पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टोमॅटो | Pest Management | कामगंध सापळे | IPM

इमेज
संपूर्ण राज्यामध्ये घेतले जाणारे आणि बाजारपेठेमध्ये संपूर्ण वर्षभर मागणी असणारे पीक म्हणजे टोमॅटो. टोमॅटो पिकाची लागवड सर्व हंगामामध्ये केली जाते. टोमॅटो पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कीड पिकाचे नुकसान करते. जे शेतकरी चालल्या प्रकारे आणि सुरुवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करतात तेच किडींना पिकाचे नुकसान करण्यापासून थांबवू शकतात.     बरेच शेतकरी किडीच्या नियंत्रणासाठी फक्त रासायनिक पद्धतीवर अवलंबून असतात. त्यांचा कीड नियंत्रणासाठी खर्च वाढत राहतो आणि किडीचे नियंत्रण होत नाही.उलट सारखे रासायनिक औषध फवारणीमुळे बऱ्याच वेळा त्या किडीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते आणि रासायनिक औषधाला न जुमानता कीड पिकाचे नुकसान करत राहते.म्हणून तर एकात्मिक पद्धतींचा वापर करून कीड नियंत्रण केले पाहिजे. कामगंध सापळे यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात.  टोमॅटो पिकामध्ये कोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे वापरता येतील? नागअळी:- टोमॅटो पिकामध्ये नागअळीचा प्रादुर्भाव रोप नर्सरींमधून आणले जाते त्यावेळेपासून आपल्याला दिसून येतो. रोपांची लागण केल्यानंतर उष्ण हवामानात किडीचा प्रादुर्भाव म

उसावरील लोकरी मावा खाणारी कोनोबाथ्रा अळी |Conobathra |Biocontrol Agent

इमेज
                       *ओळख मित्रकिडींची*                           *कोनोबाथ्रा अळी* शेतकरी मित्रहो गेल्या काही दिवसापासून आपण प्रत्येक मित्रकिडीची सविस्तर माहिती घेत आहोत.तर आज आपण कोनोबाथ्रा अळी विषयी माहिती घेऊयात.   *🌱शास्त्रीय नाव:-*  Conobathra aphidivora/Dipha aphidivora   नावातच या किडीचे भक्ष्य सांगितलेले आहे,ही अळी एफिड म्हणजेच मावा शत्रूकिडीस भक्ष्य बनवते.  *🌱जीवनचक्र:-*  प्रौढ पतंग सुटे किंवा समूहात अंडी देतो. त्यानंतर अंड्यातून अळी बाहेर पडते.अळी चार वेळा कात टाकते.थोडी मोठी झालेली अळी भक्ष्याच्या शोधात बाहेर पडते व मावाकिडीचा फडशा पाडते. विशेषतः उसावरील लोकरी मावा. ही अळी अवस्था फक्त परभक्षी म्हणून काम करते.10 ते 15 दिवसात पूर्ण वाढ झालेली अळी लोकरी मावा असलेल्या पानावर पांढऱ्या पुंजक्यामध्ये कोष अवस्थेत जाते. त्यानंतर कोशामधून चॉकलेटी राखाडी रंगाचा पतंग बाहेर पडतो. अशा प्रकारे पूर्ण जीवनचक्र 26 ते 37 पूर्ण होते. पतंग    *🌱फायदे:-*  ऊसावरील लोकरी मावा तेच पिट्या ठेकणांचा कोनोबाथ्रा अळी फडशा पाडते.एका दिवसात 150 पेक्ष्या अधिक शत्रूकिडींचा फडशा पाडते.  *🌱ओळखावे कसे?*  ●

उन्हाळी भुईमूग | पेरणी | सुधारित वाण |

इमेज
राज्याच्या वेगवेगळ्या भागात उन्हाळी भुईमूग लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण खरीप हंगामापेक्षा चांगले आणि खात्रीशीर उत्पन्न उन्हाळी हंगामामध्ये मिळू शकते.त्यामुळे बरेच शेतकरी या हंगामामध्ये भुईमुगाची लागवड करतात.    उन्हाळी भुईमूग लागवड साधारण १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणे गरजेचे आहे. कारण उशिरा पेरणी झाली कि पुढे काढणीच्या वेळी पीक पावसात सापडण्याची भीती असते. त्यामुळे वेळेत पेरणी झाल्यास चांगले उत्पन्ना सोबत वेळेत पीक काढणी होते. उन्हाळी भुईमुगासाठी जमीन,पाण्याची व्यवस्था, हवामान या सर्व गोष्टींची काळजी घेऊन शिफारसीत वाण वापरणे गरजेचे आहे.  उन्हाळी भुईमुगाच्या काही वाणांची वैशिष्ट्ये:-  टीएजी - 24:-  हे उन्हाळी भुईमूग पिकाचे वाण वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडते. याचा परिपक्वता कालावधी उन्हाळी हंगामात साधारणता 110 ते 115 दिवस आहे. या वाणाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 24 ते 26 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी आहे. हा वाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे. टीजी - 26:-  उन्हाळी भुईमुगाचा हा वाण वाढीच्या प्रकारा न

*उन्हाळ्यातील नांगरणीचे कीड व्यवस्थापनामध्ये फायदे:-*

इमेज
 *🏫IPM SCHOOL🌱*   *उन्हाळ्यातील नांगरणीचे कीड व्यवस्थापनामध्ये फायदे:-*  नमस्कार शेतकरी बंधूंनो, दरवर्षी उन्हाळ्यात आपण शेताची नांगरणी करत असतो,त्याचे फायदेही अनेक आहेत.तसेच पूर्वापार चालत आलेली ही महत्त्वाची मशागत पद्धती आहे.जर आपल्याला नांगरणीचा किट व्यवस्थापनात आणि खत स्थिरीकरणामध्ये कसा उपयोग होतो हे सविस्तर समजले तर नक्कीच आपण नांगरणीची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करू शकू. तर जाणून घेऊयात उन्हाळ्यातील नांगरणीचे फायदे:- १.आपण जर पारंपरिक शेती पद्धती मध्ये पाहिले तर जमीन आठ महिने पीक व चार महिने पीक विरहित अशी असायची,खरीप आणि रब्बी हंगामातील पिके घेऊन बाकीचे 3 ते 4 महिने जमीन नांगरून तापली जायची. २.उन्हाळ्यातील तापमान 30℃ ते 38℃ इथंपर्यंत जाते.इतक्या तापमानात जिवाणूजन्य व बुरशीजन्य रोगांचे बीजाणू 60 ते 70 टक्यांपर्यंत नष्ट होतात. व पुढील पिकास त्यांच्या प्रादूर्भावाची शक्यता निम्याहून कमी होते. ३.जमीन पालथल्यामुळे खालील भाग वर येतो,हवा खेळती राहते,कोरड्या हवेशी संपर्क आल्यामुळे अनेक सुप्त घटक सक्रिय होतात.जसे की नत्र,स्फुरद,पालाश स्थिरीकरण करणारे जिवाणू. ४.वळीव पाऊस सुरू होण्याअगोदर

ढोबळी मिरची | Capsicum | किडी | Pest Management |

इमेज
ढोबळी मिरचीला बाजारपेठेमध्ये संपूर्ण वर्षभर मागणी असते. त्यामुळे अनेक शेतकरी ढोबळी मिरचीची लागवड करतात.पण पिकामध्ये येणाऱ्या किडींचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. ढोबळी मिरची पिकावर बहुतेक करून रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. कोणत्याही किडीच्या नियंत्रणासाठी, सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक उपायांचा एकात्मिक पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. मावा:- हे कीटक आकाराने खूपच लहान असतात आणि पानाच्या कोवळ्या भागामधून रस शोषून घेतात. त्यामुळे झाडे निस्तेज होतात आणि झाडांची वाढ थांबते. त्याचबरोबर मावा वनस्पतींवर राहून विषाणूजन्य रोग पसरवण्याचे काम करतात. फुलकिडे:- हे कीटक आकाराने खूपच लहान असून पानांचा रस शोषून घेतात. फुलकिड्यांचा प्रादुर्भाव देठ आणि फळांवरही आढळतो. फळांवर पांढर्‍या रेषांमुळे फळांचा दर्जा घसरतो आणि फळे बाजारात येत नाहीत. प्रादुर्भाव ग्रस्त झालेली पाने आतील बाजूने आखडलेली दिसतात. कोळी:- हि कीड पांढऱ्या रंगाची असून आकाराने खूपच लहान असते. त्याच्या प्रादुर्भावामुळे पाने खालच्या दिशेने गोलाकार होतात. त्यामुळे पानांचा आकार व फळांचा आकार लहान राहतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे फुले

कामगंध सापळे | Types of Pheromone Trap | कीड व्यवस्थापन

इमेज
  कामगंध सापळे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा महत्वाचा भाग आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सापळे हे यांत्रिक प्रकारामध्ये येतात. ज्यांचा वापर आपल्याला किडिंची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर जाण्यापासून रोखली जाते. किडीच्या जीवनचक्रातील पतंग/माशी/भुंगा अवस्था सापळ्यांमध्ये लावलेल्या ल्युरकडे आकर्षित होतात व सापळ्यात अडकतात. त्यांचे जीवनचक्र खंडीत होते. परिणामी किडीची पुढील पिढी तयार होत नाही.  कामगंध सापळ्यांचे विविध प्रकार:-  आय.पी.एम ट्रॅप:-   हा सापळा मुख्यतः फळमाशी नियंत्रणासाठी वापरला जातो. सापळ्याचा आकार ग्लास सारखा असतो. बाजूने असणाऱ्या तीन छिद्रामधून फळमाशी आतमध्ये जाऊन अडकते. हा सापळा सर्वसाधारण वर्षभर टिकतो. शिफारशीत दिवसांनी आतमधील ल्युर बदलावी लागते. हा सापळा वेलवर्गीय फळभाज्या जसे कलिंगड, काकडी,खरबूज,दोडका,कारले, पडवळ, दुधी भोपळा व टोमॅटो पिकात येणाऱ्या फळमाशी नियंत्रणासाठी वापरू शकतो. मॅक्सप्लस/मॅकफील ट्रॅप:-     हा सापळा सुद्धा फळमाशी नियंत्रणासाठी वापरला जातो. हा सापळा मजबूत असल्यामुळे बहुवार्षिक फळपिकामध्ये वापरू शकतो. सर्वसाधारण हंडीच्या आकाराचा सापळा पहायला मिळतो. व्यवस्थित

आंबा | फळगळ समस्या | Fruit Dropping | Problem & Management |

इमेज
  *आंब्याची फळगळ होण्याची कारणे*  राज्यातील बऱ्याच भागामध्ये बदलत्या हवामानामुळे आणि विविध कीड व रोगांमुळे आंबा फळांची गळ हाेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे फळगळीच्या विविध कारणांचा अभ्यास करून उपाययोजना कराव्यात. आंबा बागेत एकाच जातीची झाडे लावल्यास ४० - ५० टक्के संयुक्त फुलांचे परागीकरण होत नाही. परिणामी त्यांचे फक्त अंडाशय वाढून गळ होते. त्यामुळे आंबा बाग लावताना १० टक्के इतर जातीची झाडे लावणे महत्त्वाचे ठरते. * पुनर्मोहरामुळे देखील आंबा फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होताना दिसून येत आहे. ज्या बागांमध्ये नुकतीच फळधारणा सुरू झाली आहे तेथे ताबडतोब ५०  पीपीएम (५० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) जिब्रेलिक ऍसिडची फवारणी केल्यास फळगळ रोखण्यास मदत मिळणार आहे.   * बहुतांश आंबा झाडांची फळगळ ही अन्नद्रव्यांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे होते. अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात फळांची गळ होते. ही फळगळ रोखण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १ टक्का (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. तसेच फळांच्या विविध अवस्थेत युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) अधिक एन ए ए २० पीपीएम (२० म

टोमॅटो | फळ पोखरणारी अळी | Helicoverpa armigera | IPM

इमेज
*किडीचे नाव(शास्त्रीय नाव):-* फळे पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा)   *जीवनक्रम:-* * किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष आणि प्रौढ या चार अवस्थांमधून पूर्ण होतो.   अंडी पिवळसर रंगाची असतात.   * अळी सुरवातीला हिरव्या रंगाची असते. नंतर ती तपकिरी रंगाची होते. अंगावर राखाडी किंवा पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात. * कोष हा तपकिरी रंगाचा फळांच्या अवशेषात किंवा जमिनीत आढळतो. * पतंग फिकट पिवळसर किंवा फिकट हिरव्या रंगाचा असतो. * जीवनक्रम २५-३० दिवसात पूर्ण होतो.  *एकात्मिक नियंत्रण:-*  * पुनर्लागवडीवेळी मुख्य पिकाच्या कडेने मका आणि चवळी लावावी. तसेच झेंडूही लावावा. * शेतात एकरी १० हेलिक लूर आणि फनेल ट्रॅप याप्रमाणात कामगंध सापळे लावावे. * वेळोवेळी किडलेली फळे काढून खोल खड्ड्यात गाडून टाकावीत. * लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चिलोनिस हे मित्रकीटक १ ते १.५ लाख प्रतिएकर या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने २-३ वेळा सोडावेत. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात. परिणामी फळे पोखरणारी कीड अंडी अवस्थेतच नष्ट होते. * ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारित ॲझाडिरे

सिरफीड माशी/होवर माशी | Flower Fly | Biocontrol Agent | मित्रकीटक

इमेज
 IPM SCHOOL *ओळख मित्रकीटकांची भाग 4*   *सिरफीड माशी/होवर माशी* वातावरणात आढळण्याऱ्या अनेक फायदेशीर किडींपैकी एक म्हणजे सिरफीड माशी.  *जीवनचक्र:-*  इतर किटकांप्रमाणे हा हि कीटक आपले जीवनचक्र अंडी, अळी, कोष आणि पतंग या अवस्थामधून पूर्ण करते.अळी हिरवट पांढऱ्या रंगाची असते. कोष दिसायला डांबरासारखा दिसतो,जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी 2 ते 4 आठवड्याचा कालावधी लागतो.   *फायदे:-*  या किडीची अळी अवस्था मऊ शरीराचे कीटक, मावा, फुलकिडे, छोट्या अळ्या व इतर लहान कीटकांचा फडशा पाडते आणि  या सर्व उपद्रवी कीटकांची संख्या नेहमी आर्थिक उंबरठा पातळीच्या खाली राखली जाते.अळी पायविरहीत असते.एक सिरफीड माशीची अळी महिन्याभरात शेकडो मावा किडीचा फडशा पाडते. सिरफीड माशीच्या सर्वच प्रजाती परभक्षी नसतात.काही प्रजाती बुरशीवर सुद्धा आपली उपजीविका करतात. माशी फुलातील रसावर आपली उपजीविका करते.  *ओळखावे कसे?*  ●या माशीची कोष अवस्था दिसायला डांबरासारखा(टॅरी) दिसतो.असा पदार्थ शेतामध्ये आढळून आल्यास सिरफीड माशी आपले काम करत आहे अस समजावे. ●या किडीची माशी  हवेत उडताना घिरट्या घालत नाही. तसेच इतर माशीप्रमाणे स्थिर असताना पंख शरी

झायगोग्रामा भुंगा | Zygogramma Beetle| Biocontrol Agent | मित्र किड

इमेज
IPM SCHOOL :seedling: ओळख मित्र कीटकांची भाग:-3 :beetle: झायगोग्रामा भुंगा :beetle: जगभरात झायगोग्रामा मित्र किडीच्या प्रजातीच्या 100 हुन अधिक प्रजाती आढळतात.ह्या किडींची *झायगोग्रामा बायकोलोराटा* ही प्रजात मित्र कीटक म्हणून आपण वापरू शकतो. ●सर्व मित्रकीटक परभक्षी किंवा परजीवी असतात असे नाही काही मित्रकीटक शेतातील नको असलेल्या तनांवर उपजीविका करून नैसर्गिकरित्या तन नियंत्रण करतात. त्यापैकी एक म्हणजे झायगोग्रामा बायकोलोराटा भुंगा जो गाजर गवत आणि काँग्रेस तणांचा फडशा पाडतो. हा कीटक अंडी अळी कोष आणि भुंगा या चार अवस्थांतून आपले जीवनचक्र पूर्ण करतो. त्यापैकी अळी आणि भुंगा ह्या अवस्था शेतातील गाजर गवताचा फडशा पडतात. अळी अवस्थेतील झायगोग्रामा गाजर गवताची कोवळी पाने आघाशीपणे खातो. प्रौढ भुंगा गाजर गवताच्या कळ्या,पाने तसेच देठ व खोड तसेच काँग्रेस तण खातो. *कसे ओळखावे?* भुंगा लेडी बर्ड बिटल च्या आकारात असतो. दुधी पांढऱ्या रंगाची पाठ त्यावर तीन काळ्या रेषा आणि बाजूस काळ्या रंगाचे डिझाइन असते. एक ते दीड महिन्यात आपलं जीवनचक्र पूर्ण करतो. त्यामुळे शेतात नको असलेले गाजर गवत आणि काँग्रेस तण नैसर

पायरेट ढेकूण/Orius spp| Minute pirate bug |मित्र किड

इमेज
IPM SCHOOL ओळख मित्रकीटकांची:- भाग 2 :seedling: *पायरेट ढेकूण/Orius spp (minute pirate bug)* मागील भागात आपण लेडी बर्ड बिटल या मित्र किडीविषयी महिती घेतली,आज आपण पायरेट ढेकूण या मित्रकिडीविषयी माहिती घेऊ. *तर हे पायरेट ढेकूण नैसर्गिकरित्या मिश्राहारी असतात.* *जीवनचक्र:-* ●हा कीटक आपले जीवनचक्र ढेकूण-अंडी-पिल्ले आणि पुन्हा ढेकूण या अवस्थेतून पूर्ण करतो. ●4 ते 5 दिवसानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात.पिल्ले भगव्या रंगाची असतात.पुढे 7 ते 10 दिवसात प्रौढ ढेकूण बनतात. ●मादी ढेकूण जीवनकाळात 80 ते 100 अंडी देतात. ●त्यामधील मोठी पिल्ले व प्रौढ भुंगे हे जास्त करून छोटे कीटक,त्यांची अळी अवस्था,अंडी,तसेच कोळी,फुलकिडे,छोटे कीटक,मावा व पांढरी माशी यांच्यावर आपली उपजीविका करतात. ●तीन ते चार आठवड्यात जीवनचक्र पूर्ण करतात. ●जर हे कीटक खाण्यास उपलब्ध नसतील तर परागकण व पेशीरस सुद्धा खायला चालू करतात. कसे ओळखावे:- ●प्रौढ ढेकूण काळपट व पंख पांढरत रंगाचे असतात. ●सोंडेकडील भाग पूर्ण काळा असतो,मागील बाजू सफेद होत येते. ●प्रौढ कीटकांची साधारण जाडी 2-3 मीमी तर लांबी 7-8 मीमी इतकी असते. ●काही शत्रूकिडी या प

मित्रकीटक | Bio-control Agent | Helpful insect |

इमेज
शेती करत असताना शेतकऱ्याला पिकामध्ये बऱ्याच प्रकारच्या किडी दिसतात.काही किटक हे पिकाचे नुकसान करणारे असतात तर काही कीटक हे पिकाचे नुकसान करणाऱ्या किडींवर जगणारे असतात. पण शेतकरी पिकामध्ये कोणतेही जरी कीटक दिसले तरी शेतकऱ्याला ती कीड पिकाचे नुकसान करणारी आहे असे वाटून बरेच शेतकरी लगेचच रासायनिक औषध आणून फवारणी करतात आणि अनावश्यक खर्च वाढवला जातो.     सध्या शेतकऱ्याला दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार नाही तर स्वतः त्यामधील अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणजेच काय तर सध्या शेतात कोणते पीक आहे, त्या पिकामध्ये येणारी कीड कोणती? ती पिकासाठी किती हानिकारक आहे? नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या? या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.   पिकामध्ये दिसणाऱ्या सर्व किडी या पिकाचे नुकसान करणाऱ्या नसतात. बऱ्याच वेळेला काही किडी या दुसऱ्या किडीला खाताना पाहायला मिळतात, म्हणजेच काय तर नुकसानकारक कीड जशी आपल्याला पिकामध्ये पाहायला मिळते त्याच प्रमाणे नैसर्गिक रित्या कीड नियंत्रणाचे काम होताना आपल्याला पाहायला मिळते.     मित्रकिडी या शत्रुकीडीच्या वेगवेगळ्या अवस्थांवर जगत असतात.काही मित्रकिडी या शत्रुकीडीची अंडी

ज्वारी | मिजमाशी प्रादुर्भाव | Midge Fly control |

इमेज
*मिज माशी * *शास्त्रीय नाव:-* स्टेनोडिप्लोसिस सोर्घीकोला *जीवनचक्र:-* मिज माशीची लांबी १·५–२ मिमी. असते. शरीराचा रंग लाल ते केशरी यांच्या दरम्यान असतो. डोके पिवळ्या रंगाचे व पाय तपकिरी रंगाचे असतात.नर आकाराने मादीपेक्षा लहान असतो. मादीचा मागचा भाग निमुळता होत गेलेला असून त्याद्वारे मादी फुलांमध्ये अंडी घालते. मादी एका वेळी ३०–१०० अंडी घालते. अंडी सुरुवातीला पिवळसर असून नंतर गर्द तपकिरी होतात. त्यांतून २–५ दिवसांत अळ्या बाहेर पडतात. अळ्या ज्वारीचे तयार होत असलेले दाणे खाऊन जगतात. त्यामुळे कणसात दाणे तयार होत नाहीत. अळी दोन-तीन वेळा कात टाकते आणि त्याची वाढ पूर्ण होते. पूर्ण वाढलेल्या अळीचा रंग गर्द केशरी असतो. दोन-तीन दिवसांत अळी कोशावस्थेत जाते. कोशावस्था ६–१० दिवसांची असते. मिज माशी या कोशातून सकाळी बाहेर पडते. मिज माशी २-३ दिवसांपेक्षा जास्त जगत नाही. तिची एक पिढी २–४ आठवड्यांत पूर्ण होते आणि एका ऋतूत त्यांच्या अनेक पिढ्या तयार होतात. मिज माशीचे आयुष्य २-३ दिवसांचे असले, तरी तिच्यामुळे ज्वारीचे मोठे नुकसान होते. जेव्हा पिकाचा हंगाम नसतो, तेव्हा ही माशी सुप्तावस्थेत असते. दाणे काढलेले