पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उन्हाळी सोयाबीन आवश्यक बाबी| Soyabean Crop For Summer| Soyabean Crop Management for Summer

इमेज
                                                 *१) जमीन :-*   सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे. अत्यंत हलक्या जमीनीत सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन येत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमीनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये . जमीनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे  *२) हवामान :-*  सोयाबीन हे पीक सुर्यप्रकाशास संवेदनशील आहे. सोयाबीन पीकासाठी समशितोष्ण हवामान अनुकूल असते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते. सोयाबीन पीक २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते; परंतू, कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फूले व शेंगा गळतात. शेंगाची योग्य वाढ होत नाही आकार कमी होतो  *३) वाण:-* पेरणीसाठी किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे आवश्यक आहे. पेरणीसाठी वनामकृवि, परभणीने विकसीत केलेल्या एमएयुएस ७१, एमएयुएस १५८ व एमएयुएस ६१२ या वाणांची किंवा महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीने विकसीत केलेल्या केडीएस ७२६, केडीएस ७५३ या वाणांची किंवा जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय, जबलपूर ने विकसीत केलेल्या ज

भेंडी | Disease Resistance | Varieties |

इमेज
 महाराष्ट्रामध्ये वेगवेगळा भाजीपाला कमी अधिक प्रमाणात सर्व भागामध्ये पिकवला जातो. त्यामध्ये सर्व हंगामामध्ये भेंडीचे पीक घेतले जाते.कोणत्याही पिकाचे चांगले उत्पन्न मिळण्यासाठी कीड आणि रोग व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे.त्यामध्ये रोग प्रतिबंधक कीड प्रतिबंधक वाण वापरल्यास नक्कीच चांगल्या पद्धतीने कीड आणि रोगापासून पिकाचे संरक्षण आणि चांगले उत्पन्न नक्की मिळू शकते.  *भेंडी पिकाचे रोग प्रतिरोधक वाण:-* *फुले विमुक्त:-* येलो व्हेन मोझॅक विषाणू रोग प्रतिरोधक भेंडी जातीची फुले विमुक्ताची शिफारस केली जाते.आकर्षक हिरव्या रंगाची फळे, चमकदार,पिवळ्या शिरा मोज़ेक विषाणू रोगास प्रतिरोधक, पांढऱ्या माशी, जॅसिड्स आणि फळ पोखरणाऱ्या अळीस सहनशील हा वाण आहे.  *पुसा सावनी:-*  आय.ए. आर.आय विकसित या जातीची फ़ळे १०-१५ से.मी लांब हिरवी मुलायम झाडावर काटेरी लव देठावर तांबूस छटा फुले पिवळी व प्रत्येक पाकळीवर पिवळा ठिपका,सुरुवातीला येलो मोझॅक व्हायरस रोगास प्रतिकारक परंतु सद्या व्हायरस रोगास बळी पडते. हेक्टरी ८-१० टन उत्पादन मिळते.  *परभणी क्रांती:-*  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित जात आहे. फळे ७-१० सेमी ल

सेंद्रीय शेती किंवा नैसर्गिक शेती

इमेज
नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती या पध्दती जवळपास एकच आहेत.कारण दोन्हीमध्ये नियम तत्वे कार्य एकच आहेत.नैसर्गिक शेतीमध्ये स्थानिक किंवा आपल्या शेत परिसरातील नैसर्गिक स्रोतांचा किंवा निविष्ठाचा वापर करणे. नैसर्गिक शेतीमध्ये पर्यावरणात मिळणाऱ्या घटकाचाच वापर शेतीमध्ये केला जातो.तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण सेंद्रिय जैविक खते कीडनाशके विकत घेऊन त्यांचा वापर शेतीमध्ये केला जातो.   सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय.शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष शेण गोमूत्र नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते.सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे यामुळे वाफ्यात पाणी टिकून राहते.बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते.नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते.   *वैशिष्ट्ये:-* * मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.पिके व आजुबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्त्वांचा व सभोवतालच्या सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर. * निसर्गाचे संतु

सापळा पिक | Trap Crop | एकात्मिक कीड व्यवस्थापन

इमेज
एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धतीने कीड नियंत्रण करण्याच्या विविध घटकांपैकी सापळा पीक उपयुक्त पद्धत आहे. सापळा पिकाचा कीड व्यवस्थापनामध्ये वापर केल्यास निसर्गाचा समतोल राखून कीड आर्थिक नुकसान पातळी खाली रोखता येते.    सापळा पिके हा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक आहे. मुख्य पिकाचे हानिकारक किडीपासून संरक्षण करण्यासाठी हंगामानुसार किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावल्यास कीड त्या पिकाकडे आकर्षित होते. यामुळे मुख्य पिकाचे संरक्षण होते. सापळा पीक लावल्यामुळे रासायनिक कीटकनाशक फवारणीवर होणारा खर्च कमी होतो. मित्र किडींची संख्या संतुलित राहण्यास मदत होते. या सोबतच सापळा पिकापासून अतिरिक्त उत्पन्न मिळते. पर्यावरणाचे संवर्धन होते. मुख्य पिकाच्या उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. भाजीपाला आणि फळपिकामध्ये सापळा पिकाचा उपयोग अतिशय उपयुक्त आहे. *कोणत्या सापळा पिकांकडे कोणती कीड आकर्षित होते?* * एरंडी या सापळा पिकाची एक ओळ मुख्य पिकाच्या कडेने लावल्यास तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा मादी पतंग एरंडीच्या पानावर समूहाने अंडी घालते. त्यामुळे अंडीपुंज आणि प्रादुर्भावग्रस्

Vegetables Fruit Fly | वेलवर्गीय फळमाशी | एकात्मिक व्यवस्थापन

इमेज
 वेलवर्गीय फळभाज्या जसे कलिंगड,काकडी,खरबूज, दोडका,कारले,भोपळा यांमध्ये प्रमुख कीड येते ती म्हणजे फळमाशी.               सर्व फळमाश्या सारख्या दिसत असल्या तरी वेलवर्गीय फळभाज्यामध्ये येणारी फळमाशी वेगळी असते तर फळवर्गीय पिके जसे आंबा,पेरू,चिकू,सीताफळ, यावर येणारी फळमाशी ही वेगळी येते.  फोटो:- वेलवर्गीय फळभाज्यामध्ये येणारी फळमाशी - मेलन फ्रुट फ्लाय(B.cucurbitae)  जीवनचक्र:- फळमाशीचे जीवनचक्र माशी-अंडी-अळी-कोष-पुन्हा माशी या टप्प्यामध्ये पूर्ण होते. जेव्हा वेलवर्गीय फळभाज्या फुलोरा अवस्थेत येतात,तेथून पुढे फळमाशीचा प्रादुर्भाव पिकामध्ये व्हायला चालू होतो. फळे लिंबू एवढ्या आकाराची असताना तेव्हा मादी माशी त्यावर बसून साली मध्ये अंडी देतात. काही दिवसात अंड्यामधून अळी (Maggots) बाहेर पडतात. ह्या अळ्या फळामधील गर खायला चालू करतात. पूर्ण वाढ झालेली अळी फळामधून बाहेर पडते. मातीमध्ये किंवा पालापाचोळ्यात कोषावस्थेमध्ये जातात. आठड्याभरात कोषावस्था पूर्ण करून त्यामधून माशी बाहेर पडते. हीच माशी पुन्हा फळांना डँख मारते. अश्या प्रकारे 25-35 दिवसात फळमाशीचे जीवनचक्र पूर्ण होते. नुकसान:- * जेव्हा माशी फळ

ऊस खोडवा | पाचट ठेवण्याचे फायदे | Organic Farming | Sugarcane|

इमेज
पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते. त्यामुळे जीवाणू वा गांडुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. पीक वाढीनुसार पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, कमी होणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होत आहे. यावर ऊस पाचट व्यवस्थापन हा योग्य व शाश्वत उपाय आहे.  खोडवा उसाकडे दुर्लक्ष होते. उसाची तोडणी झाल्यानंतर बहुतांशी क्षेत्रावरील उसाचे पाचट जाळून टाकले जाते. तसेच शेणखत वापराचे प्रमाण कमी झाले आहे. पाचट जाळल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जळून नष्ट होतात, परिणामी जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण फारच कमी होते. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर बिघडत आहे.  ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक सरी ठेवून कुजविल्यास पाण्याचा वापर ५० टक्‍क्‍यांपर्यंत कमी होऊ शकतो. जमिनीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकते. अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा खर्चात बचत होते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून ओलावा जास्त काढण्यास मदत होते.    * एक हेक्‍टर क्षेत्रामधून सुम

मक्क्यावरील अमेरिकन लष्करी अळी | FAW | Maize pest |

इमेज
मक्क्यावरील अमेरिकन लष्करी अळी  शास्त्रीय नाव:- Spodoptera frugiperda(Fall army worm)  महत्वाचे:-  या किडीच्या पतंगाची उडण्याची क्षमता खूप जास्त असते. पतंग एका रात्रीत 100 किमी पर्यंत प्रवास करू शकतो. त्यामुळे या किडीचा मोठ्या प्रमाणात फैलाव होतो.  *जीवनचक्र:-*  ही बहुभक्षीय कीड पतंग-अंडी-अळी-कोष आणि पुन्हा पतंग या अवस्थामधून आपले जीवनचक्र पूर्ण करते. किडीचे पतंग राखाडी तपकिरी रंगाचे असतात. मादी पतंग एकावेळी 200-300 च्या समूहात अंडी देतात व संपूर्ण मादी अवस्थेत 1500 ते 2000 अंडी देऊ शकतात. 3 ते 4 दिवसात अंड्यातून अळी बाहेर पडते. अळी  6 वेळा कात टाकून पूर्ण वाढते. अळी राखाडी रंगाची आणि त्यावर काळे ठिपके असतात. अळीच्या डोक्यावर उलट्या आकाराचे 'Y'  असते व पाठीच्या शेवटी चार काळे गडद ठिपके असतात त्यामुळे या अळीचे वेगळेपण लक्ष्यात येते. 15 ते 20 दिवसात अळी अवस्था पूर्ण होते. पूर्ण वाढ झालेली अळी मातीमध्ये,पाल्यापाचोळ्यात कोषावस्थेत जाते.लालसर तपकिरी रंगाच्या कोषातून 5 ते 6 दिवसात पतंग बाहेर पडतो.   *नुकसान:-*  ही कीड मक्का पिकाच्या सर्व अवस्थामध्ये उपद्रव करते.पतंग पानावर अंडी देतो.

कलिंगड | पिकामध्ये येणाऱ्या किडी | Pest of Watermelon |

इमेज
  महाराष्ट्रामध्ये सध्या कलिंगड लागवड काही ठिकाणी झाली आहे काही ठिकाणी लगबग चालू आहे.सर्वच पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे या पिकामध्येही किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. पण सुरुवातीपासून एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यास नक्कीच कीड नियंत्रण होण्याबरोबच त्यासाठी होणार खर्चही आटोक्यात राहील.तर आज आपण या कलिंगड पिकामध्ये येणाऱ्या किडी कोणत्या आहेत ते पाहूया.  कलिंगड पिकामध्ये येणाऱ्या किडी:- फुलकिडे (थ्रिप्स):- किडीची मादी माशी पानांवर अंडी घालते. अंड्यांतून बाहेर पडलेली पिले व प्रौढ कीटक पाने, फुले यामधील रस शोषून घेतात. क्वचित प्रसंगी खोड व फळे यावर प्रादुर्भाव दिसून येतो.किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर 10 दिवसानंतर - नियंत्रणाच्या दृष्टीने ही कीड सर्वांत तापदायक आहे.  पांढरी माशी:- या किडीची मादी पानांच्या खालच्या बाजूला अंडी घालते. प्रौढ पानांच्या खालच्या भागावर मोठ्या संख्येने लपून राहतात आणि पाने व फुलांतील रस शोषतात. त्यामुळे फुले गळतात. या किडीमधून एक चिकट द्रव स्रवतो, त्यावर बुरशी वाढते. नागअळी (लीफ मायनर):- या किडीची प्रौढ मादी पानावर अंडी घालते. अंड्यामधू

Grapes | Pest Attack | द्राक्ष बागेमध्ये येणारी कीड

इमेज
 महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यातील काही भागामध्ये तसेच नाशिक मध्ये द्राक्ष पिकाचे उत्पादन घेतले जाते. इतर पिकाप्रमाणे द्राक्ष पिकामध्येही मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीपासून पिकामध्ये येणाऱ्या किडीचे नियंत्रण केल्यास पिकाचे नुकसान वाचवता येते त्याचबरोबर कीड नियंत्रणासाठी होणारा खर्चही नियंत्रणात राहतो.  द्राक्ष बागेमध्ये येणारी कीड:- थ्रिप्स(फुलकिडे):-     हि कीड सुरुवातीला फक्त काही भागामध्ये आढळून येत होती पण सध्या सर्वत्र या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. थ्रिप्स सुरूतीला पानांमधील रस शोषतात आणि नंतर द्राक्षाच्या घडावरही हल्ला करतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे मण्यांवर डाग / चट्टे पडतात. त्यामुळे मोठे प्रमाणात नुकसान होते.  पानावरील तुडतुडे:- या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालील बाजूस राहून पानांमधील रस शोषण करतात. किडीच्या प्रादुर्भावामुळे पानावर पांढुरके ठिपके दिसून येतात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर पाने पिवळी पडायला लागतात आणि नंतर तपकिरी पडून पाने गळू लागतात.  पिठ्या ढेकूण:- हि कीड वेलीच्या बुंध्यातील, पानातील,फुलोऱ्यातील तसेच घ

हुमणी कीड व्यवस्थापन। हुमणी नियंत्रण। white grub Management|

इमेज
  :herb: IPM School  :school: :herb: : #ipmschool , #organicfarming , #pheromonetraps , #pheromonelres , #whitegrub , #Holotrichia :school: "IPM SCHOOL" :seedling: हुमणीचे एकात्मिक कीड व्यवस्थापण हुमणी ही महाराष्ट्रासह देशभरातील पिकावर उपजीविका करणारी विध्वंसक कीड आहे.हुमणीची अळी अवस्था सर्वात धोकादायक असते. शास्त्रीय नाव:- Holotrichia consanguinea :-Holotrichia serrata वरील दोन्ही प्रजाती महाराष्ट्रासह देशभरात आढळतात. प्रादुर्भावित पिके:-ऊस,भुईमूग, मिरची,पेरू,नारळ,तंबाखू, बटाटा,सुपारी,इ.तेलबिया, डाळवर्गीय आणि भाजीपाला पिके. जीवनचक्र:- ही कीड इतर कीटकांप्रमाणे अंडी,अळी,कोष आणि भुंगा अश्या चार अवस्थेतुन आपले जीवनचक्र पूर्ण करते. या कीटकाचे जीवन 10 ते 12 महिन्यांत पूर्ण होते.म्हणजेच एका वर्षी हुमणीची एकच पिढी जन्माला येते. *अंडी:-* मादी भुंगे मिलनानंतर अंडी घालतात. लवकर सकाळच्यावेळी अंडी देतात.दुधी पांढऱ्या रंगाची अंडी असतात.एकावेळी मादी 60 ते 70 अंडी देते.त्यामुळे या किडीची संख्या भराभर वाढते. *अळी(हुमणी):-* 8 ते 10 दिवसात अंड्यातुन दुधी पांढऱ्या