पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नारळामधील किडी । Pest of Coconut | एकात्मिक व्यवस्थापन |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 महाराष्ट्रात नारळाची लागवड फार मोठ्या प्रमाणात होत असून किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट दिसून येत आहे. कारण किडींच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला नारळ पिकामध्ये खूप नुकसान झालेले पाहायला मिळते. या लेखामधून आपण या किडींचे नियंत्रण कसे करावे हे बघूया.  गेंड्या भुंगा:- नारळावरील गेंड्या भुंग्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीने बागेतील मेलेल्या माडांची खोडे, कुजलेला पालापाचोळा इत्यादी जाळून नष्ट करावा किंवा त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी.  भुंग्याचा उपद्रव जास्त असताना म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये झाडाला उपद्रव झाला असताना किंवा त्यातून ताजा भुसा बाहेर येताना दिसत असल्यास त्यामध्ये तारेचा हूक घालावा व भुंगे बाहेर काढावेत. नारळाच्या बागेत २ × २ × २ फूट आकाराचे एकूण १o खडे प्रती हेक्टरी खोदावेत. त्यामध्ये शेणखत भरून ठेवावे. अशा खड्ड्यांमधून सापडणा-या अळ्या दर दोन महिन्याने एकत्र करून माराव्यात किंवा खड्ड्यांवर कार्बारील ०.१ टक्केची फवारणी करावी. कीड नियंत्रणासाठी त्यामध्ये एन्टोमोपॅथोजेन म्हणजेच बुरशी (मेटारिझियम अॅनिसोप्लिया) खताच्या खड्ड्यांत घाला. प

नारळामधील किडी । Pest of coconut |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱  नारळ हे सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात लागवड केले जातात. जास्त प्रमाणात घेतले नसेल तरीही बरेच शेतकरी शेताच्या बांधावर तरी एक दोन झाडे नक्कीच लावतात. त्यामुळे सर्व भागामध्ये नारळाची झाडे लावलीच जातात. ज्या पद्धतीने सर्व झाडावर किडींचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे नारळावरही होतो.      नारळाच्या झाडावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. काही किडींच्या जास्त प्रमाणात प्रादुर्भावामुळे संपूर्ण झाड मरु शकते.तर काही वेळेला मोठ्या प्रमाणात फळगळ झालेली सुद्धा दिसून येते.कोणत्या किडींचा पिकामध्ये प्रादुर्भाव होतो हे माहिती असल्यास आपण प्रतिबंधात्मक उपाय करून सुद्धा नियंत्रण करू शकतो. आज आपण नारळामध्ये कोणत्या किडी येतात याची माहिती घेऊया.  नारळावरील महत्वाच्या किडी गेंडयाभुंगा:-   या किडीचा प्रौढ भुंगा माडाच्या शेंडयामध्ये नवीन येणारा कोंब किंवा सुई पोखरून खातो. नवीन वाढणारी सुई कुरतडली गेल्यामुळे लागण झालेल्या माडाच्या झावळया त्रिकोणी आकारात कात्रीने कापल्यासारख्या दिसतात. लहान रोपांमध्ये सुई भुंग्याने खाऊन फस्त केल्यास अशा रोपांना नवीन सुई येत नाही. काही वेळेस न उमललेली पोयदे

कोबीवर्गीय पिक | Disease of Cruciferous crops | रोग

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 कोबी वर्गातील पिके म्हणजे कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या संपूर्ण देशात घेतल्या जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या भाज्या आहेत. ज्याप्रमाणे रोग आणि किडींमुळे सर्व भाज्यांचे नुकसान होते, तसेच कोबी वर्गाच्या भाज्यांमध्येही होते. किडी व्यतिरिक्त त्यात काही घातक रोग आढळून येतात, त्यामुळे उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांहून अधिक नुकसान होऊ शकते.आज आपण कोबीवर्गीय पिकांमध्ये कोणते रोग येतात हे जाणून घेऊ.  कोबीवर्गीय पिकांमध्ये येणारे रोग   डॅम्पिंग-ऑफ:- हा रोग सामान्यपणे बियाणे आणि नवीन लावलेल्या कोवळ्या रोपांवर दिसून येतो. रोग जमिनीत जन्मलेल्या पायथियम या बुरशीमुळे होतो.प्रादुर्भाव झालेले बियाणे जमिनीत कुजतात. रोप लावलेले ओलसर दिसते पण ते मातीच्या रेषेवर कुजतात आणि शेवटी ते मारून पडतात.  डाउनी मिल्ड्यू:- हा रोग Hyloperonospora brassicae या बुरशीमुळे होतो. रोपे आणि परिपक्व भाजीपाला दोन्हींवर हल्ला करू शकतो. संक्रमित झाडे पानांच्या खालच्या पृष्ठभागावर राखाडी साचा तयार करतात. संक्रमित झाडांच्या पानांचा वरचा भाग प्रथम पिवळा होतो आणि नंतर तपकिरी किंवा नेक्रोटिक होऊ शकतो. पाने कोमेजून मरतात. लक्षणे

शेवगा | Pest of Drumstick | कीड |

इमेज
  🏫IPM SCHOOL🌱 कोरडवाहू आणि हलक्या जमिनीमध्ये येणारे चांगले पीक म्हणजे शेवगा. शेवगा हे कमी पाणी क्षेत्रामध्ये तग धरून राहते आणि चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते. सध्या पावसाची स्थिती चांगली आहे, पण बऱ्याचवेळा पाऊस कमी होत असतो. यामुळे अशा परिस्थितीत तग धरुन राहणारे पीक म्हणजे शेवगा. पण या पीकावरही रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होत असतो.  शेवगा पिकामध्ये येणारी कीड फुलकिडे:-  या किडीची पिले आणि प्रौढ कोवळी पाने आणि शेंगांचा पृष्ठभाग खरवडतात आणि त्यातून रस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर आणि शेंगांवर चट्टे पडतात. शेंगांचा आकार वेडावाकडा होतो. फुलकिडे खरवडलेल्या भागावर बुरशींचा शिरकाव होऊन बुरशीजन्य रोग वाढतात. तसेच शेंगांची प्रत खराब होते. नियंत्रण:-  लागवडीच्या वेळी जमिनीमध्ये निंबोळी पेंडीचा वापर करावा. शेतामध्ये प्रति एकरी २० निळे चिकट सापळे लावावेत. फुलकिडे दिसू लागल्याबरोबर करंज तेल १ मि.ली. प्रति लीटर याप्रमाणे फवारावे. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत असल्यास रासायनिक फवारणी करावी त्यामध्ये  डायफेन्थुरॉन ५० डब्ल्युपी १२  ग्रॅम, फिप्रोनील ५ एससी ३० मिली किंवा अॅसिफेट ७५  एसपी ८ ग्रॅ

निंबोळी खत | Neem Fertilizers | फायदे |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 सध्या हळू हळू सेंद्रिय शेतीचे महत्व वाढत चालले आहे. शेतातील वाढता रासायनिक खतांचा वापर,रसायनांचा वापर यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत असल्याने लोकांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढू लागला आहे. वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे लोकांना कॅन्सर सारख्या आजारांची आणि वेगवेगळ्या रोगांची लागण होत आहे. सेंद्रिय शेतीमध्ये खत म्हणून नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जातो. यामध्ये पालापाचोळा, शेण, गांडूळखत आणि लिंबोळ्या पासून बनवलेले आणि कुजवलेले खत यांचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडापासून मोठ्या प्रमाणात खत निर्मिती केली जाते. त्यास आपण ऑरगॅनिक खत असे सुद्धा म्हणतो. लिंबाचा पाला आणि त्याच्या लिंबोळ्या या पासून निंबोळी पेंड तयार केली जाते.ऑरगॅनिक स्वरूपाचे खत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी या खताला आहे तसेच सेंद्रिय शेती साठी अत्यंत आवश्यक अशी ही निंबोळी पेंड आहे. निंबोळी पेंड ही फळबागायतदार कांदा उत्पादक शेतकरी आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी वर्गाला खूप आवश्यक आहे.  आपण शेतीमध्ये हे निंबोळी खत पेंड स्वरूपात किंवा पावडर(भुकटी) स्वरूपात वापरू शकतो. तर आज आपण निंबोळी खताचे फायदे ज

उसावर येणाऱ्या लोकरी माव्याचे व्यवस्थापन | Sugarcane farming | ऊसशेती

इमेज
 *🏫IPM SCHOOL🌱* *उसावर येणाऱ्या लोकरी माव्याचे व्यवस्थापन:-* ऊस पानांच्या खालील बाजूस मावा आढळतो. पंखी माव्याची मादी काळसर, तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट दिसते, म्हणून त्यास पांढरा लोकरी मावा म्हणतात. या किडीचा प्रसार, वारा, मुंग्या, किडग्रस्त पाने किंवा बेणे याद्वारे होतो.  *नुकसान:-*  पिल्ले आणि प्रौढ माद्या ऊसाच्या पानाखाली स्थिर राहून रस शोषतात. त्यामुळे पीक निस्तेज होते व पानांच्या कडा सुकतात. पानावर काळी बुरशी वाढून पाने काळी होतात. उपद्रव अति झाल्यास ऊस कमकुवत होतो, वाढ खुंटते, ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात घट होते.  *अनुकूल वातावरण:-* ढगाळ हवामान, ७० ते ९५% सापेक्ष आर्द्रता असे हवामान लोकरी माव्याच्या वाढीस अनुकूल आहेत. प्रादुर्भाव जूनपासून वाढत जाऊन सप्टेंबरमध्ये सर्वात जास्त असतो.   *नियंत्रण:-* * प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील ऊस बियाणे नवीन ऊस लागवडीसाठी वापरू नये.  * ऊसाची लागवड पट्टा किंवा रुंद सरी पद्धतीने करावी म्हणजे या किडीच्या व्यवस्थापनास मदत होईल.  * सुरुवातीस पानांवर लोकरी मावा आढळल्यास, ती प्रादुर्भावग्रस्त पाने काढून जाळून टाकावीत.  * ऊस पिकासाठी जास्त प्रमाणात

टोमॅटो | विषाणूजन्य रोग | Viral Disease of Tomato |

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 टोमॅटोवरील विषाणूजन्य रोग सातत्याने बदलणारे तापमान व अनुकूल वातावरणामुळे टोमॅटोमध्ये विषाणूचा प्रसार करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. विषाणूजन्य रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन रोगाची तीव्रता झपाट्याने वाढते. याशिवाय विषाणूजन्य रोगाच्या प्रसारासाठी हि महत्त्वाची कारणे आहेत- रोग नियंत्रणासाठी रोपवाटिकेत काळजी न घेणे,  शिफारशीनुसार हंगामासाठी योग्य जातींची निवड व लागवड न करणे, इ. टोमॅटो पिकावर सुमारे १५-२० प्रकारचे वेगवेगळे विषाणूजन्य रोग कमी जास्त प्रमाणात स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे आढळतात आणि त्यांचा प्रसार प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे इ रसशोषक किडीमुळे होतो. काही विषाणू रोगांचा प्रसार स्पर्श, रोगग्रस्त बियाणे तसेच पिकांच्या अवशेषांमार्फतही होतो. म्हणून विषाणूजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासून अवशेषांच्या व्यवस्थापनापर्यंत योग्य त्या उपाययोजनाचा अवलंब केला पाहिजे. कुकुंबर मोझॅक व्हायरस CMV (काकडी मोझॅक विषाणू):-    या रोगाचा प्रसार मावा किडीच्या माध्यमातून होतो. पानांवर हिरवट व पिवळे असंख्य ठिपके दिसून येतात.याची लक्षणे थोड्या फार फरका

पिवळे-निळे चिकट सापळ्यांचे कीड व्यवस्थापनातील महत्व| Use of Sticky Trap | Yellow Sticky Trap| Blue Sticky Trap

इमेज
 *🏫IPM SCHOOL🌱* पिवळे-निळे चिकट सापळ्यांचे कीड व्यवस्थापनातील महत्व *पिवळे व निळे चिकट सापळे हे मुख्यत: रसशोषक किडी नियंत्रणाचे काम करतात. *पिवळा चिकट सापळा:-* पांढरी माशी,मावा,तुडतुडे  हे कीटक आकर्षित होतात. *निळा चिकट सापळा:-* फुलकिडे(थ्रीप्स),नागअळीचे पतंग,चौकोनी टिपक्यांचे पतंग हे कीटक आकर्षित होतात. * एकरी किमान 30 ते 40 चिकट सापळे लावले जातात. सर्व पिकामध्ये आपण या सापळ्यांचा वापर करू शकतो. एखाद्यावेळी कांद्यासारख्या पिकामध्ये फुलकिड्यांचा(थ्रीप्स) नियंत्रणासाठी 60 ते 80 निळे चिकट सापळे लावावे लागतात. * रसशोषक किडी पिकातील हरितद्रव्य शोषून घेतात त्यामुळे पिकाची आंतरिक प्रक्रिया खालावून किट इतर रोगांना बळी पडते.  * पांढरी माशी,मावा,थ्रीप्स, हे कीटक विषाणूजन्य रोगांचे वाहक म्हणून काम करतात. त्यामुळे विषाणूजनीत रोग पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवले जातात. * उदा. मिरची मध्ये येणारा चुरडा-मुरडा,भेंडी मध्ये येणारा येल्लो व्हेन मोझ्याक,वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये येणारा कुकुरबीट मोझ्याक व्हायरस, हे विषाणूजन्य रोग पिकाची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यानंतर पिकात शिरकाव करतात.  * जेव्हा रस

बी.टी. किटकनाशके काय आहेत? | कशी काम करतात? | B. T Insecticides

इमेज
 बी.टी. किटकनाशके काय आहेत? कशी काम करतात?  बी. टी कीटकनाशके एकात्मिक कीड नियंत्रणातील (Integrated pest management) महत्त्वाचे जैविक घटक आहेत. बॅसिलस थुरिंजेन्सिस (Bacillus thuringiensis; Bt) या जमिनीतील जीवाणूपासून मिळणारी कीटकनाशके अनेक प्रकारच्या किडींविरुद्ध काम करतात. या जीवाणूंचे नैसर्गिक बचावतंत्र असलेले क्राय (Cry) जनुक व क्राय प्रथिने जैविक कीटनाशके म्हणून यशस्वी ठरली आहेत. *बी.टी कीटकनाशकांचे कार्य:-* बी. टी विषे (Toxins) मुख्यत: कीटकांच्या अळ्यांना आपले लक्ष्य करतात. सी. ओ. नोल्स (C. O. Knowles) या शास्त्रज्ञांना १९९४ मध्ये क्राय प्रथिनांची कार्यपद्धती पूर्णपणे उलगडण्यात यश आले. बॅ. थुरिंजेन्सिस बीजाणू अवस्थेत जाताना विषारी प्रथिने स्फटिक रूपात तयार करतो. हे बीजाणू मातीत व वनस्पतींच्या पृष्ठभागांवर चिकटून राहतात. क्राय प्रथिने बॅ. थुरिंजेन्सिसच्या बीजाणूंमध्ये पूर्व-प्रथिन (Precursor-proteins) स्वरूपात सुप्त अवस्थेत असतात. कीटकांच्या अळ्या पाने भक्षण करत असताना ही विषे त्यांच्या पोटात जातात. अळीच्या अन्ननलिकेचा अंतर्गत पीएच (pH) अल्कधर्मी असतो. यामुळे १३०−१४० kDa (किलो डाल्ट

ऊस | Pest of Sugarcane | किडींचा प्रादुर्भाव

इमेज
महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे नगदी पीक म्हणजे ऊस. पश्चिम महाराष्ट्रात तर मोठे क्षेत्र या पिकाखाली येते. कारण इतर पिकामध्ये वातावरणातील बदलामुळे तसेच कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पण ऊस पिकामध्ये याच्यामुळे मोठे नुकसान होत नाही.     जसे सर्व पिकांमध्ये वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे ऊसामध्येही वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.आज आपण जाणून घेणार आहोत ऊस पिकामध्ये कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.  ऊसामध्ये सुरुवातीला येणारा खोड कीड:-     या किडीचा प्रादुर्भाव ऊस लागणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत दिसून येतो. हलकी जमीन, कमी पाणी व जास्त तापमान यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढतो. वाळलेल्या पोंग्यावरून, तसेच बुडख्याजवळ असलेल्या लहान लहान छिद्रांवरून ही कीड ताबडतोब ओळखता येते. कांडी कीड:- या किडीचा प्रादुर्भाव मे ते सप्टेंबर या कालावधीत जास्त आढळतो. जास्त तापमान, कमी आर्द्रता आणि कमी पाऊस यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उसाची वाढ कमी होते, कांड्या लहान राहतात, पांगशा फुटतात, पाचट काढले असता त्यात किडीची विष्ठा व भु

जिवाणू खते | Bio-Fertilizers | Benefits |

इमेज
  जिवाणू खते(Bio-Fertilizer)   जमिनीमध्‍ये विविध प्रकारचे असंख्‍य सूक्ष्‍म जीवजंतू वास्‍तव्‍य करत असतात. काही सुप्‍तावस्‍थेत असतात, काही पिकांना अन्‍नद्रव्‍य उपलब्‍ध करून देतात, काही रोग निर्माण करणारे तर काही रोगाला प्रतिबंधक असतात. त्‍यात, बुरशी, बॅक्‍टेरिया, ऍक्टिनोमायसिटीस यांचा समावेश होतो. त्‍यातील उपयुक्‍त जिवाणू मातीपासून विलग करून त्‍यांची उपयुक्‍ततेच्‍या दृष्‍टीने कार्यक्षमता बघितली जाते. * असे कार्यक्षम जिवाणू प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात वाढवून ते जमिनीत पुन्‍हा वापरल्‍याने त्‍यांची जमिनीतील संख्‍या वाढते.  * हवेतील मुक्‍त नत्र स्थिरीकरण, स्‍फुरद विरघळवणे, सेंद्रिय पदार्थांचे विघटन इत्‍यादी उपयुक्‍त क्रियांतून पिकांना आवश्‍यक असा अन्‍नद्रव्‍याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होऊन उत्‍पादनात लक्षणीय वाढ होते. * सेंद्रिय पदार्थांचे विघटन दोन किंवा तीन अवस्‍थेत होते. सेंद्रिय पदार्थाचे विघटन होऊन पिकांना लागणारी अन्‍नद्रव्‍ये हे जिवाणू उपलब्‍ध करून देतात. जीवाणू खतांचे फायदे:- * जीवाणू खते सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचा घटक असून पर्यावरणाचे संवर्धन होते. * जिवाणूंच्या वापरामुळे बियाणांची

गुलाब पिकामध्ये येणाऱ्या किडी | Pest | Rose Farming |

इमेज
    काही शेतकरी सध्या गुलाब शेती करू लागले आहेत.कारण गुलाब फुलाला बाजारामध्ये चांगला भाव देखील मिळतो. सर्व पिकामध्ये ज्याप्रमाणे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे गुलाब पिकामध्ये सुद्धा होतो. शेतकऱ्याला जर पिकामध्ये येणाऱ्या किडी आणि रोगांची माहिती असेल तर सुरुवातीपासूनच त्या गोष्टींची काळजी घेऊन पिकाचे नुकसान वाचवू शकतो आणि सोबत कीड रोग प्रतिबंधासाठी होणारा खर्चही नियंत्रणात ठेऊ शकतो.     तर आज आपण गुलाब पिकामध्ये येणाऱ्या किडींची माहिती करून घेणार आहोत.  गुलाब पिकामध्ये येणाऱ्या महत्वाच्या किडी खवलेकिड:-  ही अतिशय सुक्ष्म कीड असून ती स्वत भोवती मेणासारख्या चिकट पदार्थाचे कवच तयार करून त्यामध्ये राहते. ही कीड फांद्यावर किंवा पानांवर सतत एकाच ठिकाणी राहून अन्नरस शोषण करते. या कीडीचा प्रादुर्भाव झाल्यास फांदया आणि पाने सुकून जातात. मावा:-   या किडीची पिवळसर हिरवट रंगाची पिल्ले तसेच काळसर तपकिरी रंगाचे प्रौढ कोवळे शेंडे, कळ्या आणि पानांच्या मागील बाजूस पुंजक्याने राहून अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पाने, शेंडे आणि कळ्या निस्तेज होऊन त्यांची वाढ खुंटते. पाने पिवळी पडून वाळतात. 

ट्रायकोडर्मा मित्रबुरशीचा रोग नियंत्रणासाठी वापर| Use Of Trichoderma in Disease Management | Trichoderma

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 ट्रायकोडर्मा मित्रबुरशीचा रोग नियंत्रणासाठी वापर  आजपर्यंत आपण अनेक बुरशीजनीत रोगांच्या नियंत्रणासाठी विविध प्रकारची रासायनिक बुरशीनाशके वापरली असतील. जसे त्यामधील आंतरप्रवाही असतील,तर काही स्पर्शशील पण या शत्रूबुरशीवर फ़क्त रासायनिकच बुरशीनाशके उपाय आहेत का? तर नाही.. निसर्गाचा एक महत्वाचा नियम आहे *'जिवो जीवस्य जीवनम्'* म्हणजे कोणत्याही जीवाची पर्यावरणातील संख्या नियंत्रित राहण्यासाठी,त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी दुसरा जीव हा असतोच. त्याप्रमाणे पिकास अपाय करणाऱ्या बुरशी,जिवाणू,विषाणू,किटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी निसर्गाने सोय केलेलीच आहे. असे फायदेशीर घटक शेतकऱ्यांना उपयोगी ठरतात व पर्यावरण पूरक व्यवस्थापन करण्यास मदत करतात. त्यांपैकीच एक म्हणजे *ट्रायकोडर्मा* ही मित्र बुरशी होय. सरासरी सर्वच पिकामध्ये सुरवातीपासून मूळकुज, खोडकुज,मर,कॉलररॉट तर हे रोग मातीजणीत बुरशीरोग फ़ायटोप्थेरा,फ्युज्यारिअम,रायझोक्टेना,व्हर्टिसिलीअम यांसारख्या अपायकारक बुरशीमुळे पिकास होतात.अशा अपायकारक बुरशींना नियंत्रीत करण्यासाठी ट्रायकोग्रामा  एक पर्यावरण पूरक व प्रभावी उपाय

कलिंगड | Fruit cracking | कारणे आणि उपाय |

इमेज
उन्हाळ्यात सर्वात जास्त मागणी असणारे फळ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्यात सर्वांना आवडणारे आणि बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी कलिंगडला असते.त्यामुळे शेतकऱ्यांना कलिंगड पीक घेतल्यास चांगला फायदा नक्की मिळतो.   कलिंगड पीक घेताना शेतकऱ्याला वेगवेगळ्या समस्या येतात त्यापैकी एक म्हणजे फळ तडकण्याची समस्या. फळ पूर्ण तयार होऊन तडकल्यामुळे अश्या फळांना बाजारात मागणी नसते त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. तर आज आपण फळे तडकण्याची कारणे काय काय असू शकतात ते बघूया.   फळे तडकण्याची कारणे  पाणी व्यवस्थापन:-  पिकाला फळ अवस्थेत दोन पाण्यांमधील अंतर जास्त राहिले तर जमीन जास्त काळ कोरडी पडते. याचा परिणाम वेलींना पाणी कमी पडल्यामुळे फळांमधील पाणी बाष्पीभवनामुळे उडून जाऊ नये म्हणून फळांची साल घट्ट बनते. परंतु अश्या वेलींना पुढे अचानक जास्त पाणी दिल्याने वेली वेगाने पाणी शोषून घेतात व जास्त पाण्यामुळे फळांमध्ये दबाव निर्माण होऊन फळांच्या सालीवर तडे जातात. यामुळे फळांची गुणवत्ता खालावते.  हवामान बदल  जास्त अथवा कमी तापमान, दिवस रात्रीच्या तापमानात जास्त तफावत आणि जास्त आर्द्रता यामुळे फळांच्या सालीवर आणि वाढीवर प