ऊसावर लवकर येणाऱ्या खोडकिडा | चिलो इंफुसकेटेलस | ESB in Sugarcane

 


फोटोमध्ये दिसणारी हि लक्षणे ऊसावर लवकर येणाऱ्या खोडकिडीची आहेत. 


शास्त्रीय नाव:- चिलो इंफुसकेटेलस (Chilo infusteculas ) 

 

     महाराष्ट्रात या किडीचा प्रादुर्भाव आडसाली (जुलै-ऑगस्ट) ते सुरू (फेब्रुवारी) लागवडीपर्यंत आढळतो.


खोड किडीची लक्षणे:-

    अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी रांगत अथवा चंदेरी धाग्याला लटकत ऊसाच्या खोडाजवळ येते. अळी खोडावरील मऊ पेशीवर उपजीविका करते. नंतर ती अळी खोडाच्या आत शिरुन उगवणाऱ्या कोंबाला ७-८ दिवसांत खाऊन टाकते. त्यामुळे १२-१८ दिवसांत आपणास पोंगा मर दिसतो. या किडीचा प्रादुर्भाव फुटव्यावर व लागणी पेक्षा खोडवा पिकात अधिक प्रमाणात दिसून येतो. सदरील पोंगा ओढल्यास सहज उपटून येतो व त्याचा उग्र वास येतो. 


खोड किडीचा जीवनक्रम:-

१) अंडी -

     मादी पतंग हिरवीगार व टोकाकडे वाकलेल्या पानांवर अंडी देतात. या किडीची अंडी उसाच्या जमिनीलगतच्या तीन हिरव्या पानावरील मध्यशिरेजवळ आढळतात. नुकतीच दिलेली अंडी ही शुभ्र पांढरी असतात. साधारणपणे मादी पतंग पहिल्या रात्रीत ४०० अंडी काही पुंजक्याच्या स्वरुपात देतात. नंतर दुसऱ्या रात्री १२५ अंडी २ ते ५ पुंजक्यांमध्ये देतात. या किडीची अंडी अवस्था ३ ते ६ दिवस राहते. 


२) अळी -

    अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीच्या अंगावर नारंगी रंगाचे पट्टे असतात. ती अळी रात्रीच्या वेळी उसाच्या कोवळ्या पानावर उपजीविका करते. परिणामी उसात पोंगा मर आढळतो. पूर्ण वाढ झालेली अळी कोषावस्थेमध्ये जाण्याआधी खोडाच्या आतून जमिनीच्या वरील भागावर ४ ते १० सें.मी. अंतरावर पतंगाला बाहेर पडणे शक्य व्हावे, यासाठी छिद्र करून ठेवते. नंतर चंदेरी आवरणामध्ये पोंग्याच्या आत कोषावस्थेत जाते. अळी अवस्था २२ ते ३१ दिवस राहते. 


३) कोष -

    कोष खोडामध्ये (पोंग्यात) तयार होतात. हे कोंब लांब, पिवळसर ते तपकिरी रंगाचे दिसतात. ही अवस्था ५-९ दिवस राहते.


४) पतंग -

 या किडीचा पतंग शक्‍यतो सूर्योदयापूर्वी बाहेर पडतो. प्रौढ अवस्था ५-९ दिवस राहते.


खोड किडीचे एकात्मिक व्यवस्थापन:-

* हलक्‍या जमिनीत उसाची लागवड टाळावी. सुरू उसाची लागवड १५ फेब्रुवारी पूर्वीच करण्याचे नियोजन करावे. बेणे मळ्यातील निरोगी व किडीविरहीत बेण्याची निवड करावी.

 * फार प्रादुर्भाव झाल्यास शेत विरळ दिसते. अशा वेळेस एकरी रोपांची योग्य प्रमाण राखण्यासाठी लागवडीबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये पुरेसे रोपे तयार करून ठेवावीत. योग्य वेळी विरळ जागी ही रोपे लावावीत.

  * पाण्याच्या पाळ्या जर वेळेवर देता येत नसतील, तर पाचटाचे मल्चिंग अवश्‍य करावे. त्यामुळेदेखील खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

  * उसाला एक ते दीड महिन्यानंतर बाळ बांधणी केल्यास खोडकिडीचे पतंग बाहेर पडणारी छिद्रे बंद होऊन पतंग बाहेर पडणार नाहीत.

  * उसामध्ये मका, ज्वारी व गहू ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत.

   * वाढ जोमदार व फुटवे जास्त प्रमाणात येणाऱ्या वाणांवर या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात येतो.

   * ऊसामध्ये कामगंध सापळे एकरी १० ते १२ Sugarcane ESB Lure सोबत फनेल ट्रॅप वापरावे.      

    * ऊस लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी १ ते २ फुले ट्रायकोकार्ड प्रति एकर या प्रमाणात साधारणतः १० ते १५ दिवसांच्या अंतराने लावावीत.

  * खोडकीडग्रस्त ऊस उपटून अळीसह नष्ट करावा.

  * पुरेशा प्रमाणात पालाशयुक्त खते वापरल्यास या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

  *कार्बोरिल + सेव्हिडॉल 4% G 12.5 किलो, कार्बोफुरॉन 3G 33 किलो (मातीमध्ये मिसळावे). दाणेदार अर्ज ताबडतोब सिंचनानंतर करावा.

  संदर्भ :(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव)


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean