हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |
हुमणी एक अतिशय नुकसानकारक आणि नियंत्रणासाठी कठीण अशी एक कीड आहे जी शेतकऱ्याचे ऊस, भुईमूग, बटाटा, सोयाबीन यासारख्या नगदी तसेच भाजीपाला पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. हुमणी हि खरीप हंगामामध्ये अधिक सक्रिय असल्यामुळे नियंत्रण उपाय करणे खूप कठीण होते. हुमणी किडीमुळे पिकाचे ३० से ८० टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते.
हुमणी कीड जमिनीमध्ये राहून पिकाच्या मुळाजवळ राहून नुकसान पोहोचवते. हि कीड जमिनीमध्ये असल्यामुळे नियंत्रण उपाय करताना खूप कठीण जाते. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक बाबी नियंत्रणात्मक उपाय केल्यास किडीचे नियंत्रण नक्कीच शक्य आहे. तर आज आपण पाहूया कि त्यासाठी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय कोणते करता येतील.
हुमणी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय :-
हुमणी किडीचे साधारणपणे जीवनचक्र:-
हुमणी हि कीड संपूर्ण वर्षभर सक्रिय असते, परंतु हि कीड खरीप पावसाच्या दिवसामध्ये अधिक सक्रिय राहून पिकाचे नुकसान करते. मार्च - एप्रिल मध्ये होणाऱ्या वळीव पावसानंतर हुमणी किडीचे भुंगे जमिनीतून बाहेर येतात आणि शेतामधील बांधावर असणाऱ्या झाडावर, झुडपावर एकत्र आलेले दिसतात. ज्यावेळी ते झाडावर पाने खायला एकत्र येतात त्यावेळी त्यांचे ते मादी भुंग्यासोबत मिलन होते. त्यानंतर नर भुंगे मरून जातात तर मादी भुंगे नांगरणी झालेल्या जमिनीमध्ये तसेच इतर जमिनीमध्ये ठीक ठिकाणी अंडी देतात. त्यामुळे शेतकऱ्याला हुमणी किडीचा प्रादुर्भाव हा एकाच ठिकाणी न होता जागोजागी दिसून येतो. अंड्यामधून बाहेर आलेली अळी सुरुवातीच्या २ अवस्थेंमध्ये मातीमध्ये असणारे सेंद्रिय घटकावर उपजीविका करते त्यानंतर ती पिकाची मुळे कुरतडून नुकसान पोहोचवायला सुरुवात करते. अळी अवस्था साधारण ४-५ महिने राहते. त्यानंतर ती कोषावस्थेत जाते. कोषावस्था पूर्ण करून तयार झालेला भुंगा जमिनीमध्ये राहतो आणि वळीव पाऊस झाल्यानंतर बाहेर येतो.
हुमणी किडीचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने करायचे असेल तर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास किडीचे नियंत्रण सहज शक्य आहे.
प्रतिबंधात्मक उपाय:-
भुंगा अवस्था नियंत्रण करण्याच्या काही पद्धती:-
* वळवाच्या पावसानंतर हुमणीच्या भुंगे कडुलिंब, बाभूळ किंवा इतर झाडाची पाने खायला झाडावर संध्याकाळच्या वेळी दिसतात. अश्या वेळी ते भुंगे काठीने खाली पाडून एकत्रीत गोळा करून रॉकेल मिसळलेल्या पाण्यात बुडवून त्यांची विल्हेवाट लावावी. आजूबाजूच्या बाधित शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून एकत्रित हा प्रयोग केल्यास, भुंगेरे अंडी घालण्याची संधी मिळण्यापूर्वीच नष्ट करता येतील.
* लाईट ट्रॅप/ प्रकाश सापळे यांचा वापर करावा. सायंकाळी ७ नंतर कडुनिंब सारख्या झाडाखाली विजेचा बल्ब लावून त्याखाली पसरट भांडे ठेवून त्यात डिझेलमिश्रित पाणी टाकावे. विजेच्या प्रकाशाकडे भुंगेरे आकर्षित होऊन पाण्यात पडून मरतात.
* माळावरील हुमणीच्या (होलोट्रॅकिया सेराटा) या प्रजातींचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी व्हाईट ग्रब ल्युर आणि बकेट ट्रॅप कामगंध सापळे एकरी ४ ते ५ प्रमाणे वापरून भुंग्यांचे नियंत्रण करावे.
* एरंडी बिया १ किलो (बारीक करून), यीस्ट पावडर ५० ग्रॅम, बेसन पीठ ५० ग्रॅम, ताक अर्धा लिटर हे सर्व मिश्रण २ लिटर पाण्यामध्ये भिजवून २ ते ३ दिवस आंबवून घ्यावे. तयार मिश्रणाची ५ लिटर क्षमतेचे मातीचे मडके एकरी ५ मडकी या प्रमाणे मातीमध्ये ठेवावे. याकडे भुंगे आकर्षित होतात.
(यासारख्या पद्धतींचा उपयोग करून भुंगा अवस्था नियंत्रीत केल्यास पुढे हुमणी तयार होणार नाही आणि किडीमुळे पिकाचे नुकसानही होणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये शेतामध्ये हुमणीच्या भुंगे दिसायला सुरुवात झाली आहे त्यांनी शक्य त्या मार्गाचा उपयोग करून भुंगा नियंत्रण करावे.)
नियंत्रणात्मक उपाय:-
जैविक कीड नियंत्रणामध्ये BVM (बिव्हेरिया बॅसियाना, वर्टिसिलियम लेकानी, मेटारायजियम एनसोपली) याचा उपयोग करू शकतो. चांगले कुजलेले शेणखतामध्ये 10-15 किलो BVM मिसळून संपूर्ण शेतामध्ये पसरावे किंवा BVM पाण्यामध्ये मिसळून त्याची आळवणी करू शकतो तसेच ड्रीप द्वारे सुद्धा सोडू शकतो.
* यासोबतच EPN (एंटोमो पैथोजेनिक निमेटोड) याचा सुद्धा उपयोग हुमणीच्या नियंत्रणासाठी अतिशय प्रभावीपणे करू शकतो.
* उसाच्या मोठ्या पिकामध्ये मेटारायझियम या जैविक किंवा क्लोरोपायरीफोस या रासायनिक कीटकनाशकाची आळवणी करू शकतो.
* तसेच आपण फिप्रोनिल 0.3 G ग्रनुअल्स चा वापर करू शकतो. हे दाणेदार कीटकनाशक आपण पिकाच्या मुळाजवळ टाकून गरज असल्यास हलके पाणी देऊ शकतो.
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
राजेश शेषराव ठाकरे रा. काटोल जि .नागपूर
सुधाकर मेटील, कोल्हापूर
ओमकार मासाकल्ले, देवणी लातूर
आनंद भाष्करराव अजमिरे, मु. पोस्ट. हिवरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती
श्रुतिक गरुडा, पालघर
देशमुख,
महेंद्र आत्माराम जगताप, विटा खानापूर सांगली
दर्शन अरुणराव ठाकरे, बेनोडा ( शहीद) ता वरूड जि अमरावती
दिव्याकुमार भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर
भागीनाथ आसने, अ. नगर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm #IPM #gogreen #pest #whitegrub #humani #management #preventions #controlmeasure
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा