पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कडुनिंब | शेतीसाठी उपयोग | कीड नियंत्रणासाठी फायदे |

इमेज
 *🏫IPM SCHOOL🌱* *शेतीसाठी बहुउपयोगी कडुनिंब* निसर्गाने शेती साठी दिलेली देणं म्हणजे कडूलिंब. पर्यावरण शुद्धीकरणात कडुनिंबचे फार महत्वाचे कार्य करते. कडुनिंबाचे झाड सतत प्राणवायू वातावरणात सोडत असते.  बहुउपयोगी असे हे झाड असल्यामुळे शेती क्षेत्राबरोबर वन विभागातर्फे सामाजिक वनीकरणासाठी ही सर्वोत्कृष्ट वनस्पती/झाड मानले जात आहे.  कडुलिंबाचा शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो. निंबोळी किंवा पानांचा रस असो की अर्क तसेच निंबोळी तेल हे सर्वोत्कृष्ट असे नैसर्गिक कीड,रोग व जिवाणु नियंत्रक आहे.निंबोळी अर्क व निंबोळी तेलाने अनेक प्रकारचे कीड व रोग नियंत्रित होतात. यामुळे एकंदरीत पिकांच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ होऊन मातीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी हे एक वरदान आहे. याशिवाय निंबोळ्या व पाल्याचे खतदेखील अनेक दृष्टीने फायदेशीर आहे.  कडूनिंब वृक्षाच्या पानांमध्ये व बियांमध्ये खालीलप्रमाणे रासायनिक घटक आढळून येतात. फुले लागण्याचा कालावधी :- मार्च -एप्रिल.   बी/ फळे लागण्याचा कालावधी :- मे-जुन प्रति झाड उत्पादन :- परिपक्व झाड (दहा वर्ष) पासून 10 ते 25 किलो क

जमिन | सुपीकता वाढविण्याचे मार्ग | Improve Soil Fertility |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱  देशातील एकरी उत्पादकतेचा अभ्यास केल्यास इतर देशांपेक्षा आपल्याकडील शेतीची उत्पादकता फारच कमी आहे. सध्या शेतकरी यांत्रिक पद्धतीने म्हणजेच ट्रॅक्टरने नांगरणी, पेरणी करत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल व इतर जनावरांचे प्रमाण कमी झाल्याने सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण ही कमी झालेले आहे. त्यामुळे मातीमध्ये विविध प्रकारच्या अन्नद्रव्याची कमतरता आढळून येते. विशेष करून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा विपरीत परिणाम मानवाच्या आणि मातीतील सूक्ष्म जिवाणूच्या आरोग्यावर होत असतो.     मातीचे आरोग्य जपताना मातीत असलेल्या उपयोगी सूक्ष्मजीवांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. शेणखतासोबतच शेतकर्यांनी शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त क्षेत्रावर हिरवळीच्या खतांचा वापर करावा. पीक उत्पादनाकरिता जमीन वापरताना पाण्याचा योग्य वापर व्हायला हवा म्हणजेच पारंपरिक ऐवजी सूक्ष्म सिंचनाद्वारे पिकास पाणी देण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी पिकाची फेरपालट होणे आवश्यक आहे रासायनिक खते आणि कीटकनाशकाची शिफारस केल्याप्रमाणे कमीतकमी वापर होणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्याचे मार्

धान्य साठवणूक | Important things for Store Grains | काळजी |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 अन्नधान्याची मळणी केल्यानंतर किंवा वर्हसभरासाठी लागणारे धान्य खरेदी केल्यानंतर योग्य पद्धतींनी साठवणे गरजेचे आहे. शेतकरी घरासाठी लागणारे धान्य साठवून ठेवतात. परंतु घरामध्ये बऱ्याचदा साठवलेल्या धान्यांमध्ये किडे किंवा बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आढळतो. हवेतील आद्रता किंवा हवामान बदल, जागेची अस्वच्छता,साठवणुकीची पद्धत,धान्य नासाडी करणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त यामुळे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. तेव्हा साठवणुकीतील धान्य खराब होऊ नयेत यासाठी सोप्या आणि आरोग्याला नुकसान न पोचवणाऱ्या पध्दती उपयोग करणे गरजेचे आहे.   *प्रतिबंधात्मक उपाय:-* * मळणीपूर्वी धान्य स्वच्छ करून घ्यावे. धान्य मळणी करण्याची जागा स्वच्छ, किडींपासून मुक्त असावी.तसेच लोकवस्ती व धान्य साठवणीपासून ती जागा दूर असावी. मळणी केल्यानंतर दाणे चांगले वाळवावेत.  * कोठ्या सूर्यप्रकाशात ठेवून स्वच्छ करून वापराव्यात. * गोदामात असलेली बिळे सिमेंटने बुजवून घ्यावीत. जेणेकरून उंदीर गोदामात पोहोचू शकणार नाही. * धान्य साठवणुकीची जागा निर्जंतुक करण्यासाठी Malathion 50 टक्के प्रवाही 10 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊ

भेंडी | फळ पोखरणाऱ्या अळी | एकात्मिक नियंत्रण |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 भेंडी पिकावरही बऱ्याच किडींचा प्रादुर्भाव होतो. मावा, पाने खाणारी अळी, फळे पोखरणारी अळी यासारख्या किडींचा त्यामध्ये समावेश होतो. सर्व किडींमध्ये फळे पोकरणाऱ्या अळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. भेंडी पिकावरील फळ पोखरणाऱ्या अळीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीपासूनच एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास होणारे नुकसान टाळता येईल.    भेंडीमध्ये २ प्रकारच्या फळ पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.   शेंडे व फळे पोखरणारी अळी(इयरीस व्हिटेला):- * ही भेंडीवरील सर्वात नुकसानकारक कीड आहे. ती वर्षभर कार्यक्षम असते. जास्त आर्द्रता व जास्त उष्ण तापमान या किडीला पोषक असते.  * अळी तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात. * सुरवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंड्याना पोखरून आत भुयार तयार करते.  * प्रादुर्भावग्रस्त पोंगा मलूल होऊन खालच्या दिशेने लोंबतो व नंतर वाळतो. अळीने पोखरलेल्या कळ्या व फुले वाळून खाली पडतात.  * फळावर अळीने केलेले छिद्र आणि तिची विष्ठा दिसते, तर प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकार

हिरवळीची खते | फायदे | Benefits of Green Manure |

इमेज
 *🏫IPM SCHOOL🌱* जमिनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होऊन भरपूर उत्पन्न मिळण्यासाठी जमिनीमध्ये शेणखत, हिरवळीचे खत, गांडूळ खत अशी वेगवेगळी सेंद्रिय खते जमिनीमध्ये द्यावी लागतात. त्यापैकी हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांच्या कोवळ्या फांद्या बाहेरून आणून मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढलेली पिके फुलोऱ्यावर आली असता शेतात नांगरून गाढून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांमधून तयार झालेल्या खतास हिरवळीचे खत असे म्हटले जाते.  या हिरवळी खतांसाठी कोणकोणत्या वनस्पतींचा उपयोग होतो हे पाहूया.    धैंचा:- या वनस्पतीच्या मुळावर तसेच खोडावर ही गाठी निर्माण होतात. यामध्ये रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करतात. या वनस्पतीच्या मुळावर गाठी निर्माण होण्याची क्षमता इतर द्विदल वनस्पती पेक्षा पाच ते दहा टक्के जास्त आहे.या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण 0.46 इतके असते.    ताग:- ताग हे सर्व प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढणारी  हिरवळीचे पीक आहे. पेरणी झाल्यानंतर पाच ते सहा आठवड्यांनी

ऊस पिक । रेड रॉट । Disease of Sugarcane ।

इमेज
 *🏫IPM SCHOOL🌱* अशी लक्षणे ऊस पिकामध्ये रेड रॉट या रोगाच्या प्रादुर्भावामुळे दिसायला लागतात.  लाल रॉट:- ग्लोमेरेला टुकुमनेन्सिस लक्षणे:- * प्रभावित ऊस पानांचा रंग बदलून हिरवा ते केशरी आणि नंतर तिसर्‍या किंवा चौथ्या पानात पिवळा होतो. मग पाने खालून वरपर्यंत सुकायला लागतात. * जर बुरशीचे बीजाणू पानाच्या मध्यभागातून पानाच्या आवरणात प्रवेश केल्यानंतर पानाच्या मध्यभागी देखील लालसर ठिपके दिसू शकतात. * संसर्ग झाल्यानंतर 16 - 21 दिवसांनी बाह्य लक्षणे दिसतात आणि संपूर्ण ऊस सुकण्यास आणखी 10 दिवसांचा कालावधी लागतो. * बाधित ऊस कापल्यानंतर आतील भाग लालसर रंगाचा असतो आणि उसाच्या संपूर्ण लांबीवर मधूनमधून पांढर्‍या छटा येतात. * कधीकधी, उसाच्या आतील खड्डा काळ्या तपकिरी द्रवाने भरलेला असतो आणि अल्कोहोलचा गंध प्रदर्शित होतो.   रोगकारक:- * रेड रॉट रोग ग्लोमेरेला टुकुमनेन्सिस या बुरशीमुळे होतो. कोलेटोट्रिचम फाल्कॅटम हे जुने नाव काही पॅथॉलॉजिस्ट अजूनही पसंत करतात. * पानांच्या आवरणांवर आणि ब्लेडवर आढळणारे रोगजनक, एकटे किंवा एकत्रित, अनेकदा संवहनी बंडल, गोलाकार, बुडलेले, गडद तपकिरी ते काळा 65-250 µm व्यास यां

| रोपवाटिका | रोपे तयार करताना घ्यायची काळजी |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 महाराष्ट्रामध्ये भाजीपाला पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा, लसुन,कोबी, वाटाणा, भेंडी इत्यादी पिकांचा समावेश होतो. त्यापैकी मिरची,वांगी, टोमॅटो,कांदा,कोबी, फ्लावर इत्यादी पिकांची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड करतात.     रोपवाटिकेमध्ये रोपवाटिकेसाठी जागेची निवड, रोपवाटिकेमध्ये रोपांचे पीक संरक्षण आणि लागवडीपूर्वी रोपांना करावयाची प्रक्रिया इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात. या लेखामध्ये आपण रोपवाटिकेमध्ये रोपांची काळजी घेताना कोणत्या गोष्टींचा विचार महत्वाचा आहे हे पाहणार आहोत.    भाजीपाला रोपवाटिकेमध्ये रोपांची काळजी * रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करताना बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी कॅप्टन किंवा बाविस्तीन दोन ते तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. * बियाण्याची पेरणी ओळीमध्ये करावी आणि पातळ परंतु  योग्य अंतरावर एका ओळी मध्ये बियाणे पेरावे. बियाणे एक सेंटीमीटर खोलीवर टाकावे. * रोपवाटिकेमध्ये बियाणे पेरल्यानंतर हलक्‍या आणि अलगदपणे मातीने बियाणे झाकावे. * शक्यतो रोपवाटिकेची किडींपासून संरक्षण करण

उन्हाळी हंगाम । जमीन मशागत । कीड व्यवस्थापन ।

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 उन्हाळी हंगामात जमीन मशागतीद्वारे सूत्रकृमी, हुमणी आणि वाळवी व्यवस्थापन सूत्रकृमी, हुमणी आणि वाळवी यांच्यापासून विविध पिकांचे दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यांचे यशस्वीपणे व्यवस्थापन करण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. तथापि, उन्हाळी हंगामात जमीन मशागत व मशागतीशी निगडीत असलेल्या उपाय योजनांद्वारे त्यांचे प्रभावी नियंत्रण कसे करावे हे पाहणार आहोत.    सूत्रकृमी, हुमणी आणि वाळवी यांचे विविध मार्गाने प्रभावी नियंत्रण करण्यासाठी त्यांचे जीवनक्रमाशी, प्रादुर्भावाची लक्षणे व ती वाढण्याची कारणे, आर्थिक नुकसान करण्याची पातळी आणि त्यापासून पिकांचे होणारे नुकसान यासंबंधी माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. *सूत्रकृमी* सूत्रकृमी हा जमिनीत मातीच्या कणांच्या पोकळीत वास्तव्य करून पिकांचे नुकसान करणारा अतिसूक्ष्म धाग्यासारखा लांबट प्राणी असून त्याची सरासरी लांबी ०.२ ते ०.५ मि.मी. असते. तो जमिनीत अगर झाडाच्या अंतर्गत भागात राहून नुकसान करतो. महाराष्ट्रामध्ये विविध पिकावर ७५ प्रकारच्या सूत्रकृमी जरी आढळत असल्या तरी मुळांवर गाठी करणारी, मूत्रपिंडीय, लिंबूवर्गीय पिकांवरील आणि मुळांवर ब

