पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झुकिनी पीक व्यवस्थापन । Zucchini ।

इमेज
🏫IPM SCHOOL🌱     झुकिनी हे समर स्क्वॅश आणि विंटर स्क्वॅश या नावाने ओळखले जाते. त्याची शास्त्रीय नावे अनुक्रमे कुकुरबिटा मॅझिमा आणि कुकुरबिटा पेपो अशी आहेत. दोन्ही प्रकारातील झाडे बुटकी ,  झुडूप वजा असतात. झुकिनीच्या झुडूपवजा झाडांवर नर आणि मादी अशी दोन्ही प्रकारची फुले असतात. नर फुलांचा आकार मादी फुलांच्या आकारापेक्षा लहान असून ,  दोन्ही फुलांचा रंग पिवळा असतो. इतर देशांमध्ये या फुलांचा उपयोग खाण्यासाठी किंवा पदार्थ सजविण्यासाठी करतात. काकडी आणि दुधी भोपळ्याची मिश्रित चव व काकडीसारखेच आकाराने दिसणारे या पिकाचे फळ गर्द हिरवे ,  पोपटी ,  राखाडी व पिवळ्या रंगात येते. लागवड: - ·   झुकिनी पिकाचा कालावधी फारच कमी असतो. तो जातीपरत्वे हंगामाप्रमाणे बदलतो. सर्वसाधारण कालावधी थंड हवामानात १० ते १५ दिवसांनी लांबतो. लागवड वर्षभर करता येत असली ,  तरी पावसाळ्यातील (जून-जुलै) लागवड उत्पादनाच्या दृष्टीने किफायतशीर ठरते. ·   हिवाळ्यात लागवड केल्यास वाढीचा कालावधी लांबल्यामुळे उत्पादन नेहमीपेक्षा १०-१५ दिवसांनी पुढे जाते. उन्हाळ्यातील लागवड हिवाळी हंगामापेक्षा नक्कीच किफायतशीर ठरते. मात्र ,  पाण

हळद पिकामध्ये येणाऱ्या किडी । Pest of Turmeric | एकात्मिक कीड व्यवस्थापन ।

इमेज
 🏫IPM SCHOOL🌱 हळद कीड व्यवस्थापन  पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. भागातील हळद उत्पादक पट्ट्यामध्ये खालील किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यांचे नियंत्रण वेळीच केल्यास भविष्यातील नुकसान टाळता येते.  १) कंदमाशी:- लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ अथवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. ५ ते ७ दिवसांत अंड्यातून लालसर रंगाच्या नवजात अळ्या बाहेर पडून कंदामध्ये शिरतात. अळ्यांचा शिरकाव कंदामध्ये झाल्याने तिथे रोगकारक बुरशी तसेच सुत्रकृमींचा प्रादुर्भाव सुरू होतो. कंद मऊ होतात, त्यांना पाणी सुटून ते कुजू लागतात. नियंत्रण:-  * कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसताच शिफारशीत किटकनाशकांचा वापर करावा. जुलै ते सप्टेंबर दरम्यान क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मि.ली. किंवा डायमेथोएट (३०% प्रवाही) १ मि.ली. प्रतिलिटर या प्रमाणात फवारावे. गरजेनुसार १५ दिवसांनी पुढील फवारणी घ्यावी. * उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. * हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावे

मूग-उडीद लागवड तंत्रज्ञान | Mung-Udid Cultivation Technology

इमेज
*मूग-उडीद लागवड तंत्रज्ञान* खरीप हंगामातील मूग व उडीद महाराष्ट्रातील महत्वाची कडधान्य पिके आहेत. या दोन्ही पिकांचे प्रत्येकी साधारणतः ३ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र दरवर्षी महाराष्ट्रात असते. हमखास पाऊसमानाच्या प्रदेशात ही पिके अतिशय चांगले उत्पादन (१० ते १२ क्विंटल प्रति हेक्टर) देतात. खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या कापूस व तूर यासारख्या पिकांमध्ये मूग व उडदाचे आंतरपीक घेतल्यास, निश्चितच फायदा होतो. उडीद आणि मुगात प्रथिनांचे प्रमाण अधिक (२४ टक्के) असून त्याची प्रतही श्रेष्ठ आहे. *•जमीन :-* मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मूग आणि उडीद पिकास योग्य असते. क्षारयुक्त, खोलगट, पाणथळ तसेच उतारावरील हलक्या व निकस जमिनीत मूग, उडीद पिकाची लागवड करू नये. आम्ल-विम्ल निर्देशांक (पी.एच.) ६.० ते ८.५ तसेच सेंद्रिय कर्ब ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जमिनीत ही पिके चांगली येतात. *•हवामान:-* या पिकास २१ ते २५ अंश सें.ग्रे. तापमान चांगले मानवते. तसेच ३० ते ३५ अंश सें.ग्रे. तापमानात सुध्दा ही पिके चांगली येतात. या पिकांना ६५० ते ७०० मिलिमीटर समप्रमाणात पडलेला पाऊस मानवतो आणि

थंडीपासून फळबागेला वाचवण्यासाठी उपाय | Measures to protect the orchard from cold

इमेज
थंड हवामान बऱ्याच पिकांना मानवते पण थंडीच्या दिवसांमध्ये तापमान बऱ्याच वेळेला खूप खाली जाते. शेतीमधील इतर पिकांवर त्याचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात दिसून येतो.पण फळपिकांमध्ये तापमान कमी झाल्यानंतर खूप मोठा परिणाम दिसू लागतो. बऱ्याच वेळेला वाढीवर तर परिणाम दिसून येतोच पण त्यासोबत फुल गळ, फळे लागलेली असल्यास फळे तडकू लागतात पर्यायाने उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे शेतकऱ्याला फळझाडावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील. *नियंत्रणाचे उपाय* * थंडी आणि वाऱ्यापासून फळबागेच्या संरक्षणासाठी बागेच्या पश्‍चिम व दक्षिण दिशेला शेवरी, हादगा, सुरू, बोगनवेल, घायपात, शेवगा, ग्लिरिसिडीया, पांगरा, मलबेरी, किंवा बांबू यांसारख्या प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी. * रब्बी हंगामात मुख्य फळझाडे लहान असल्यास दोन झाडांतील मोकळ्या जागेत, उघड्या जमिनीवर दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा, वाटाणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मूग, मटकी इ. * फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पाला पाचोळा, लाकडे पेटवून उष्णता व धूर रात्रभर मिळेल, याची काळजी घ्या