बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |
खरीप हंगाम चालू व्हायला अगदी थोडासाच अवधी शिल्लक आहे. एकसारखा पडणाऱ्या वळीव पावसाने बऱ्याच दिवसानंतर मागील आठवड्यापासून थोडीशी उसंत दिली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी शेत तयार करायच्या गडबडीत आहेत. खरीप हंगामामधील पिकांमध्ये कीड आणि रोगांचे प्रमाण इतर हंगामापेक्षा अधिक असते. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. पिकाची टोकण किंवा रोपलागण करताना बीजप्रक्रिया हि खूप महत्वाची आहे.
बीजप्रक्रिया म्हणजे बियाणे जमिनीत पेरणीपूर्वी जमिनीतून तसेच बियाण्यातून विविध प्रकारचे रोग पसरू नयेत आणि रोगांचा प्रसार होऊ नये त्याचबरोबर रोपांची वाढ चांगली, एकसारखी होऊन उत्पादन वाढण्यासाठी जैविक आणि रासायनिक अश्या दोन्ही पद्धतीने बीजप्रक्रिया केली जाते.
बीजप्रक्रिया करताना अगोदर रासायनिक औषधांची आणि त्यानंतर जैविक औषधांची प्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करताना अगोदर इमिडाक्लोप्रिड (कीटकनाशक) आणि त्यानंतर कार्बेन्डाझिम (बुरशीनाशक) यांची बीजप्रक्रिया करून त्यानंतर जैविक बीजप्रक्रिया करावी. जैविक बीजप्रक्रिया करताना ट्रायकोडर्मा, रायझोबियम, अझाटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू यांची बीजप्रक्रिया करावी.
*बीज प्रक्रियेमुळे मिळणारे फायदे*
* बीजप्रक्रियेमुळे बियाणे लवकर आणि चांगल्या प्रकारे उगवतात.
* बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांमध्ये रोग आणि कीड येण्याची शक्यता कमी होते.
* बीजप्रक्रिया केल्याने पिकांची वाढ चांगली होते, ज्यामुळे उत्पादनात वाढ होते.
* बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांमध्ये रोपे लवकर मरण्याची शक्यता कमी होते.
* योग्य बीजप्रक्रिया केल्याने कीटकनाशक फवारणी आणि इतर खर्चात बचत होते.
* योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी किंवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखे येते.
* काही बीजप्रक्रिया पद्धती जमिनीत नत्राचे स्थिरीकरण करतात, ज्यामुळे खतांची गरज कमी होते.
* जमिनीतील अपायकारक जिवाणूंपासून पिकाचे संरक्षण होते.
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
शुभम प्रदीप पाटील, विसापूर तासगाव सांगली
दर्शन अरुणराव ठाकरे, वरुड अमरावती
विश्वजित जगताप, खानापूर सांगली
आनंद भास्करराव आजमिरे, हिवरखेड मोर्शी अमरावती
ओमकार मासाकल्ले, देवणी लातूर
राजेश शेषराव ठाकरे, काटोल नागपूर
सुनील कुलकर्णी, भालकी बिदर कर्नाटक
भागीनाथ आसने, अ. नगर
संजय बाळासाहेब दासपूते, शेवगाव अहिल्यानगर
निखिल तेटू, कुर्हा अमरावती
दिव्याकुमार विद्याधर भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm #IPM #gogreen #seedtreatment #benefits #smartfarming
बीज प्रक्रियेमुळे अनेक फायदे मिळतात. या प्रक्रियेमुळे बियाणे निरोगी आणि मजबूत होते, तसेच रोग आणि किडींपासून संरक्षण होते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते आणि शेतकरी जास्त फायदा मिळवू शकतात. जय भोमले
उत्तर द्याहटवा