लिंबू । झाडाच्या फांद्या वाळणे । कारणे आणि उपाय ।

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 लिंबूच्या झाडावर फांदी वाळण्याचा प्रादुर्भाव माल सेको (खपलीची बुरशी) (Phoma tracheiphila) या बुरशीमुळे दिसून येतो.   लक्षणे लक्षणे सुरुवातीला एकट्या फांदीवर किंवा भागात दिसतात आणि जर वेळीच उपाय केले नाहीत तर पूर्ण झाडावर पसरु शकतात आणि त्यामुळे झाड वाळू शकते. पहिले लक्षण वसंत ऋतुमध्ये कोंब आणि पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो व कालांतराने फांद्या वाळू लागतात. मरगळलेल्या फांद्यांवर उंचवटलेले काळे पुटकुळे किंवा राखेसारख्या राखाडी रंगाचे भाग दिसल्यास ते डाग बीजाणूच्या पुंजक्यांचे असतात. मोड आणि मुनवे अनुक्रमे संक्रमित फांद्याच्या व मातृवृक्षाच्या मुळाशी वाढणे हि लक्षणे यजमान पिकात सामान्यपणे आढळतात. जर संक्रमित फांद्या किंवा खोडाचे लाकुड कापले किंवा साल काढली तर लाकडात वैशिष्ट्यपूर्ण केसर-गुलाबी किंवा नारंगी-लाल रंगहीनता दिसते. ही अंतर्गत लक्षणे या शिरातुन पाझरलेल्या चिकट द्रावाशी संबंधित आहेत.  पान, फांद्या आणि मुळांतील जखमेतुन ही बुरशी आत शिरकाव करते. बीजाणू पाणीजन्य मानले जातात. बुरशी चार महिन्यांपेक्षा अधिक काळ मातीमध्ये संक्रमित फांद्यात टिकून राहू शकते. अनेक आठवड्य

पिठ्या ढेकूण | Mealy Bug | व्यवस्थापन |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 मिलीबग (पिठ्या ढेकूण)  मिलीबग(पिठ्या ढेकूण) ही फळ बागेवर येणाऱ्या प्रमुख कीडींपैकी एक होय.मिलीबगची  कीड आणि तिची पिल्ले आंब्याच्या तसेच इतर फळामधून आणि फळांच्या देठामधून रस शोषून घेतात.  जीवनक्रम:- मिलीबगचे प्रजनन नर मादीच्या मिलनातून होते. तसेच मादी(पार्थीनो जेनेटीकल)या प्रकारातील असून मिलनाशिवाय देखील अंडी घालते. कीडींची एक पिढी पूर्ण होण्यासाठी २५ ते३० दिवसांचा कालावधी लागतो.एका मादीच्या जीवनचक्रामध्ये  १५० ते ४०० अंडी कापसासारख्या कवचात टाकुन त्यापासून पुढे ८ ते१० दिवसांत पुन्हा पिलं जन्माला येतात तर प्रतिकुल परिस्थीतीमध्ये कीड एक पिढी पुर्ण करण्यासाठी ४० दिवसही घेते. मिलीबग हे प्रतिकूल परिस्थितीत जमिनीत सुप्तावस्था पुर्ण करतात. नुकसान:- सद्यस्थितीमध्ये खोडाच्या मोकळ्या सालीत अंडीपुंजासह मिलीबग आढळत आहेत.आंब्यात प्रामुख्याने देठाजवळ किडींचा प्रादुर्भाव दिसुन येतो तर सिताफळामध्ये हि किड खोडातून व फळातून रस शोषन करते. ऊसामध्ये ही किड खोडातुनच रस शोषण करते, ज्याने साखरेचे प्रमाण कमी होते. हया किडींच्या शरीरातुन व रस शोषन केल्यामुळे पानातुन चिकट मधासारखा पदार्थ बाहेर पड

उन्हाळी हंगाम | फळझाडांचे एकात्मिक व्यवस्थापन |

इमेज
🏫IPM SCHOOL🌱  उन्हाळी हंगामामधील फळझाडांचे एकात्मिक व्यवस्थापन  कमी पावसाच्या अवर्षणग्रस्त क्षेत्रात व हलक्या जमिनीतदेखील काही फळझाडाची लागवड फायदेशीर होऊ शकते फळपिकाच्या लागवडीनंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईपर्यंत झाडांची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे असते. उन्हाळी हंगामात तर फळबागांचे नियोजन जर चांगल्या प्रकारे झाले नाही तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते.  उन्हाळी हंगामात फळपिकाची काळजी:- * लिंबूवर्गीय फळबागांचे व्यवस्थापन (मोसंबी व कागदी लिंबू):-  पाणी देणे:- लिंबूवर्गीय फळबागांना दुहेरी ओळ (डबल रिंग) पद्धतीने पाणी द्यावे. उन्हाळ्यात ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे पाणी शक्यतो रात्री द्यावे. ज्या ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता आहे, त्या ठिकाणी ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. आच्छादनाचा वापर करणे:- प्लॅस्टिक कागद किंवा भुसा याचा आच्छादन म्हणून वापर करावा आच्छादनामुळे जमिनीत सतत ओलावा राहण्यास मदत होते, शिवाय गवताचा बंदोबस्त होऊन जमिनीची धूप थांबते. बाष्परोधक रसायन केवोलिनचा वापर * ६ टक्के तीव्रतेच्या केवोलिनची फवारणी उन्हाळ्यात लिंबूवर्गीय फळबागांवर केली असता बाष्

