पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किडनाशके खरेदी करतांना लक्षात घ्यावयाच्या बाबी| Insecticide| Pesticide | Pesticide Spray

1. पिकांवर रस शोषणाऱ्या किडींसाठी १५ ते २० % झाडांवर व खोड किडे, बोड अळ्या पाने पोखरणाऱ्या/गुंडाळणाऱ्या/ खाणाऱ्या अळ्यांचा उपद्रव ५ % पेक्षा जास्त असल्यास रासायनिक किडनाशकाचा वापर करावा. यापेक्षा कमी उपद्रव असल्यास जैविक किडनाशके वापरावीत. 2. फक्त तज्ञांद्वारे, कृषिदर्शनी, पीक संरक्षण पुस्तिका व इतर विश्वासपात्र दैनिके, नियतकालिके याद्वारा शिफारस केलेली किडनाशके घ्यावीत. ३. रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही व वनस्पतीचे विविध भाग खाणाऱ्या किडींसाठी स्पर्श व पोट विषेशिफारस केलेल्या मात्रेनुसार वापरावीत. ४. किडनाशकांच्या बाटल्या तथा पाकिटे खरेदी करतांना त्यावरील वापराची अंतिम तारीख बघून घ्यावी.  ५. आपणांस हवे असलेले किडनाशकाचे तांत्रिक नांव व त्याचे प्रमाण घटकात दिलेले आहे, याची खात्री करून घ्यावी. उदा. इमिडाक्लोप्रीड हे तांत्रिक नांव कॉफिडॉर १७.८ % एस. एल., टाटामिडा १७.८ % एस. एल. इ. व्यापारी नावाने मिळत असले तरी प्रत्येक पॅकिंगवर घटकाखाली इमिडाक्लोप्रीड व त्याचे प्रमाण दर्शविलेले असते. ६. कोणत्याही तज्ञांकडे जाण्याअगोदर किडीचा नमुना वापरलेल्या किडनाशकांची व्यापारी व तांत्

फळे व भाजीपाल्यातील कीडनाशक अवशेष (अंश) व्यवस्थापन🥬| Residue Management in Vegetables| Organic Farming

इमेज
किडी व रोगाचे नियंत्रण प्रामुख्याने रासायनिक किडनाशकांच्या सहाय्याने केले जाते. विषारी रासायनिक किडनाशकांचा अमर्याद वापर केल्यास विषारी अंश कमी अधिक प्रमाणात पीक काढणीच्या वेळी पिकात शिल्लक राहतात. ताजी फळे व भाजीपाल्याचा आहारात समावेश होतो. म्हणून त्यावरील कीडनाशक अंश आरोग्यास कमी-अधिक प्रमाणात अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे अन्नघटकातील कीडनाशक अवशेषांच्या कमाल अवशेष मर्यादा (एम.आर.एल.) ठरविलेल्या आहेत. सुरक्षित अन्नासाठी किडनाशक वापरानंतर कमाल अवशेष मर्यादेपर्यंत पोहोचून काढणीसाठीचे प्रतिक्षा कालावधी काही किटकनाशकांसाठी पुढे दिलेले आहेत. प्रतिक्षा कालावधी हा हवामानानुसार उन्हाळ्यात पावसाळा व हिवाळ्याच्या तुलनेने कमी असतो. पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर रासायनिक कीडनाशकाची आवश्यकतेनुसार अत्यंत माफक वापर करावा. त्यामुळे शेतमालावरील कीडनाशक अवशेष कमाल अवशेष मर्यादेपेक्षा कमी राहील व देशातून होणाऱ्या कृषिमालाच्या निर्यातीतील प्रमुख अडसर दूर होऊन निर्यातीत वाढ होईल. यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करणे हितावह होईल.  १) अधिकृत (केंद्रिय कीडनाशक मंडळ व नोंदणी समिती) शिफारशी

टोमॅटो ब्राऊन रोगस फ्रुट व्हायरस| Brown Rogus Fruit Virus(BRFV)| Disease of Tomato

इमेज
हा टोमॅटो वर येणारा हानिकारक रोग,सर्वात पहिल्यांदा 2014 मध्ये इस्रायल मध्ये ओळखला गेला त्यानंतर युरोपियन देशांत तसेच आशियाई देशात याचा प्रादुर्भाव दिसून असला. रोगग्रस्त टोमॅटो पीक   कारक विषाणू:-   या रोगाच्या विषाणूमध्ये,टोबॅको मोझ्याक (TMV)व टोमॅटो मोझ्याक (ToMV)  या दोन्हींचे जीन्स दिसून आले त्यामुळे या विषाणूला टोमॅटो ब्राऊन रोगस फ्रुट व्हायरस(TBFRV) नाव दिले गेलं.   लक्षणे :-  १.सुरवातीस लक्षणे वरील कोवळ्या  पानांवर दिसायला लागतात. २.पानांच्या कडा आखडायला लागतात,तसेच शिरा पिवळ्या पडायला चालू होतात. ३.प्रादुर्भावग्रस्त  फळावर पिवळे ठिपके पडायला चालू होतात,त्यानंतर त्यावर तपकिरी खडबडीत सुरकुत्या पडतात. ४.फळे जखमी झाले सारखी दिसायला लागतात. ५.पाणी तानाच्या वेळी किंवा कडक उन्हात ही लक्षणे तीव्रतेने दिसतात. ६.रोगाची तीव्रता व लक्षणे झाडाच्या वयानुसार थोडीफार बदलतात. ७.परिणामी बाजारभाव कमी होऊन नुकसान 30 ते 70 टक्या पर्यंत होऊ शकते. रोगग्रस्त टोमॅटो पीक  एकात्मिक व्यवस्थापन:-  १.या रोगासाठी कोणतेही विषाणूनाशक उपलब्ध नाही,कारण दोन विषाणूंचा मिळून हा विषाणू बनलेला आहे. २.तसेच टोमॅटोचे कोण

तण नियंत्रण पद्धती | Weed Management | Weed Management Practices

इमेज
*तण नियंत्रणाच्या पद्धती* १. प्रतिबंधात्मक उपाय:- तणांचा प्रादुर्भाव व तणांची वाढ होऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचा समावेश प्रतिबंधात्मक उपायामध्ये होतो. उदा. प्रमाणित बियाणे वापरणे, तणविरहीत बियाणे पेरणे, पीक पेरणीपूर्वी तणांचा नायनाट करणे. पूर्ण कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत वापरणे, जमिनीची पूर्व मशागत योग्य रितीने करणे, शेताचे बाध पाण्याच्या च री/पाट व शेतातील रस्ते तण विरहीत ठेवणे इत्यादी. २. निवारणात्मक उपाय:- तणाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तणांची तीव्रता कमी करण्यासाठी वापरावयाच्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात. 1.भौतिक व यांत्रिक पद्धतींचा समावेश होतो. उदा. हाताने तण उपटणे, कोळपणी, खुरपणी, खांदणी, मशागत, कापणी, छाटणी, तण क्षेत्रात पाणी साठवणे, जाळणे, आच्छादन करणे इ.  2. स्पर्धात्मक जलद वाढणारी पिके घेणे, योग्य पीक पद्धतींचा व योग्य पेरणी पद्धतीचा अवलंब करणे, हेक्टरी रोपांची संख्या योग ठेवणे, योग्य पीक फेरपालट, आंतरपिक पद्धतीचा अवलंब करणे, खते व पाणी देण्याच्या सुधारित पद्धतीचा वापर करणे इत्यादी (बिगर खर्चिक पद्धती) माशगत पद्धती आंतर्गत येतात.  3. जैविक पद्धतीने तणांचा बंदोबस्

*रासायनिक औषधे/कीटकनाशके वापरण्याच्या पद्धती | Methods of using pesticides | Pesticides use | protecting farm |

इमेज
 शेतकरी चांगले उत्पन्न मिळण्यासाठी बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारची औषधे,रसायने वापरतो. पिकावरील कीड नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो.वेगवेगळ्या पिकामध्ये पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांनुसार रासायनिक औषधांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.     पिकावर येणाऱ्या किडींचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक औषधांचा कीटकनाशकांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतो.  *रासायनिक औषधे/कीटकनाशके वापरण्याच्या पद्धती:-* १)धुरळणी:- भुकटी स्वरूपातील कीटकनाशकांचा वापर धुरळणी करण्यासाठी केला जातो. यामध्ये कीटकनाशकांचे १ ते १० टक्के प्रमाण असून ती पावडर स्वरूपात असतात. धुरळणी प्रामुख्याने सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी हवा शांत असताना करणे गरजेचे आहे.  २)फवारणी:- या पद्धतीचा वापर शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणावर करताना पाहायला मिळतात.यामध्ये द्रव स्वरूपात किंवा पावडर स्वरूपात कीटकनाशके मिळत असून पाण्यामध्ये मिसळून फवारणी पंपाद्वारे किंवा यंत्राद्वारे पिकावर फवारली जातात.फवारणी केल्यामुळे पिकावर आलेल्या किडीवर औषधाचा सम प्रमाणात फवारा केल्यामुळे किडीचे नियंत्रण करणे सोपे होते.  ३)दाणेदार स्वर

कुकुरबिट मोझ्याक |cucurbit mosaic virus| Disease of watermelon

इमेज
  कलिंगडावर येणाऱ्या रोगांपैकी एक म्हणजे कुकुरबिट मोझ्याक (cucurbit mosaic virus) व लीप कर्ल. यांनाच आपण आपल्या भाषेत चुराडा-मुरडा, आकड्या,बोकड्या किंवा कोकळा असे म्हणतो. हा विषाणूजन्य रोग आहे.कुकुरबीट मोझ्याक व्हायरस या विषाणू मुळे हा रोग वेलवर्गीय फळभाज्यावर येतो. *रोग वाहक:-पांढरी माशी🪰* :no_entry_sign:लक्षणे:- 1.मुख्य लक्षणे पानांवर दिसू लागतात. रोगाच्या प्रादुर्भावानंतर पाने आखडायला चालू होतात. 2.पिकाची वाढ खुंटते,फुले  अवेळी गळून पडतात. 3.फळे लागण्यास सुरवात झाली असेल तर फळांची वाढ थांबते. 4.वेलीची वाढ थांबून कोवळा भाग,पाने आखडून जातात. *:x:नियंत्रण उपाय:-* 1. रोगप्रतिकारक वाणांची लागवड करणे. 2. पिकात सुरवातीपासून पिवळे व निळे चिकट सापळे लावून पांढरी माशी नियंत्रनात ठेवावी.कारण पांढरी माशी सर्व विषाणूजन्य रोगांची वाहक म्हणून काम करते. 3. आंतरमशागत करत असताना पिकास इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. 4. सुरवातीस प्रादुर्भाव कमी असताना रोगग्रस्त झाडे शेताबाहेर नष्ट करावीत. 5. तणविरहित शेत राहील याकडे लक्ष द्यावे जेणेकरून पांढरी माशीची वाढ होणार नाही. 6. ज्या पिकांवर पांढरी माशी सर्र

यल्लो वेन मोझँक। भेंडी । भेंडी पिकावरील रोग । Yellow Vain Mosaic Virus YVM

*यल्लो वेन मोझँक* येल्लो वेन मोझँक हा भेंडी पिकावर येणार विनाशकारी विषाणूजन्य रोग आहे.ह्याचा प्रादुर्भाव होताच पानावरील शिरा पिवळ्या दिसायला लागतात. नुकसान:- ह्या रोगामुळे झाडाची प्रकाश संस्लेशन प्रक्रिया मंदावते,झाडांच्या सर्व अवयवांची वाढ खुंटते,फुलगळ होते तसेच आलेले फळ आहे तेवढेच राहते. परिणामी बाजारभाव कमी होवून नुकसान 40 टक्यांपर्यंत जाऊ शकते. प्रतिबंधक उपाय:- या विकाशकारी रोगावर कोणतेही रासायनिक औषधे उपलब्ध नाहीत,त्यामुळे आपण शक्य तितके प्रतिबंधक उपाय करावेत. सलग भेंडी पीक घेऊ नये,पिकाची फेरपालटनी करावी. परभणी क्रांती, अर्का अभय, अर्का अनामिका आणि वर्षा उपर यांसारख्या प्रतिरोधक वाणांची निवड करून रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. रोगग्रस्त झाडे दिसताच त्वरित उपसून शेता बाहेर नष्ट करावीत. शेतात आलेला रोग स्वतःहुन पसरत नाही,तर तो रसशोषक किडीच्या मार्फत पसरवला जातो आणि पांढरी माशी(Bemisia tabaci) ही मुख्यतः या रोगाची वाहक म्हणून काम करते. या पांढऱ्या माशीचे आपण सुरवातीपासून नियंत्रण केले तर येल्लो वेन मोझँक पसरण्यापासून  पूर्णतः रोखु शकतो. https://t.me/Green_Revolutions_IPM_School आप

कलिंगड पिकावर येणारा भुरी रोग| Powdery mildew In Cucumber| Powdery Mildew| Powdery mildew In watermelon

इमेज
*कारणीभूत बुरशी*:-Podosphaera xanthi. *यजमान पिके*:- सर्व वेलवर्गीय फळभाज्या  *लक्षणे:-* *पानांवर व देठावर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसून येते. *जास्तीत जास्त जमिनीलगत असणाऱ्या पानांवर बुरशीची वाढ होते पण बाकीच्याही भागांवर लक्षणे दिसून येतात. *जास्त आद्रतेमध्ये या रोगाची वाढ झपाट्याने होते. पांढऱ्या रंगाची बुरशी संपूर्ण पानभर पसरते. *पानांवरील पांढऱ्या थरामुळे प्रकाश संश्लेषन प्रक्रिया मंदावते. *रोगाचे प्रसरण:-* *हा रोग वाऱ्याद्वारे व रसशोषक किडींच्या मार्फत पसरवला जातो. * रोगाचे  बीजाणू वाऱ्याद्वारे उडून दुसऱ्या निरोगी रोपास रोगग्रस्त बनवू शकतात. * लोकरी मावा सुद्धा या रोगाचा वाहक म्हणून काम करतो. *मावा हा भुरी रोगासोबत कलिंगडावरील इतर रोगांच्या प्रसारणाचे कारण ठरू शकतो. एकात्मिक रोग व्यवस्थापन:- रोगप्रतिकारक वानांची लागवडीसाठी निवड करावी. रोगाचे प्रमाण कमी असताना रोगग्रस्त पाने शेताबाहेर नष्ट करावीत. दोन रोपांमध्ये योग्य अंतर ठेवावे.त्यामुळे रोगप्रसारण वेगाने होणार नाही. शेतातील तण व्यवस्थापण गरजेचे आहे. रसशोषक किडींच्या नियंत्रनासाठी सुरवातीपासून पिवळे निळे चिकट सापळे ल

कलिंगड पिकावर येणारी नागअळी|leafminer in cucurbits|Leafminer

इमेज
ही कीड कलिंगड,दोडका व वेलवर्गीय फळभाज्यांव्यतिरिक्त पत्ताकोबी व फुलकोबी यांवर सुद्धा येते. जीवनचक्र:- अंडी:-अंडी आकारात खूपच लहान आणि नारंगी पिवळ्या रंगाची असतात. अंडी 3-5 दिवसात उबवतात व त्यातून अळी बाहेर पडते.  अळी: अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी पान आतील बाजूने खायला सुरवात करते.पूर्ण वाढ झालेली अळी 3 मिमी लांबीची असते तसेच अळी अवस्थेचा कालावधी सुमारे 7-9 दिवसांचा असतो. कोष: कोषावस्था मातीमध्ये पूर्ण होते. काही वेळेला कोषावस्था पानांमध्ये आढळतात. रेशम कोकूनच्या पातळ सैल जाळीच्या आत कोष तयार होतो. कोषावस्थेचा कालावधी सुमारे 5-7 दिवस असतो. प्रौढ/पतंग/माशी: माशी फिकट पिवळसर  असते, माशीची लांबी 15 मि.मी असते. मादी माशी अंडी घालण्यासाठी पानाच्या वरच्या पृष्ठभागावर पंचर करते. पानाच्या आत अंडी घातली जातात व पुन्हा अंड्यातून अळी बाहेर पडते.एकूण जीवन चक्र 3 आठवड्यात पूर्ण होते. नुकसान लक्षणे:- *हरितद्रव्य खाल्यामुळे पानांची प्रकाश संस्लेशन प्रक्रिया मंदावते. *पाने अवेळी वाळून  गळायला चालू होतात. अनुकूल परिस्थिती:- • उबदार हवामानात या किडीची संख्या झपाट्याने वाढते   https://t.me/Green_Revolut

कलिंगड पिकावर येणारे मुख्य रोग। कलिंगड शेती । बुरशीजन्य रोग

 कलिंगड पिकावर येणारे मुख्य रोग कलिंगड, खरबूज, काकडी ही पिके कीड व रोगास फारच संवेदनशील आहेत. या पिकांवर भुरी, केवडा व मर हे रोग आणि नागअळी, फुलकिडे व फळमाशी या किडींचे वेळीच नियंत्रण आवश्यक आहे. फवारणी करताना किडींची संख्या/आर्थिक नुकसानपातळी विचारात घेऊन गरज असेल तेव्हाच शिफारस केलेल्या रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा. *मर* 15-21 दिवसांनंतर - या रोगाचे दोन प्रकार आहेत. एक बुरशीमुळे होणारी फ्युजारियम मर व दुसरा जिवाणुमुळे होणारी मर. फ्युजारियम मर या रोगाचा प्रादुर्भाव केवळ कलिंगडामध्येच होतो. तर जिवाणूजन्य मरचा प्रादुर्भाव काकडी व खरबुजामध्ये जास्त दिसून येतो. फ्युजारियम मर या रोगग्रस्त खोडाचा मधोमध उभा काप घेतल्यास खोडाच्या लांबीला समांतर तपकिरी रंगाची रेष (उतीचा थर) दिसते. लागवडीनंतर 21-25 दिवसांनी वेलाची एक बाजू वाळते व संपूर्ण पीक नाहीसे होऊ शकते. जिवाणूजन्य मर रोगग्रस्त खोडातून दुधासारखा चिकट द्रव स्रवतो. *केवडा* दमट हवामानात केव्हाही - हा सुद्धा बुरशीजन्य रोग असून खूपच हानिकारक आहे. दमट हवामानात याची लागण व वाढ खूप जोमाने होते. पानांच्या वरच्या बाजूने पिवळ्या रंगाचे लहान ठिपके स

सेंद्रिय शेती का करावी। Organic Farming। विषमुक्त शेती

*कोणते ही पीक असो, पिकाची 2 भागात विभागणी केली जातेच.  1. सेंद्रिय आणि  2. रासायनिक.         *आपण आज जास्त जे आपले उद्दिष्ट आहे त्याच्यावर च बोलू अर्थात च "सेंद्रिय शेती" वर. सेंद्रिय शेती ला विषमुक्त शेती सुद्धा बोलले जाते. तसे बोलण्यामध्ये कारण सुद्धा तितके च प्रबळ आहे, आपण रासायनिक उपचार घेतो म्हणजे च आपण आपल्या शेतीला विष देत असतो. आता बाकी पिकांचे थोडे बाजूला ठेऊ आणि भाजीपाला पीक विषयी बोलू कारण आपल्या रोजच्या वापरातील पीक विभाग आहे.*        *आपण भाजीपाला पिकवतो, विकतो. पण तो पिकवत असताना आपण रासायनिक मारा किती प्रमाणात करतो याचा सुद्धा विचार करायला हवा. कारण तो भाजीपाला आपण, आपल्या घरचे, गावातील लोक, जिल्ह्यातील तसे च राज्यातील देशातील आपले च बांधव खात असतात. जर आजूबाजूची परिस्तिथी पाहिली तर पैश्यासाठी काहीही केले जाते, उद्या/परवा मार्केट ला माल जाणार असेल तर आज खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक फवारणी घेतली जाते ज्याचे अवशेष तसे च त्या मालावर राहतात. जे अप्रत्यक्षरित्या आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात व आपल्याला कॅन्सर सारखे भयंकर आजाराला सामोरे जावे लागते. (जो आजार गरीब - श