हुमणी कीड व्यवस्थापन। हुमणी नियंत्रण। white grub Management|

 :herb:IPM School :school::herb:

:




:school:"IPM SCHOOL":seedling:

हुमणीचे एकात्मिक कीड व्यवस्थापण

हुमणी ही महाराष्ट्रासह देशभरातील पिकावर उपजीविका करणारी विध्वंसक कीड आहे.हुमणीची अळी अवस्था सर्वात धोकादायक असते.
शास्त्रीय नाव:- Holotrichia consanguinea
:-Holotrichia serrata
वरील दोन्ही प्रजाती महाराष्ट्रासह देशभरात आढळतात.

प्रादुर्भावित पिके:-ऊस,भुईमूग, मिरची,पेरू,नारळ,तंबाखू, बटाटा,सुपारी,इ.तेलबिया, डाळवर्गीय आणि भाजीपाला पिके.

जीवनचक्र:-
ही कीड इतर कीटकांप्रमाणे अंडी,अळी,कोष आणि भुंगा अश्या चार अवस्थेतुन आपले जीवनचक्र पूर्ण करते. या कीटकाचे जीवन 10 ते 12 महिन्यांत पूर्ण होते.म्हणजेच एका वर्षी हुमणीची एकच पिढी जन्माला येते.

*अंडी:-* मादी भुंगे मिलनानंतर अंडी घालतात. लवकर सकाळच्यावेळी अंडी देतात.दुधी पांढऱ्या रंगाची अंडी असतात.एकावेळी मादी 60 ते 70 अंडी देते.त्यामुळे या किडीची संख्या भराभर वाढते.

*अळी(हुमणी):-* 8 ते 10 दिवसात अंड्यातुन दुधी पांढऱ्या रंगाची हुमणी बाहेर पडते.इंग्रजी "C" आकारात हुमणी असते.हुमणी आपल्या चार अवस्थेतुन मोठी होते.त्यातील शेवटच्या तीन अवस्था पिकास हानिकारक ठरतात. पिकाची कोवळी मुळे कुरतडून पुढे सरकते. एक हुमणी कमीतकमी 1 मीटर आवारातील मुळांचा फडशा पाडते.56 ते 70दिवसात हुमणीची(H.consanguinea)पूर्ण वाढ होऊन ती तिथेच कोषावस्थेत जाते. H. serrata ही प्रजात 121 ते 202 दिवसात हुमणी अवस्था पूर्ण करते.

*कोष:-* संपुर्ण वाढ झालेली हुमणी जमिनीत कोषावस्थेत जाते.कोष राखडी तपकिरी रंगाचा असतो. H.consanguinea व H.serrata या दोन्ही प्रजाती 10 ते 16 दिवसांसाठी कोषावस्थेत असतात. त्यानंतर कोशामधून भुंगा बाहेर पडतो.

भुंगा:- H.consanguinea व H.serrata या दोन्ही प्रजातींचा भुंगा सारखाच दिसतो.कोषातून बाहेर आल्यानंतर भुंगे लगेच जमिनीतुन बाहेर येत नाहीत.वळीव पाऊस झाल्यानंतर ते बाहेर पडतात. पण गेल्या काही वर्षांपासून भुंग्याची संख्या खूपच वाढल्यामुळे ते वर्षाच्या कोणत्याही महिन्यात बाहेर पडत आहेत. भुंगा शेवगा,वड,बाभूळ,कडुलिंब, जांभुळ, चिकू,केळी,आंबा यांसारख्या झाडांच्या झाडपाल्यावर उपजीविका करतात.संध्याकाळच्या वेळी ते पाने खाण्यासाठी व मिलनासाठी बाहेर पडतात.संध्याकाळी पाने खाऊन पहाटे मादीसोबत मिलन करतात.त्यानंतर नर भुंगा लगेच मरून जातो. मादी भुंगा जमिनीत अंडी घालण्यासाठी जातो.
*हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनी बाहेर असते बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात त्यामुळे या अवस्थेत कीडीचा बंदोबस्त करण्यात जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.*

नुकसानीचे प्रकार:-
मादी भुंग्याने जमिनीत अंडी दिल्यानंतर त्यातून 2 ते3 दिवसात हुमणी बाहेर पडते. त्यानंतर पिकांच्या कोवळ्या मुळास कुरतडून टाकते,परिणामी झाड वाळून मरून जाते.एक हुमणी कमीतकमी 1 मीटर आवारातील मुळांचा फडशा पाडते. एका वेळी मादी भुंगा 60 अंडी देतो व इतकी अंडी पूर्ण पीक नष्ट करण्यासाठी सक्षम असतात. असे अनेक भुंगे सर्वसाधारण मार्च,एप्रिल ते ऑगस्ट,सप्टेंबर पर्यंत सक्रिय असतात.त्यामुळे पिकाचे नुकसान 50 ते 70 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन:-

*भुंगा नियंत्रण:-*
1. पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगे सूर्यास्तानंतर बाभुळ,बोर,लिंबू या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात अशा झाडांच्या फांद्या रात्रीच्यावेळी काठीने हलवून खाली पडलेले भुंगे गोळा करावेत व रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिक विचार करावा त्यामुळे अंडी घालण्यापूर्वी भुंगेऱ्याचा नायनाट होईल.
2.बांधावरील गरज नसलेली कडुलिंब, बाभूळ,यांसारखी झाडे व छोटी झुडपे काढून टाकावीत.
3.शक्य असल्यास imidacloprid 17.8 SL 1.5ml/lit, ची फवारणी संध्याकाळच्या वेळी बांधावरच्या कडुलिंब व इतर झाडांवर करावी.ही फवारणी उन्हाळ्याच्या दिवसात दर 15 दिवसांत घ्यावी.
4.पहिल्या वळीव पावसानंतर एकरी 5-6 कामगंध सापळे शेतामध्ये लावावेत.
4.संध्याकाळी जमा होणारे भुंगे गोळा करून नष्ट करावे.
5. या पद्धतींचा अवलंब पहिला वळीव पाऊस पडल्यानंतर करावा.
*हुमणी नियंत्रण:-*
1.उन्हाळ्यात शेत खोल नांगरून घ्यावे,त्यामुळे कोष,हुमणी यांसारख्या अवस्था बाहेर पडतात.पक्षांचे नैसर्गिकरित्या भक्ष्य बनतात.
2.चांगले कुजलेले शेणखत वापरावे त्यातून हुमणी अवस्था शेतामध्ये प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी.
3.भुईमूग,मिरची यांसारख्या उशिरा किंवा लवकर पेरणी /लावण टाळावी.
4.पिकाच्या भरणीदरम्यान खतातून निंबोळी पेंड द्यावी.

:bulb:For more information click here:point_down::point_down:
https://www.facebook.com/groups/522198518657687

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean