आर्थिक नुकसान पातळी /Economic Injury level (EIL) | आर्थिक उंबरठा पातळी /Economic threshold level (ETL)

 

  1. *आर्थिक उंबरठा पातळी* /Economic threshold level (ETL)
  2. *आर्थिक नुकसान पातळी* /Economic Injury level (EIL)
  • ह्या दोन्ही संकल्पना एकात्मिक किट व्यवस्थापनातील महत्वाचा भाग आहेत,पण या वर शेतकरी कधी डोळसपणे विचार करत नाहीत कारण मूळ संकल्पना माहीत नसणे किंवा अपूर्ण माहिती असणे.
  • एखादी कीड आपल्या शेतामध्ये दिसून येताच,तेव्हा आपण लगेच त्यावर कीटकनाशक फवारणी चालू करतो त्या किडीचे पिकातील प्रमाण किती याचा विचार होत नाही व विनाकारण कीटकनाशकांचा खर्च वाढतो.
*आणि म्हणूनच पिकातील किडींची आर्थिक उंबरठा पातळी व आर्थिक नुकसान पातळी अभ्यासणे व त्यानुसार पिकातील किडीवर नियंत्रण ठेवून उत्पादन खर्चात बचत करणे गरजेचे आहे.* *🌱आर्थिक उंबरठा पातळी/Economic threshold level (ETL):-* अशी वेळ जेव्हा पिकातील किडीची संख्या,पिकाचे आर्थिक दृष्ट्या नुकसान करण्याचे संकेत देते म्हणजेच त्यावेळी तुम्हाला त्या किडीवर नियंत्रण उपाय करण्यास सुरवात करणे गरजेचे असते. म्हणजेच काय ह्या स्थितीमध्ये किडीला आर्थिक नुकसान पातळीपर्यंत जाण्यापासून रोखणे खुप गरजेचे असते. *आर्थिक नुकसान पातळी/Economic Injury level (EIL):-* जेव्हा आपण आर्थिक उंबरठा पातळी वर कीड रोखण्यास अयशस्वी होतो किंवा किडीचा अचानकच उद्रेक होतो तेव्हा किडींची संख्या खूपच वाढते. मग आर्थिक नुकसान पातळी म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये किडीची उच्चतम संख्या पिकाचे आर्थिक नुकसान करण्यास सुरवात करते,आणि या स्थितीत जर नियंत्रण उपाय अवलंबवले नाही तर किडीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानास सामोरे जावे लागते. तर ही मापके कशी ठरवावीत यासाठी प्रत्येक किडीचा नुकसान प्रकार पाहून,तसेच पिकातील एका झाडावर किती कीटक आहेत यावर ठरते. 🌱उदाहरणादाखल सोयाबीन पीक घेऊ सोयाबीन पिकात पाने खाणारे अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा उपद्रव असतो. जर 10 झाडापैकी एका झाडावर अळी दिसून आली तर साधारण पीक किडीच्या आर्थिक उंबरठा पातळीवर आहे असे समजावे. किडींची संख्या वाढुन 10 झाडांपैकी 6 ते 7 झाडावर कीड किंवा अळी अवस्था दिसली तर किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळी वर पोहोचतेय असं समजू शकतो. तर या गोष्टीचा थोडा विचार करून किटकनाशक फवारणीची वेळ ठरवावी,जेणेकरून कीटकनाशकांचा व्यवस्थित उपयोग होईल,जर पिकामध्ये कीड अगदी नगण्य आहे पण तरीही आपण महागडी औषधें आणून फवारतोय असं होता कामा नये. *जर आपण कीड प्रतिबंधात्मक उपाय व एकात्मिक किट व्यवस्थापन पद्धती वापरत असू तर कीड नेहमी आर्थीक उंबरठा पातळीच्या खाली राहू शकते.*

*एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..*👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean