सिरफीड माशी/होवर माशी | Flower Fly | Biocontrol Agent | मित्रकीटक

 IPM SCHOOL


*ओळख मित्रकीटकांची भाग 4* 


 *सिरफीड माशी/होवर माशी*


वातावरणात आढळण्याऱ्या अनेक फायदेशीर किडींपैकी एक म्हणजे सिरफीड माशी.


 *जीवनचक्र:-* 

इतर किटकांप्रमाणे हा हि कीटक आपले जीवनचक्र अंडी, अळी, कोष आणि पतंग या अवस्थामधून पूर्ण करते.अळी हिरवट पांढऱ्या रंगाची असते. कोष दिसायला डांबरासारखा दिसतो,जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी 2 ते 4 आठवड्याचा कालावधी लागतो.


 *फायदे:-* 

या किडीची अळी अवस्था मऊ शरीराचे कीटक, मावा, फुलकिडे, छोट्या अळ्या व इतर लहान कीटकांचा फडशा पाडते आणि  या सर्व उपद्रवी कीटकांची संख्या नेहमी आर्थिक उंबरठा पातळीच्या खाली राखली जाते.अळी पायविरहीत असते.एक सिरफीड माशीची अळी महिन्याभरात शेकडो मावा किडीचा फडशा पाडते. सिरफीड माशीच्या सर्वच प्रजाती परभक्षी नसतात.काही प्रजाती बुरशीवर सुद्धा आपली उपजीविका करतात.

माशी फुलातील रसावर आपली उपजीविका करते.

 *ओळखावे कसे?* 

●या माशीची कोष अवस्था दिसायला डांबरासारखा(टॅरी) दिसतो.असा पदार्थ शेतामध्ये आढळून आल्यास सिरफीड माशी आपले काम करत आहे अस समजावे.

●या किडीची माशी  हवेत उडताना घिरट्या घालत नाही.

तसेच इतर माशीप्रमाणे स्थिर असताना पंख शरीरास चीकटलेले नसतात.

●माशी लहान असते व डोळे शरीरापेक्षा थोडे मोठे असतात.

● या माशीप्रमाणे दिसणार्या अनेक किडी आहेत पण त्या शत्रुकिडी असतात. त्या घिरट्या घालतात त्यामुळे लगेच ओळखतात कारण सिरफीड माशी घिरट्या घालत नाही.

 ●तसेच शत्रूकीडीचे डोळे शरीराप्रमाणे प्रमाणबद्ध असतात त्या प्रमाणात सिरफीड माशीचे डोळे शरीरापेक्षा मोठे असतात.

 

 *संवर्धन:-* 

●पांढऱ्या आणी पिवळ्या रंगाच्या फुलांकडे  ही माशी लवकर आकर्षित होते.पांढरा किंवा पिवळा झेंडूचे आंतरपीक घेऊन आपण या माशीला पिकांमध्ये आकर्षित करू शकतो.

●अतिविषारी कीटकनाशके वापरू नयेत.

●डांबरासारखा पदार्थ शेतामध्ये पानावर आढळल्यास नष्ट करू नये.


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean