उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing
उन्हाळा हंगाम हा अतिशय महत्वपूर्ण काळ आहे ज्यामध्ये रब्बी पिके काढून पुढे येणाऱ्या खरीप हंगामासाठी जमीन तयार करणे. ज्यामध्ये शेतीमध्ये जमीन तयार करून घेणे पुढे घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी अतिशय महत्वपूर्ण काम आहे. जमिनीची खोल नांगरणी करून उन्हामध्ये तापत ठेवले जाते, ज्याचा अनेक नैसर्गिक व शाश्वत फायद्यांसाठी उपयोग होतो. ही प्रक्रिया केवळ तण व किड नियंत्रणापुरती मर्यादित नसून, जमिनीचा पोत आणि संरचना सुधारण्यास आणि पुढील हंगामाच्या योग्य तयारी करण्यासाठीही महत्त्वाची ठरते.
आज आपण उन्हाळ्यामध्ये केल्या जाणाऱ्या खोल नांगरणीचे फायदे कोणते आहेत ज्यामुळे शेतकऱ्याला पुढे घेतल्या जाणाऱ्या पिकामध्ये फायदा मिळून उत्पन्न वाढेल?
*जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापत ठेवण्याचे फायदे*
*जमीन नांगरणी करताना सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी कारण त्यावेळेस नांगरणी करताना शेतामध्ये पक्षी जमून जमिनीमधून बाहेर पडणारी अळी अवस्था, किडीचे कोष तसेच इतर कीटक खातात त्यामुळे नैसर्गिक कीड नियंत्रण होते.
*रोग व किडींचा नैसर्गिकरित्या नायनाट होतो*
उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी केल्याने जमिनीतील लपलेल्या किडी, अळ्या, बुरशी, आणि जिवाणूंना उन्हाची तीव्रता सहन होत नाही. उष्णतेमुळे ते नष्ट होतात, त्यामुळे पुढील येणाऱ्या हंगामामध्ये देखील पिकाचे सुरक्षित नियोजन करण्यास मदत होते, आणि एकंदरीत उत्पन्न देखील जास्त वाढण्यास मदत होते.
*तण नियंत्रण*
उन्हाच्या जास्त तीव्रतेमुळे बिया पूर्णपणे नष्ट होतात, परिणामी पुढील हंगामात तणांचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे मुख्य पिकात पाण्याचे आणि अन्नद्रव्यांचे नियोजन केल्यावर पूर्णपणे ते पिकालाच मिळते.
*जमिनीची संरचना सुधारते*
खोल नांगरणीमुळे जमिनीचे थर हलके, भुसभुशीत होतात. त्यामुळे पुढे घेतल्या जाणाऱ्या पिकाच्या मुळांची वाढ चांगली होते. हवा आणि पाणी मातीमध्ये चांगल्या पद्धतीने खेळते त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.
*सेंद्रिय घटकांचा विघटन वेग वाढतो*
तापलेल्या जमिनीत जीवाणूंची क्रिया जलद होते, ज्यामुळे सेंद्रिय पदार्थ लवकर कुजून झाडांना उपयुक्त अन्नद्रव्यांमध्ये रूपांतरित होतात.
*जमिनीत हवा खेळती राहते*
खोल नांगरणीने जमिनीत ऑक्सिजनची देवाणघेवाण वाढते, जे जमिनीतील उपयोगी सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. तसेच पुढे पिकाची वाढ देखील चांगली होते.
*जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी उपयुक्त*
उन्हाळ्यात नांगरलेली व तापलेली जमीन पावसाळ्यात पाणी अधिक प्रमाणात शोषते, आणि ओलावा टिकवून ठेवते, जे खरीप पिकासाठी फायदेशीर ठरते. तसेच खरिप हंगाम पिकांसाठी वापसा अवस्था पिकामध्ये बनून राहते.
उन्हाळ्यात जमीन नांगरणी केल्यामुळे बरेच फायदे मिळू शकतात आणि त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून मातीची संरचना बदलते त्यामुळे त्या जमिनीमध्ये पुढे घेतले जाणारे पीक चांगले येते आणि पिकामध्ये कीड, रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो.
संदर्भ-कृषी जागरण आणि इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
अभिषेक खेरडे, अचलपूर अमरावती
दामोदर महाजन, पुणे
संजय कांबळे, नंद्याळ कागल कोल्हापूर
राजेश शेषराव ठाकरे, काटोल नागपूर
विश्वजित जगताप, खानापूर सांगली
भागीनाथ आसने, अ. नगर
ओमकार मासाकल्ले, देवणी लातूर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm_school #IPM #gogreen #ploughing #benefits #pestmanagement #agriculture
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा