पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Trap crop | Maize | सापळा पीक | एकात्मिक कीड नियंत्रण

इमेज
  सर्वच शेतकरी हंगामानुसार वेगवेगळी पिके घेतात आणि सर्वच पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव होतो.बदलता निसर्ग आणि पिकावर होणार किडींचा प्रादुर्भाव आणि त्यासाठी होणारा खर्च यामुळे शेतकरी हैराण होत आहे.बऱ्याच वेळेला शेतकरी पिकामध्ये कीड दिसू लागल्यावर कीड नियंत्रणासाठी धडपड करतो पण जर एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती समजून घेतली तर कीड नियंत्रण तर सोपे होईलच पण त्यासोबतच होणारा खर्चही आटोक्यात येईल.    किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासून मुख्य पिकाचे संरक्षण करण्यासाठी मशागत ,सापळा पीक,आंतरपिके,कामगंध सापळे,जैविक कीटकनाशके यासारख्या गोष्टींचा महत्वाचा भाग आहे. त्यामधील मक्याचे पीक कोणत्या किडीसाठी सापळा पीक म्हणून कार्य करते ते बघूया.  * मक्का हे  ज्वारीइतके महत्वाचे चारा पीक आहे. तसेच खरीप आणि रब्बी हंगामात मुख्य व आंतरपीक म्हणून संपुर्ण महाराष्ट्रभर घेतले जाते. या  सोबतच मक्का हे उत्तम सापळा पीक म्हणून सुद्धा ओळखले जाते.  * मक्का हा कुंपण(बॉर्डर क्रॉप),आंतरपीक पद्धतीने शत्रू किडींचे नियंत्रण करू शकतो.  * मक्क्याकडे फुलकिडे (थ्रीप्स) चांगल्या प्रकारे आकर्षित होतात. त्यामुळे ज्या पिकामध्ये थ्रीप

भाजीपाला | फळधारणा कमी होण्याची कारणे | Cause of Fruit setting in vegetables

इमेज
फळे तसेच भाजीपाला पिकामध्ये भाजीचे उत्पादन हे प्रामुख्याने फळाच्या संख्येवर अवलंबून असते. फुले व फळांची गळ होणे किंवा फळधारणा न होणे अशा विविध कारणांमुळे फळांची संख्या कमी होऊ शकते.त्याच पद्धतीने हंगाम, जमिनीची निवड, जातीची निवड, हवामान आणि हवामानातील बदल, अन्नद्रव्यांचे प्रमाण, पाण्याचा अयोग्य वापर, रोग व किडींचा उपद्रव किंवा वनस्पतीमध्ये आवश्यक त्या अन्नद्रव्याचा अभाव, परागीभवन न होणे इत्यादी अनेक कारणांमुळे भाजीपाला पिकांमध्ये फळधारणा कमी होऊ शकते. फळधारणा कमी होण्याची कारणे:- * फळधारणा होण्यासाठी झाडांवर फुले येणे, फुलामधील पुंकेसर आणि स्त्रीकेसर परिपक्व अवस्थेत असणे, परागीभवन होणे, परागीभवन आणि फळधारणा होण्यासाठी आवश्यक तापमान, अन्नद्रव्य आणि पाणी यांचे आवश्यक ते प्रमाण असणे महत्वाचे असते.  * पिकांना आणि पिकांमधील विशिष्ट जातींना फुले येण्यासाठी ठराविक तापमान, दिवसाची लांबी किंवा सूर्यप्रकाशाचे तास यांची आवश्यकता असते. त्यांची पूर्तता न झाल्यास झाडांना फुले येत नाहीत आणि फळधारणा होत नाही. * वेलवर्गीय पिकांमध्ये नर आणि मादी फुले वेगवेगळ्या वेळी येतात. नर फुले आधी येतात आणि मादी फुल

ऊसावर लवकर येणाऱ्या खोडकिडा | चिलो इंफुसकेटेलस | ESB in Sugarcane

इमेज
  फोटोमध्ये दिसणारी हि लक्षणे ऊसावर लवकर येणाऱ्या खोडकिडीची आहेत.  शास्त्रीय नाव:- चिलो इंफुसकेटेलस (Chilo infusteculas )         महाराष्ट्रात या किडीचा प्रादुर्भाव आडसाली (जुलै-ऑगस्ट) ते सुरू (फेब्रुवारी) लागवडीपर्यंत आढळतो. खोड किडीची लक्षणे:-     अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी रांगत अथवा चंदेरी धाग्याला लटकत ऊसाच्या खोडाजवळ येते. अळी खोडावरील मऊ पेशीवर उपजीविका करते. नंतर ती अळी खोडाच्या आत शिरुन उगवणाऱ्या कोंबाला ७-८ दिवसांत खाऊन टाकते. त्यामुळे १२-१८ दिवसांत आपणास पोंगा मर दिसतो. या किडीचा प्रादुर्भाव फुटव्यावर व लागणी पेक्षा खोडवा पिकात अधिक प्रमाणात दिसून येतो. सदरील पोंगा ओढल्यास सहज उपटून येतो व त्याचा उग्र वास येतो.  खोड किडीचा जीवनक्रम:- १) अंडी -      मादी पतंग हिरवीगार व टोकाकडे वाकलेल्या पानांवर अंडी देतात. या किडीची अंडी उसाच्या जमिनीलगतच्या तीन हिरव्या पानावरील मध्यशिरेजवळ आढळतात. नुकतीच दिलेली अंडी ही शुभ्र पांढरी असतात. साधारणपणे मादी पतंग पहिल्या रात्रीत ४०० अंडी काही पुंजक्याच्या स्वरुपात देतात. नंतर दुसऱ्या रात्री १२५ अंडी २ ते ५ पुंजक्यांमध्ये देतात. या किडीची अ

Thrips | Attack in Onion | फुलकिड्यांचे कांदा पिकामध्ये नुकसान | Management

इमेज
उत्तर:- महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये कांदा हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. कांदा पिकामध्ये प्रामुख्याने फुलकिडे म्हणजेच थ्रिप्स प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो.पण थ्रिप्स कांदा पिकामध्ये कशाप्रकारे नुकसान करतात हे आज आपण पाहूया.  फुलकिडे (शा. नाव:- थ्रिप्स टॅबसी)  * सर्व अवस्थेत येणारी व सर्वाधिक नुकसान करणारी प्रमुख कीड. या किडींची जास्त संख्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत असते. ओळख व नुकसान:-  * फुलकिडे पिवळसर तपकिरी असून, शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात.  * पिले व प्रौढ पानातील रस शोषतात. त्यासाठी असंख्य चावे घेतल्याने पानांवर पांढुरके ठिपके पडतात. (त्याला शेतकरी ‘टाक्या’ म्हणतात.)  * असंख्य ठिपके जोडले जाऊन पाने वाकडी होतात व वळतात. * रोपावस्थेतील प्रादुर्भावामुळे पाने वाळून कांदे पोसत नाहीत. * कांदा तयार होत असताना प्रादुर्भाव झाल्यास माना जाड होतात. कांदा साठवणीत टिकत नाही. * फुलकिड्यांनी केलेल्या जखमांतून काळा करपा या रोगांच्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. फुलकिड्यांमुळे कांद्याचे उत्पादन ३० ते ४० टक्के घटू शकते. एकात्मिक पीक संरक्षण:- * पाण्याच

इक्रिसॅट तंत्रज्ञान | भुईमुग | ICRISAT in Groundnut crop |

इमेज
इक्रिसॅट तंत्रज्ञान भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे प्रामुख्याने 3 हंगाम आहेत. खरिपामध्ये भुईमूगाखालील क्षेत्र उन्हाळी भुईमुगाच्या पेक्षा अधिक असते.     *भुईमुगामध्ये वापरले जाणारे इक्रिसॅट पद्धत:-*  भुईमूग लागवडीच्या या पद्धतीस गादीवाफा सरी पद्धत असे म्हणतात. या पद्धतीत प्रत्येक मीटरवर 30 सेंटीमीटर रुंदीची सरी सोडावी म्हणजे 70 सेंटीमीटर चा रुंद वरंबा तयार होईल. त्यावर वीस सेंटीमीटर अंतरावर चार ओळी पाडून भुईमुगाचे बी टोकण लागवड करतात. इक्रिसॅट पद्धतीच्या रुंद गादी वाफ्यावर पेरणी केल्याने मऊ व भुसभुशीत वरब्यामध्ये मुळांची वाढ व शेंगांचे पोषण उत्तम होते. जास्तीचे पाणी निचरा होऊन बाजूच्या सार्‍यातून शेता बाहेर जाते. रुंद वरंबावर बी टोकन करण्यापूर्वी  खत मात्रा पेरून द्यावी. त्यानंतर पाणी देऊन वाफे ओलसर करून शिफारशीत तणनाशकाची फवारणी करू शकता. त्यानंतर वाफ्यावर पॉलिथिन शीट अंथरून बसवले जाते.पॉलिथिनला वीस सेंटीमीटर ओळीतील अंतर ठेवून दोन रोपांना देखील 20 सेंटिमीटर अंतरावर चार सेंटीमीटर व्यासाची छिद्रे तयार केले जातात. सत्य छिद्राच्या ठिकाणी दोन बिया टाकल्या जातात.पॉलिथिनची

पिकावर येणाऱ्या विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

इमेज
भाजीपाला पिके तसेच इतर नगदी पिकावर कोणता ना कोणतातरी विषाणूजन्य रोग येत असतो.जसे मिरची वर येणारा चुराडा-मुरडा/बोकड्या,कलिंगड व वेलवर्गीय फळभाज्यांवर येणारा कुकरबीट मोझ्याक व्हायरस,भेंडी वर येणारा येल्लो व्हेन मोझ्याक व्हायरस,तसेच पपई सारख्या फळ पीकावर तर तीन प्रकारचे विषाणू येतात.अशाच प्रकारचे अनेक विषाणूजन्य रोग व त्यांचे सर्व साधारण व्यवस्थापन पाहुयात. ●कोणताही विषाणू सजीव वस्तू च्या संपर्कात येताच सक्रिय होतो.इतर वेळी ते निर्जीव अवस्थेत किंवा सुप्तावस्थेत असतात. *● त्यांचा वनस्पतीमध्ये शिरकाव कसा होतो?*    *वनस्पतीला शेती अवजारांद्वारे झालेल्या इजामधून किंवा रसशोषक किडीच्याद्वारे केल्या गेलेल्या पंक्चर मधून, इतर कोणत्याही कारणामुळे वनस्पतीवरील आघातामुळे विषाणूंचा वनस्पतीच्या शरीरात शिरकाव होतो. व ते सक्रिय होऊन वनस्पतींमधील  अन्न घेऊन त्यांची संख्या स्वतःहून वाढवण्यास सुरु करतात.    *●प्रसरण:-*    *एकदा शिरकावं झाल्यानंतर त्यांचं प्रसरण ते स्वतःहून करत नाहीत,तर ते अनेक रसशोषक किडींच्या माध्यमातुन होते.उदा.पांढरी माशी,फुलकिडे,मावा,तुडतुडे.    *जर एक झाड कोणत्याही विषाणूजन्य रोगास बळी

Precautions before Purchasing Pesticides| किडनाशके खरेदी करतांना लक्षात घ्यावयाच्या बाबी

IPM SCHOOL *किडनाशके खरेदी करतांना लक्षात घ्यावयाच्या बाबी* 1. पिकांवर रस शोषणाऱ्या किडींसाठी १५ ते २० % झाडांवर व खोड किडे, बोड अळ्या पाने पोखरणाऱ्या/गुंडाळणाऱ्या/ खाणाऱ्या अळ्यांचा उपद्रव ५ % पेक्षा जास्त असल्यास रासायनिक किडनाशकाचा वापर करावा. यापेक्षा कमी उपद्रव असल्यास जैविक किडनाशके वापरावीत. 2. फक्त तज्ञांद्वारे, कृषिदर्शनी, पीक संरक्षण पुस्तिका व इतर विश्वासपात्र दैनिके, नियतकालिके याद्वारा शिफारस केलेली किडनाशके घ्यावीत. ३. रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही व वनस्पतीचे विविध भाग खाणाऱ्या किडींसाठी स्पर्श व पोट विषेशिफारस केलेल्या मात्रेनुसार वापरावीत. ४. किडनाशकांच्या बाटल्या तथा पाकिटे खरेदी करतांना त्यावरील वापराची अंतिम तारीख बघून घ्यावी. ५. आपणांस हवे असलेले किडनाशकाचे तांत्रिक नांव व त्याचे प्रमाण घटकात दिलेले आहे, याची खात्री करून घ्यावी. उदा. इमिडाक्लोप्रीड हे तांत्रिक नांव कॉफिडॉर १७.८ % एस. एल., टाटामिडा १७.८ % एस. एल. इ. व्यापारी नावाने मिळत असले तरी प्रत्येक पॅकिंगवर घटकाखाली इमिडाक्लोप्रीड व त्याचे प्रमाण दर्शविलेले असते. ६. कोणत्याही तज्ञांकडे जाण्य

कीटकनाशके। Insecticide Marathi Information| Systemic Insectiside| Contact Insecticide|

इमेज
  तर आपण कोणतीही की किटनाशक फवारणी करत असताना,जे कीटकनाशक फवारतोय याची संपूर्ण माहिती असली पाहिजे.जसे की वापरण्याचे प्रमाण, कोणत्या किडी साठी घेतोय व ते कोणत्या प्रकारे काम करते. कीटकनाशक फवारणी केल्यानंतर ते किड कोणत्या प्रकारे मारते यावर कीटकनाशकांचे अनेक प्रकार पडतात,त्यातील मुख्य म्हणजे स्पर्षजन्य(Contact insecticide) आणि आंतरप्रवाही(Systemic insecticide) हे दोन प्रकार आपल्या वापरात आले असतील.आज त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. कीटकनाशकाच्या बाटलीवर किंवा पॅकेटवर त्याच्या नावाच्या बाजूला ते स्पर्षजन्य(contact) आहे की आंतरप्रवाही(Systemic) याचा स्पष्ट उल्लेख असतो. स्पर्षजन्य कीटकनाशक(Contact insecticide):- आपण घेतलेले किटकनाशक स्पर्षजन्य असेल,तर फवारणीनंतर पिकाच्या पानांवर पसरते आणि जेव्हा अळीचा संपर्क त्या किटकनाशकाशी येतो किंवा फवारणी केलेले पान खाते तेव्हा ती मरून जाते. आंतरप्रवाही किटकनाशक(Systemic insecticide):- आंतरप्रवाही किटकनाशक (Systemic insecticide) असा उल्लेख असलेले कीटकनाशक आपण जर फवारले असेल ते पानावर पडताच,पानांत शोषले जाते.त्यानंतर ते झाडाच्या प्रत्येक भागात पोहच

हरभऱ्यावरील घाटे अळी | हेलिकोव्हर्पा आर्मीजेरा | Pest of Chickpea

इमेज
 हरभऱ्यावरील घाटे अळी हि अळी हरभऱ्याप्रमाणेच कापूस, ज्वारी, मका, तूर, टमाटे आणि इतर कडधान्य पिकांवर आढळून येते. परंतु हरभरा हे तिचे आवडते खाद्य असल्याने तिला घाटे अळी म्हणून ओळखले जाते.अळी अवस्था पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. पतंग मजबूत बांध्याचे, फिक्कट पिवळ्या रंगाचे व पंखावर एक कला ठिपका असलेले असतात. मागील पंखाच्या कडा धुरकट असतात. नर व मादी पतंगाच्या मिलनानंतर मादी पतंग पिकाच्या पानाफुलावर अथवा कोवळ्या शेंड्यावर गोलाकार चकचकीत हिरवट पिवळसर रंगाची अंडी घालतात. अंड्यातून 6 ते 7 दिवसात भुरकट पांढऱ्या अळ्या बाहेर येतात. सुरुवातीच्या काळात अळ्या पानांच्या खालच्या बाजूस राहून पाने कुरतडून खातात. त्यामुळे पानांवर पांढरे डाग आढळून येतात. या काळातील नुकसान चटकन लक्षात येत नाही. कळ्या व फुले लागल्यानंतर अळ्या ते खातात. घाटे लागल्यानंतर अळी डोक्याकडील अर्धा भाग घाट्यात खुपसून आतील दाणे खाते. त्यामुळे घाट्यावर गोलाकार छिद्रे दिसुन येतात. अळीची पूर्ण वाढ 15 ते 20 दिवसात 5 ते 6 वेळा कात टाकून पूर्ण होते. पूर्ण वाढलेली अळी 4 ते 5 सेमी लांब व गडद हिरव्या किंवा तपकिरी करड्या रंगाची असते आणि

एकात्मिक कीड व्यवस्थापन | What Is IPM | Pest Management | Residue Free Farming

इमेज
 एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे जेव्हा आपण पारंपरिक पद्धती(Cultural Method),जैविक पद्धती(Biological Methods),यांत्रिक पद्धती(Mechanical Method), व सर्वात शेवटी रासायनिक पद्धती(Chemical Method) या पद्धतींचा एकत्रित किंवा या क्रमाने किंवा या सर्व पद्धतींचा सुवर्णमध्य साधून पर्यावरण पूरक कीड व्यवस्थापन करतो तेव्हा एकात्मिक पद्धतीने किडींचे व्यवस्थापण होत असते. आता यामधील प्रत्येक पद्धतीचे वेगळे वैशिष्ट्य व प्रत्येकाचे विशिष्ट असे महत्व आहे. थोडक्यात प्रत्येक पद्धत पाहू...  *कोणत्याही किडीसाठी नियंत्रणाचा पहिला सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रतिबंध होय.*  *पारंपरिक पद्धती(Cultural Method):-* कोणतीही कीड व्यवस्थापन पद्धत वापरण्याआधी त्यामधील प्रतिबंधक उपाय पहिल्यांदा निवडावे. जसे  १.तणमुक्त बांध व शेत ठेवणे. २.उन्हाळ्यात शेत नांगरून किमान 2 महिने तापवणे त्यामुळे किडीच्या विविध अवस्था (जसे-कोष) पक्ष्यांचे नैसर्गिक भक्ष्य बनतील. ३.सुरवातीस मागील पिकाचे अवशेष शेताबाहेर नष्ट करावे. ४.कमी प्रादुर्भाव असताना अळी किंवा इतर किडींच्या अवस्था दिसल्यास गोळा करून नष्ट करणे. खराब भाग काढून टाकणे. ५.सापळा पीक घ

*अमावस्येच्या आधी किंवा नंतर कीटकनाशक फवारणी-विज्ञान की अंधश्रद्धा...??*| Right Time Of Pesticide Spraying| Pest management

इमेज
नमस्कार शेतकरी मित्रहो सोयाबीन-कपाशी(कापूस) पिके सध्या जोमात आहेत. लागवडीपासून कापणीपर्यंत विविध किडींचा पिकावर प्रादुर्भाव होत असतो. पिकामध्ये कीडीच्या उपद्रवाचे प्रमाण पाहून आपण शिफारशीत कीटकनाशके फवारत असतो. पण अनेकवेळा आपण ऐकले असेल की अमावस्याच्या दिवशी किंवा पुढे मागे दोन दिवस पिकावर कीटकनाशक फवारणी झाली पाहिजे. पण त्यामागचं कारण माहिती नसल्यामुळे अनेकांना ही अंधश्रद्धा वाटते. असं वाटणं ही स्वाभाविकच आहे. कारण कोणत्याही गोष्टीत अमावस्या-पौर्णिमा हा विषय घुसडला की अंधश्रद्धा डोकं वर काढतेच.             सोयाबीन,टोमॅटो,वांगी,कापूस,कोबी,मक्का,अशा अनेक पिकावर येणाऱ्या विविध किडी जसे पाने खाणारी अळी(Spodoptera litura),घाटेअळी(Helicovorpa armigera),या लेपीडोप्टेरा (Lepidoptera) वर्गातील असतात. या सर्व किडिंची पतंग व अळी अवस्था निशाचर असते. ते रात्रीच्या वेळी जास्त  सक्रिय असतात. त्यामुळे किडीचे मादी पतंग रात्रीच्या वेळी अंडी घालत असतात. मग अमावस्येच्या वेळी असं काही वेगळं होत का?? तर नाही वेगळं अस काही होत नाही पण अमावस्येच्या रात्री अंधार पडण्याची वेळ थोडीशी वाढते,चंद्र उगवून येत नाही

कीड नियंत्रणामध्ये पिवळे व निळे चिकट सापळे कसे काम करतात?

इमेज
•पिवळे व चिकट सापळे हे मुख्यत: रसशोषक किडी नियंत्रनाचे काम करतात. •पिवळा चिकट सापळा:-पांढरी माशी,मावा,तुडतुडे हे कीटक आकर्षित होतात. निळा चिकट सापळा:-फुलकिडे(थ्रीप्स),नागअळीचे पतंग,चौकोनी टिपक्यांचे पतंग हे कीटक आकर्षित होतात. •एकरी किमान 30 ते 40 चिकट सापळे लावले जातात. सर्व पिकामध्ये आपण या सापळ्यांचा वापर करू शकतो. एखाद्यावेळी कांद्यासारख्या पिकामध्ये फुलकिड्यांचा(थ्रीप्स) नियंत्रणासाठी 60 ते 80 निळे चिकट सापळे लावावे लागतात. • रसशोषक किडी पिकातील हरितद्रव्य शोषून घेतात त्यामुळे पिकाची आंतरिक प्रक्रिया खालावून किट इतर रोगांना बळी पडते. तसेच पांढरी माशी,मावा,थ्रीप्स, हे कीटक विषाणूजन्य रोगांचे *वाहक* म्हणून काम करतात. त्यामुळे विषाणूजनीत रोग पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवले जातात. •उदा. मिरची मध्ये येणारा चुरडा-मुरडा,भेंडी मध्ये येणारा येल्लो व्हेन मोझ्याक,वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये येणारा कुकुरबीट मोझ्याक व्हायरस, हे विषाणूजन्य रोग पिकाची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यानंतर पिकात शिरकाव करतात. जेव्हा रसशोषक कीड जसे पांढरी माशी एखाद्या रोगग्रस्त झाडातील रस शोषते आणि तीच माशी पुन्हा उडत

ऊस पिकामध्ये तुरा येण्याची कारणे कोणती आहेत?

इमेज
  * 🏫 IPM SCHOOL 🌱 *  ऊस पिकामध्ये तुरा येण्याची कारणे कोणती आहेत? तुरा आलेला ऊस जर शेतामध्ये १.५ ते २ महिन्यांच्या पुढे राहिला तर पांगशा फुटतात, ऊस पोकळ पडण्यास सुरवात होते. त्यातील साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्टोज या विघटित साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे साखर उतारा कमी होतो. त्यामुळे तुरा आलेल्या उसाची लवकर तोडणी करावी. यावर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे उसाच्या शेतात पाणी बरेच दिवस साठून राहिलेले होते. सततच्या पावसामुळे पिकास नत्राचे हप्ते वेळेवर देता आलेले नाहीत. जास्त पावसामुळे जमिनीतील बरेचसे नत्र पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेलेले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये उसामध्ये फुलकळी तयार होण्यास अनुकूल हवामान होते. त्यामुळे या वर्षी बहुतेक ऊस जातींना तुरा लवकर आणि जास्त प्रमाणात येणार आहे. उसाला तुरा येण्यासाठी अनुकूल हवामान सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात उसाला तुरे येतात. दिवसाचे तापमान २६ अंश ते २८ अंश सेल्सिअस व रात्रीचे तापमान २२ अंश ते २३ अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के, साडेबारा तासांचा दिवस आणि साडेअकर

धैंचा हिरवळीच्या खताची वैशिष्ट्ये | Beneficial Dhaincha green manure | organic farming

इमेज
 कोणतेही पीक चांगले आणि जोमदार येण्यासाठी पिकाला हवी असणारी अन्नद्रव्ये  देण्याची गरज लागतेच पण हि गरज सध्या रासायनिक खतांच्या माध्यमातून भागवली जात आहे. पिकाला लागणारी अन्नद्रव्ये देण्याची गरज आहेच पण त्यामुळे जमिनीचा पोत,उत्पादकता टीकून राहणे गरजेचे आहे.     जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची फार गरज आहे. परंतु त्याची उपलब्धता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खतांची गरज भागविण्यासाठी हिरवळीची खते शेतीला व शेतकरयांना वरदान ठरू शकतात. हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती किंवा पानासह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून जमिनीत गाडणे होय. हि पिके जमिनीत अन्न पुरवठ्याबरोबर जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करतात. हिरवळीचे खते दोन प्रकारचे आहेत:- १) हिरवळीच्या खताचे पिक शेतात वाढवून फुलोरयापूर्वी ते जमिनीत गाडणे.[उदा.बोरू , ढेंचा, चवळी इत्यादी.] २) हिरवळीच्या खताचे पिक शेताबाहेर बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्याच्या कोवळ्या फांद्या व पाने शेतात आणून जमिनीत मिसळणे, गाडणे [उदा. गिरिपुष्प, सुबाभूळ, शेवरी इत्यादी.] धैंचा लागव

Yellow Mosaic Virus| Crop disease| Soyabean Yellow mosaic Virus| सोयाबीन येणारा पिवळा विषाणूजन्य रोग

इमेज
नमस्कार शेतकरी मित्र हो... सोयाबीन पीक सध्या फुलोरा अवस्था पार करून शेंगा लागण्यास सुरवात होतात. तर काही वेळेला पिकामध्ये आपल्याला पानांवर पिवळे ठेपके किंवा थोडी पाने चुरगळलेली दिसतात.पण ही लक्षणे दिसतात कशामुळे तेच आज आपण जाणून घेऊयात.  *विषाणूजन्य रोगाचे नाव:-*   पिवळा मोझ्याक व्हायरस(YMV) हा रोग हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा मध्ये प्रचलित होता आणि M.P. चे काही भाग तथापि अलिकडच्या वर्षांत ते प्रचलित सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर संक्रमित आहे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मध्यवर्ती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.  *लक्षणे:-*  •पानांवर पिवळे डाग एकतर विखुरलेले असतात किंवा प्रमुख बाजूने अनिश्चित पट्ट्यांमध्ये तयार होतात सोयाबीनच्या पानांच्या शिरा.  •पाने परिपक्व झाल्यावर पिवळ्या भागात तांबेरा पडल्यासारखे नेक्रोटिक स्पॉट्स दिसतात. •काही वेळेस तीव्र विद्रूप आणि पाने वेडेवाकडे होणे देखील दिसून येते.  •गंभीरपणे संक्रमित झालेल्यांची पाने झाडे पिवळी होतात. •प्रभावित झाडास कमी फुले आणि शेंगा येतात. या रोगाच्या संक्रमणामुळे बियानां मधील तेलाचे प्रमाण कमी होते आण

Thrips । फुलकिडे । How to control thrips | Sucking Pests| Thrips in onion

इमेज
फोटो मधील कीड ही थ्रीप्स(Thrips tabcai) म्हणजेच फुलकिडे आहेत*  फुलकिड्याचा (थ्रिप्स) चा प्रादुर्भाव राज्यातील बहुतांश भागात आढळून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. *यजमान पिके व वातावरण:-* प्रामुख्याने रब्बी हंगामात फुलकिडे कांदा,मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. कोरडी हवा आणि पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानात ही कीड झपाट्याने वाढते. *जीवनचक्र:-*  आकाराने अत्यंत लहान. पूर्ण वाढ झालेल्या फुलकिडीचा आकार सुमारे १ मिलीमीटरपर्यंत असतो.  रंग पिवळसर तपकिरी असून, शरीरावर फुलीच्या आकाराचे गर्द चट्टे असतात.  मादी पानावर पांढऱ्या रंगाची ५० ते ६० अंडी घालते. त्यामधून चार ते सात दिवसांत पिले बाहेर पडतात. पिल्लांचा जगण्याचा कालावधी साधारणपणे सहा ते सात दिवसांचा असतो. डिसेंबर महिन्यात २३ दिवसांपर्यंत असू शकतो.  पिले आणि प्रौढ रात्रीच्या वेळी पाने खरडून पानातून येणारा रस शोषतात. परिणामी पानांवर पांढुरके ठिपके दिसतात, त्यालाच शेतकरी ‘टाक्या’ म्हणून ओळखतात. नंतर पाने वाकडी होऊन वाळतात.  पिकाच्या सर्वच अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोपावस्थेत फुलकिडी तीव्र प

पायरेट ढेकूण । Pirate Bug | Mitrakitak | Biocontrol Agent | मित्रकीटक | Mitrakit

इमेज
ओळख मित्रकीटकांची:- भाग 2 *पायरेट ढेकूण/Orius spp (Minute Pirate Bug)* मागील भागात आपण लेडी बर्ड बिटल  या मित्र किडीविषयी महिती घेतली,आज आपण पायरेट ढेकूण या मित्रकिडीविषयी माहिती घेऊ.  *तर हे पायरेट ढेकूण नैसर्गिकरित्या मिश्राहारी असतात.*    *जीवनचक्र:-*  ●हा कीटक आपले जीवनचक्र ढेकूण-अंडी-पिल्ले आणि पुन्हा ढेकूण या अवस्थेतून पूर्ण करतो. ●4 ते 5 दिवसानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात.पिल्ले भगव्या रंगाची असतात.पुढे 7 ते 10 दिवसात प्रौढ ढेकूण बनतात. ●मादी ढेकूण जीवनकाळात 80 ते 100 अंडी देतात. ●त्यामधील मोठी पिल्ले व प्रौढ भुंगे हे जास्त करून छोटे कीटक,त्यांची अळी अवस्था,अंडी,तसेच कोळी,फुलकिडे,छोटे कीटक,मावा व पांढरी माशी यांच्यावर आपली उपजीविका करतात. ●तीन ते चार आठवड्यात जीवनचक्र पूर्ण करतात. ●जर हे कीटक खाण्यास उपलब्ध नसतील तर परागकण व पेशीरस सुद्धा खायला चालू करतात. कसे ओळखावे:- ●प्रौढ ढेकूण काळपट व पंख  पांढरत रंगाचे असतात. ●सोंडेकडील भाग पूर्ण काळा असतो,मागील बाजू सफेद होत येते. ●प्रौढ कीटकांची साधारण जाडी 2-3 मीमी तर लांबी 7-8 मीमी  इतकी असते. ●काही शत्रूकिडी या पायरेट ढेकणासारख्या

लेडी बर्ड बिटल | Mitrakitak | Biocontrol Agent | मित्रकीटक

इमेज
*ओळख मित्रकीटकांची भाग-1*  नमस्कार शेतकरी  मित्रांनो...  कीटक म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर एक विचित्र आकाराचा प्राणी किंवा अळी असं चित्र तयार होते.  एखादा कीटक पिकात दिसला तर लगेच आपण मारून टाकतो किंवा फवारणी करतो.               पण सर्वच कीटक पिकासाठी हानिकारक असतात असं नाही.काही कीटक पिकावर येणाऱ्या किडीवर आपली उपजीविका करतात,आणि नैसर्गिकरित्या कीटकांचे संतुलन राहते.अशा किडींना आपण मित्रकीटक तसेच बायोकंट्रोल एजंट म्हणून ओळखतो.  याच सर्व मित्र कीटकांची ओळख व जीवनचक्र आजपासून आपण जाणून घेणार आहोत.                 *लेडी बर्ड बिटल(Harmonia axyridis)*  ●शेतकरी या किटकास चित्रांग भुंगा किंवा टपरी असेही म्हणतात.  ●हा कीटक आपला जीवनक्रम अंडी-अळी-कोष-भुंगा अशा चार अवस्थेतुन पूर्ण करतो. यामधील अळी व भुंगा या दोन अवस्था पिकावर येणाऱ्या माव्याचा फडशा पडतात. ●या किडीचे प्रौढ भुंगे मावा,पिट्या ढेकूण,कोळी,पतंगवर्गीय किटकांची अंडी,लहान अळ्या यावंर आपली उपजीविका करतात. ●लेडी बर्ड बिटलची अळी एका दिवशी 20 ते 25  तर प्रौढ भुंगा 60 ते 70 मावा किडींचा फडशा पाडते.  *ओळखावे कसे?:-*             लेडी बर्ड बिटल

जैविक खते । Biofertilizers | NPK | Nitrogen Fixing Bacteria | PSB | KMB | Mycorrhiza

नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जिवाणूचा वापर करता येतो, त्याला *'जैविक खत'* असे म्हणतात. सूक्ष्म जिवाणू सेंद्रिय पदार्थाच्या जलदरीत्या विघटनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. म्हणून मातीची सुपीकता तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी या सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जैविक खते पर्यावरण पूरक आहेत. जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविक सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य तसेच जिवाणूजन्य रोगांचे देखील नियंत्रण होते. जैविक खतांमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन रसायनासाठी लागलेला खर्च सुद्धा कमी होतो. जमिनीचा पोत सुधारतो तसेच पेरणीपूर्वी जैविक खतांद्वारे बीजप्रक्रिया केल्यास बियाणांची उगवणक्षमता वाढते. तसेच १५ ते २० टक्के उत्पादनात वाढ होऊन उत्पादन खर्च कमी होतो. जिवाणू खत संपूर्ण सेंद्रिय व सजीव असल्याने त्यामध्ये कोणताही उपायकारक टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नसतो. जैविक खतांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत*  नत्र स्थितीकरण करणारे जिवाणू:- १) रायझोबिअम- हे जिवाणू कडधान्य पिकांच्या मुळामध्ये स्थिर होऊन मुळांवर फिकट ग

नारळावरील स्पायरलिंग पांढरी माशी | White Fly on Coconut | White Fly Management

इमेज
नारळ हे कोकणातील तसेच सागरी किनारपट्टीवरील  लोकांचे महत्त्वाचे पीक आहे. भारतात या पिकाचे उत्पादन मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळची पश्चिम किनारपट्टी, तमिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांत तसेच अंदमान, निकोबार व लक्षद्वीप बेटांवर घेतले जाते. नारळाचे उत्पादन घटण्यास नैसर्गिक बदल, कीड व रोग तसेच लागवडीनंतर घ्यायची काळजी (तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, छाटणी) इत्यादी कारणे जबाबदार आहेत. त्यापैकी महत्त्वाचा घटक म्हणजे कीड होय. ही कीड लागवडीपासून ते फळ काढणीपर्यंत दिसून येते. नारळावर आढळणाऱ्या महत्त्वाच्या किडी गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, काळ्या डोक्याची अळी, उंदीर व इरिओफाइड माईट (कोळी) इत्यादी आहेत. त्यापैकी गेंड्या भुंगा व सोंड्या भुंगा हे वर्षभर आढळून येतात. परंतु नारळ रोपवाटिका तसेच मध्ये सध्या नव्याने स्पायरलींग पांढरीमाशी नावाची कीड धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. ही एक दुय्यम कीड असून हवामान बदल व वाढीसाठी अनुकूल वातावरण प्राप्त झाल्यामुळे एक महत्त्वाची कीड म्हणून नारळ रोपवाटिका तसेच बागायातीदारांसमोर आव्हान म्हणून उभी आहे. *किडीची ओळख व जीवनक्रम* या किडीचे शास्त्रीय नाव 'अलेयु