कलिंगड पिकावर येणारी नागअळी|leafminer in cucurbits|Leafminer



ही कीड कलिंगड,दोडका व वेलवर्गीय फळभाज्यांव्यतिरिक्त पत्ताकोबी व फुलकोबी यांवर सुद्धा येते.


जीवनचक्र:-


अंडी:-अंडी आकारात खूपच लहान आणि नारंगी पिवळ्या रंगाची असतात. अंडी 3-5 दिवसात उबवतात व त्यातून अळी बाहेर पडते.


 अळी: अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी पान आतील बाजूने खायला सुरवात करते.पूर्ण वाढ झालेली अळी 3 मिमी लांबीची असते तसेच अळी अवस्थेचा कालावधी सुमारे 7-9 दिवसांचा असतो.


कोष: कोषावस्था मातीमध्ये पूर्ण होते. काही वेळेला कोषावस्था पानांमध्ये आढळतात. रेशम कोकूनच्या पातळ सैल जाळीच्या आत कोष तयार होतो. कोषावस्थेचा कालावधी सुमारे 5-7 दिवस असतो.


प्रौढ/पतंग/माशी: माशी फिकट पिवळसर  असते, माशीची लांबी 15 मि.मी असते. मादी माशी अंडी घालण्यासाठी पानाच्या वरच्या पृष्ठभागावर पंचर करते. पानाच्या आत अंडी घातली जातात व पुन्हा अंड्यातून अळी बाहेर पडते.एकूण जीवन चक्र 3 आठवड्यात पूर्ण होते.


नुकसान लक्षणे:-

*हरितद्रव्य खाल्यामुळे पानांची प्रकाश संस्लेशन प्रक्रिया मंदावते.

*पाने अवेळी वाळून  गळायला चालू होतात.


अनुकूल परिस्थिती:-

• उबदार हवामानात या किडीची संख्या झपाट्याने वाढते  


https://t.me/Green_Revolutions_IPM_School


एकात्मिक किट व्यवस्थापन: 

*सुरवातीस प्रादुर्भाव कमी असताना किटग्रस्त पाने शेताबाहेर नष्ट करावीत. 

*मित्र कीटकांचा वापर:-लेसविंग्स, लेडीबर्ड बीटल इ.हे नागअळीचे नैसर्गिक शत्रू आहेत,त्यांची अंडी पिकात सोडल्यास ते या किडीचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतात.

*प्रादुर्भाव कमी असताना निम ऑइल ची फवारनी केलेस नागअळी नियंत्रनात येऊ शकते.

*जर कीड आर्थिक उंबरठा पातळीच्या वर जात असेल तेव्हा किटकनाशक फवारणी चा विचार करावा. उदा.कोणतेही आंतरप्रवाही किटकनाशक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean