकनाशके वापरत असतो. किटकनाशक फवारत असताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्ष्यात घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे कारण 2018 साली यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा किटकनाशक हाताळणी व फवारणी वेळी मृत्यू झाला.त्यामुळे कीटकनाशक हाताळणी व फवारणी काळजीपूर्वक करणे खूप महत्वाचे आहे. किटकनाशक खरेदी केल्यानंतर बिल व लेबल क्लेम व्यवस्थित वाचावे. फवारणीसाठी जे प्रमाणित मापक आहे त्याप्रमाणात किटकनाशक वापरावे.अतिवापर टाळावा. दोन प्रकारची किटकनाशके शक्यतो एकत्र मिसळू नयेत कारण रसायन एकत्रीकरणामुळे वेगळी प्रक्रिया होऊन परिणामकारता कमी येऊ शकते,योग्य तो सल्ला घेऊन दोन कीटकनाशके एकत्र करावीत. फवारणी आधी स्प्रे पंपाची तपासणी करून घ्यावी,गळके किंवा मोडके स्प्रे वापरू नयेत. फवारनी सकाळी ऊन कमी असताना किंवा संध्याकाळी घ्यावी,भर उन्हात फवारणी करणे टाळावे. कीटकनाशक नेहमी वाऱ्याच्या दिशेने फवारावे,उलट दिशेने फवारल्यास हवे द्वारे कीटकनाशक नाका तोंडात जाण्याची शक्यता असते. फवारणीवेळी धूम्रपान टाळावे,तसेच फवारणी बालकांवर सोपवू नये. रिक

आर्थिक नुकसान पातळी /Economic Injury level (EIL) | आर्थिक उंबरठा पातळी /Economic threshold level (ETL)

इमेज
  *आर्थिक उंबरठा पातळी* /Economic threshold level (ETL) *आर्थिक नुकसान पातळी* /Economic Injury level (EIL) ह्या दोन्ही संकल्पना एकात्मिक किट व्यवस्थापनातील महत्वाचा भाग आहेत,पण या वर शेतकरी कधी डोळसपणे विचार करत नाहीत कारण मूळ संकल्पना माहीत नसणे किंवा अपूर्ण माहिती असणे. एखादी कीड आपल्या शेतामध्ये दिसून येताच,तेव्हा आपण लगेच त्यावर कीटकनाशक फवारणी चालू करतो त्या किडीचे पिकातील प्रमाण किती याचा विचार होत नाही व विनाकारण कीटकनाशकांचा खर्च वाढतो. *आणि म्हणूनच पिकातील किडींची आर्थिक उंबरठा पातळी व आर्थिक नुकसान पातळी अभ्यासणे व त्यानुसार पिकातील किडीवर नियंत्रण ठेवून उत्पादन खर्चात बचत करणे गरजेचे आहे.* * आर्थिक उंबरठा पातळी /Economic threshold level (ETL):-* अशी वेळ जेव्हा पिकातील किडीची संख्या,पिकाचे आर्थिक दृष्ट्या नुकसान करण्याचे संकेत देते म्हणजेच त्यावेळी तुम्हाला त्या किडीवर नियंत्रण उपाय करण्यास सुरवात करणे गरजेचे असते. म्हणजेच काय ह्या स्थितीमध्ये किडीला आर्थिक नुकसान पातळीपर्यंत जाण्यापासून रोखणे खुप गरजेचे असते. *आर्थिक नुकसान पातळी /Economic Injury level (E