पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

इमेज
  सध्या आंब्याच्या झाडांना सर्वत्र कमी अधिक प्रमाणात मोहोर दिसू लागला आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात आंबा पिकवला जातो. महाराष्ट्राच्या कोकण भागात तर आंब्याच्या खूप मोठ्या बागा आहेत.    बदलत्या हवामानामुळे तसेच कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते. तर अगदी सुरुवातीच्या काळापासून मोहोराच्या संरक्षणासाठी प्रयत्न केल्यास नक्कीच चांगल्या पद्धतीने मोहोर टिकून चांगले आंब्याचे उत्पन्न शेतकऱ्याला नक्की मिळेल. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि अगदी सुरुवातीपासून मोहोर संरक्षण कश्या पद्धतीने केले पाहिजे.  आंबा मोहोराची काळजी:- आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते. क्वचित प्रसंगी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी मोहोर येतो. तुडतुडे, कोळी, मिजमाशी, पिठ्या ठेकूण इ. किडी तसेच करपा, भुरी इ. रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आवश्यक आहे. मोहोर फुटल्यानंतर जर फवारणी केली तर किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. किडीचा प्रादुर्भाव:- मिजमाशी:- काळपट रंगा

हरभरा पीक । घाटेअळी नियंत्रण। घाटेअळी एकात्मिक व्यवस्थापन । Pod Borer in Chick Pea

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 दि 26 डिसेंबर 2023   प्रश्न क्र.56 हरभरा पिकामधील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय काय करता? उत्तर:-  शेतकरी मित्रहो, हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पिकात सुरवातीपासून घाटे भरण्याच्या अवस्थेपर्यंत घाटेअळीचा प्रादुर्भाव हमखास दिसून येतो. त्यासाठी सुरवातीपासून उपायोजना करणे अतिशय महत्वाचे आहे. यासोबत या घाटेअळीचे जीवनचक्र अभ्यासणे गरजेचे आहे, कारण या किडीची प्रादुर्भाव तीव्रता ३०-५० टक्क्यापर्यन्त असू शकते. हि कीड हरभऱ्याव्यतिरिक्त टोमटो,तूर, सोयाबीन, कापूस, मिरची, मक्का, वाटाणा, भेंडी या पिकावर सुद्धा प्रादुर्भाव करू शकते.  *आर्थिक नुकसान संकेत पातळी:-* सरासरी १ अळी प्रति मीटर ओळीत किंवा ५ टक्के घाट्यांचे नुकसान *जीवनचक्र:-*  किडीचे जीवनचक्र वातावरणानुसार ३०-४५ दिवसात पूर्ण होते. तसेच पतंग-अंडी-अळी-कोष या चार अवस्थतेतून पुढे जाते.  *पतंगावस्था:-* पतंग दुधी राखाडी रंगाचे असतात, हे पतंग कोवळ्या शेंड्यावर फुलावर अंडी देतात. पतंग ७-१२ दिवसात पतंगावस्था पूर्ण होते. मादी पतंग नर पतंगापेक्षा अधिक काळ जिवंत असतो.  *अंडी अवस्था:-* हि अंडी

कांदा पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन| Integrated Pest Management in Onion

इमेज
 या रब्बी हंगामात शेतकरी वेगवेगळी पिके घेत आहेत. साधारणत: वांगी, टोमॅटो, खरबूज, काकडी बरोबरच गहू, कांदा, लसूण यासारखी पिकेही घेतली जातात. भाजीपाल्यासोबत वेगवेगळ्या फळांचा देखील हा हंगाम आहे ज्यातून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.   या हंगामात अनेक भागात कांदा पिकाची लागवड केली जाते. त्यात मुख्य म्हणजे पुणे भागातील नारायणगाव आणि नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मध्ये कांदा पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तसेच इतर भरपूर भागात कांद्याचे पीक कमी अधिक प्रमाणावर घेतले जाते. पिकावर इतर कीड जास्त प्रमाणात दिसत नाही पण थ्रिप्स (फुलकिडे)चा प्रादुर्भाव दिसून येतो. मात्र विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होत आहे. तर आज आपण जाणून घेऊया कांदा पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे. कांद्यामध्ये एकात्मिक किड व्यवस्थापन: - * शेताची चांगली नांगरणी करावी जेणेकरून जमिनीतील किडींच्या वेगवेगळ्या अवस्था नष्ट होतील. * शेतात उरलेले जुने पिकांचे अवशेष नष्ट करा. * सर्व पिकांप्रमाणेच वेळेवर पेरणी करा. * रोपलागण करताना दोन रोपांमध्ये योग्य अंतर ठेवा. * लावणी करताना झाडांची मुळे कार्बेनडेंझीमच्या द्र

पेरू पिकामध्ये किडीच्या प्रादुर्भाव | Insect infestation in guava crop

इमेज
  पेरू हे एक बागायती पीक आहे ते देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक बागायती शेतीमध्ये तसेच डोंगर भागातही शेतकरी पेरूची लागवड करतात. पेरूला विविध बाजारपेठांमध्ये नेहमीच मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळू शकतो.   कोणत्याही पिकातून चांगला नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्याने पिकातील कीड व रोगांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. चांगल्या प्रकारे किड व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याला पिकामध्ये कोणत्या किडी येतात हे माहित असणे महत्वाचे आहे, तरच शेतकरी पिकाच्या सुरुवातीपासून किडीचे चांगले व्यवस्थापन करू शकतो आणि चांगले उत्पादन घेऊ शकतो. तर आज जाणून घेऊयात पेरू फळबागेमध्ये कोणत्या किडी पिकाचे नुकसान करू शकतात. पेरू फळबागेमधे येणाऱ्या किडी:- फळमाशी:- फळमाशी हि पेरू उत्पादनातील सर्वात नुकसानदायक कीड आहे. पेरूच्या फळांवर अनेक फळमाशांचे प्रादुर्भाव होतो.      फळमाशीची मादी फळांना छिद्रे पाडतात आणि सालाखाली अंडी घालतात. अंड्यातून बाहेर येणारे मॅगोट्स फळाचा आतील भाग खातात. आंबा काढणीनंतर या किडीचा परिणाम मोठ्या प्रमाणात असतो. हि किड जुलै-ऑगस्टमध्ये जास्त प्रमाणात वातावरणात उपलब्ध

अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव | The American armyworm

इमेज
  अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भावामुळे ज्वारीच्या पिकामध्ये असे दिसून येत आहे.  अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात मका पिकांवर होतो. तसेच ज्वारी, ऊस या पिकावर सुद्धा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या अळीचा प्रादुर्भाव ज्वारी पिकावर सुरुवातीपासूनच दिसून येतो. तुम्हाला पिकातील पाने खरवडलेली दिसतात किंवा पानाची मधलीशिरा सोडून राहिलेल्या पाने दोन्ही बाजूने खाल्लेली दिसतात तसेच, यामुळे कोवळ्या पानांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे . पिकाचे मोठे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन:- * या अळीचा प्रामुख्याने मक्यावर दिसून येतो. त्यामुळे मका किंवा ज्वारी हे पिक एकाचं शेतामध्ये वारंवार घेऊ नये  * शेत व बांध तणमुक्त ठेवावेत. * रासायनिक खतांचा वापर संतुलित करावा. नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा. कारण यामुळे कीटक पिकाकडे अधिक आकर्षित होतात आणि किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. * पिकाच्या पानांवर सुरुवातीला दिसणारे अंडीपुंज व लहान अळ्या शेताबाहेर नष्ट करावेत. * या किडीच्या व्य