ऊस | Disease of Sugarcane | रोगांचा प्रादुर्भाव |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 ऊस हे महाराष्ट्रात महत्वाचे नगदी पिकांपैकी एक पीक आहे. ऊस हे बहूवर्षीय पीक आहे.  महाराष्ट्रात ऊस पिकावर विविध प्रकारच्या ३० रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये तांबेरा, पोक्का बोईंग, लालकूज, मोझेक, गवताळ वाढ, मर आणि पानावरील ठिपके या रोगांचा समावेश आहे. पिकामध्ये रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखता यायला पाहिजे तरच रोगाचे नियंत्रण होऊ शकेल.  ऊसावरील प्रमुख रोग  पोक्का बोइंग:-  हा रोग हवेद्वारे पसरतो. मान्सूनपूर्व पडलेला वळीव पाऊस व पावसामुळे हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे हा रोग पानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात शक्यतो जुलै ते सप्टेंबर या कालावधित रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. या रोगाची लागण सुरुवातील शेंड्यापासून येणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या कोवळ्या पानांवर दिसून येते. पानाच्या खालच्या भागात सुरुवातीला फिक्कट, हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. रोगट पानांचा आकार बदलून त्यांची लांबी कमी होते. खोडाकडील भाग आखूड होऊन पाने एकमेकांत गुरफटली जातात त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाहीत. या रोगाची तीव्रता आढळल्यास शेंडे कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात. लाल

गांडूळ खत | Benefits of Compost | वापरण्याचे फायदे |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱   शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे कारण वर्षांनुवर्षे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. जमीन सुपीक ठेवण्यासाठी आपण शेतीमध्ये रासायनिक खतांचा, औषधांचा वापर मर्यादित करणे त्याचबरोबर जमीन सुपीक ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमध्ये आपण गांडूळ खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो, म्हणूनच त्यामध्ये असणारे घटक आणि त्यांचा वापर शेतीसाठी कसा फायदेशीर ठरू शकतो.  गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण हे ४० ते ५० टक्के असते. या मध्ये ४०  ते ५७ टक्के कार्बन, ४ ते ८ टक्के हायड्रोजन, ३३  ते ५४  टक्के ऑक्सिजन, ०.७  ते पाच टक्के सल्फर व दोन ते पाच टक्के नत्र असते. गांडूळ खतामध्ये मोनोसॅक्रेईडीस, पॉलिसॅकॅराइड्स यासारखी पिष्टमय पदार्थ असतात. अमिनो आम्ले व प्रथिने, स्निग्ध पदार्

मिरची | किडीं | एकात्मिक व्यवस्थापन | IPM |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 मिरची हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकामध्ये किडींच्या प्रादुर्भावामुळे कमी उत्पादन मिळते. या पिकावर येणाऱ्या किडीमुळे ३४ ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. यामध्ये सुरुवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनांचा अवलंब करावा.    मिरचीमध्ये सुरुवातीपासून थ्रिप्स(फुलकिडे) प्रादुर्भाव दिसून येतो. मिरचीमध्ये रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे विषाणूजनित रोग पसरवला जातो त्यामुळे उत्पन्नावर खूप परिणाम होतो. त्याचबरोबर मावा, पाने खाणारी स्पोडो अळी आणि फळ पोखरणारी अळीचा देखील प्रादुर्भाव आपल्याला बऱ्याच वेळेला दिसून येतो.  त्यामुळे मिरची पिकामध्ये येणाऱ्या किडींचे व्यवस्थापन अगदी सुरुवातीच्या काळापासून करावे लागते.  मिरचीमधील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन:- * कीड सहनशील वाणाची लागवड करावी. * पिकाची फेरपालट करावी. शेतामध्ये मिरची पिकावर मिरचीचे पीक घेणे टाळावे. * मिरचीच्या रोपावर हलकेसे पाणी शिंपडल्यास फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. * मिरची पिकासोबत ४:१ या प्रमाणात चवळी, कोथिंबीर किंवा उडीद यांचे आंतरपीक घ्यावे. तसेच झेंडू या सापळा पिकाची ४५ दिवसांची १०० झाडे प्रति एकरी लावावीत. *