जिवाणू खते | Bio-Fertilizers | Benefits |
जिवाणू खते(Bio-Fertilizer)
जमिनीमध्ये विविध प्रकारचे असंख्य सूक्ष्म जीवजंतू वास्तव्य करत असतात. काही सुप्तावस्थेत असतात, काही पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात, काही रोग निर्माण करणारे तर काही रोगाला प्रतिबंधक असतात. त्यात, बुरशी, बॅक्टेरिया, ऍक्टिनोमायसिटीस यांचा समावेश होतो. त्यातील उपयुक्त जिवाणू मातीपासून विलग करून त्यांची उपयुक्ततेच्या दृष्टीने कार्यक्षमता बघितली जाते.
* असे कार्यक्षम जिवाणू प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात वाढवून ते जमिनीत पुन्हा वापरल्याने त्यांची जमिनीतील संख्या वाढते.
* हवेतील मुक्त नत्र स्थिरीकरण, स्फुरद विरघळवणे, सेंद्रिय पदार्थांचे विघटन इत्यादी उपयुक्त क्रियांतून पिकांना आवश्यक असा अन्नद्रव्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
* सेंद्रिय पदार्थांचे विघटन दोन किंवा तीन अवस्थेत होते. सेंद्रिय पदार्थाचे विघटन होऊन पिकांना लागणारी अन्नद्रव्ये हे जिवाणू उपलब्ध करून देतात.
जीवाणू खतांचे फायदे:-
* जीवाणू खते सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचा घटक असून पर्यावरणाचे संवर्धन होते. * जिवाणूंच्या वापरामुळे बियाणांची चांगली व लवकर उगवण होते.
* नत्र, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून पिकांची जोमदार वाढ होते आणि पिकांची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते.
* रासायनिक खतांची २० ते २५ % मात्रा कमी होउन उत्पादन खर्चात बचत होते व पीक उत्पादन १० ते १५ टक्क्याने वाढते.
* तसेच जमिनीची सुपीकता वाढून पोत सुधारतो आणि दुसडीच्या पिकांवर चांगला परिणाम होतो. जिरायत जमिनीत जीवाणू खतांचा चांगला फायदा होतो.
पीक वाढीसाठी सूक्ष्मजीवजंतू महत्त्वाचे कार्य पार पडत असतात.त्यामध्ये वेगवेगळे नत्रयुक्त जिवाणू खते, स्फुरदयुक्त जिवाणू खते, पालाश जिवाणू खते, तसेच इतर उपयुक्त जिवाणू खते, ऍसेटोबॅक्टर (Acetobacter), अझोला (Azolla), आझोलाच्या विविध जाती, अझोलाचे फायदे, मायकोरायझा (Micronize), निळे-हिरवे शेवाळ (Blue-Green Algae)यासारखे वेगवेगळी जिवाणू खते बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होतात.
जिवाणू खतांच्या वापरामुळे जमिनीमध्ये उपयोगी सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते आणि पिकाला उपयोगी अन्नद्रव्ये मिळतात. जिवाणूंमुळे पिकाची वाढ तर चांगली होते आणि जमिनीची सुपीकता सुद्धा वाढण्यासोबत टिकून राहते.त्यामुळे नक्कीच या खतांचा वापर करायला हवा.
संदर्भ-मॉडर्न अग्रोटेक.
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा