अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव | The American armyworm
अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भावामुळे ज्वारीच्या पिकामध्ये असे दिसून येत आहे.
अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात मका पिकांवर होतो. तसेच ज्वारी, ऊस या पिकावर सुद्धा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
या अळीचा प्रादुर्भाव ज्वारी पिकावर सुरुवातीपासूनच दिसून येतो. तुम्हाला पिकातील पाने खरवडलेली दिसतात किंवा पानाची मधलीशिरा सोडून राहिलेल्या पाने दोन्ही बाजूने खाल्लेली दिसतात तसेच, यामुळे कोवळ्या पानांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे . पिकाचे मोठे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन:-
* या अळीचा प्रामुख्याने मक्यावर दिसून येतो. त्यामुळे मका किंवा ज्वारी हे पिक एकाचं शेतामध्ये वारंवार घेऊ नये
* शेत व बांध तणमुक्त ठेवावेत.
* रासायनिक खतांचा वापर संतुलित करावा. नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा. कारण यामुळे कीटक पिकाकडे अधिक आकर्षित होतात आणि किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
* पिकाच्या पानांवर सुरुवातीला दिसणारे अंडीपुंज व लहान अळ्या शेताबाहेर नष्ट करावेत.
* या किडीच्या व्यवस्थापनासाठी FAW लुअर आणि फनेल सापळे 10 ते 12 प्रति एकरी पिकामध्ये पेरणीनंतर 15 दिवसांच्या आत लावावेत जेणेकरुन किडीचे नर पतंग सापळ्यात अडकतील जीवनचक्र थांबेल.
* अळीच्या नियंत्रणासाठी प्रति एकर 10 ते 12 पक्षी थांबे उभारावेत जेणेकरून पक्षी शेतात सहज बसून अळ्या खाऊ शकतील आणि अळीचे नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन करता येईल.
* अमेरिकन लष्करी अळीची अंडी नष्ट करण्यासाठी ट्रायकोग्रामा मित्रकिडीची अंडी 1 ते 1.5 लाख प्रति एकर याप्रमाणे सोडावीत. ट्रायकोग्रामा किडी त्यांची अंडी अमेरिकन लष्करी किडीच्या अंड्यांमध्ये घालतात, ज्यामुळे हानिकारक किडीची अंडी नष्ट होतील.
* तसेच, विषाणू (NPV), बॅक्टेरिया (BT) किंवा बुरशी (Metarhizium anisopliae) या कीटकनाशकांचा उपयोग फवारणीसाठी केला जाऊ शकतो आणि हे पर्यावरणास पूरक आहेत.
* रासायनिक कीटकनाशकांचा वापर तेव्हाच करावा जेव्हा कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल. यामध्ये मिथोमाईल, सायफ्लुथ्रीन, मिथाइल पॅराथिऑन या कीटकनाशकांचा वापर करता येतो.
*उत्तर देणारे शेतकरी मित्र:-*
🌱विजय साठे, सातारा
🌱प्रदिप जाधव, पन्हाळा
🌱संतोष जाधव कोल्हापूर
🌱विकास धुमाळ बेकनाळ ,गडहींग्लज
🌱सूर्यकांत तारकंटे नांदेड
🌱ओंकार जगदंबे,नांदेड
🌱ओंकार मस्कले, देवणी
🌱हरिभाऊ कांबळे वाळवा
*🙏उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा