मिरची पिकामध्ये थ्रिप्स नियंत्रण । एकात्मिक व्यवस्थापन पद्धती । Thrips Management

 



मिरचीचे पीक काही भागात अतिशय जास्त प्रमाणात घेतले जाते. त्यामध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते आणि याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामध्ये सांगली, सोलापूर, जळगाव, नांदेड, धुळे, नंदुरबार या प्रमुख जिल्ह्यात होते. 

 मिरची पिकाचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी पिकामध्ये येणाऱ्या किडींचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. मिरची पिकामध्ये पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, थ्रिप्स, मावा या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. यापैकी थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागते. तर आज आपण थ्रिप्स कसे मिरची पिकाला नुकसान पोहोचवतात आणि त्यांचे प्रभावी नियंत्रण कसे करावे याबद्दल माहिती घेऊया.. 


*थ्रिप्स-*

* थ्रिप्स अतिशय लहान कीड असून मिरची पिकामध्ये ते लहान पिवळसर आणि काळसर रंगाचे दिसून येतात. 

* मिरची पिकामध्ये स्किर्टो थ्रिप्स डॉरसॅलिस नावाची प्रजात प्रामुख्याने आढळून येते. 

* थ्रिप्स ची पिल्ले आणि प्रौढ दोन्ही अवस्था पिकाला नुकसान पोहोचवतात. 

* थ्रिप्स मिरची पिकामध्ये फुले तसेच कोवळ्या शेंड्यामधून रस शोषण करतात. 

* त्यामुळे रोपांची वाढ थांबते आणि तसेच विषाणूजनित रोगाचा प्रसार होण्यामध्ये सुद्धा यांचा प्रमुख वाटा आहे. 


*नुकसान लक्षणे:-*

* प्रादुर्भावग्रस्त रोपांची पाने कुरळी होतात आणि वरच्या बाजूला वळतात. 

* फुल कळ्या ठिसूळ होऊन गळून खाली पडतात. 

* सुरुवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास रोपाची वाढ खुंटते आणि फुल येणे कमी होऊन फळधारणेवर सुद्धा परिणाम होतो.


*एकात्मिक कीड व्यवस्थापन* 

* पिकाची फेरपालटणी करावी म्हणजेच मिरची पीक वारंवार एकाच जमिनीत घेऊ नये.  

* आंतरपीक पद्धतीचा वापर करावा त्यामध्ये सावली देण्यासाठी मका किंवा ज्वारीसह मिरचीचे आंतरपीक घ्या, ज्यामुळे थ्रिप्सची संख्या कमी करण्यामध्ये मदत मिळेल. 

* पिकामध्ये तण व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. 

* मिश्र पीक घेणे टाळावे, मिरची आणि कांदा यांचे मिश्र पीक टाळा, कारण यामुळे थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

* मिरची पिकाला बीजप्रक्रिया/रोपप्रक्रिया करताना कीटकनाशकाचा वापर करू शकता. 

* रोपे लावल्यानंतर पिकामध्ये पिवळे, निळे आणि पांढरे तिन्ही रंगाचे चिकट सापळे २५/प्रति एकर सुरुवातीपासून लावावेत. त्यामुळे थ्रिप्सचा प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि पकडण्यासाठी मदत करेल.  

* पिकामध्ये स्प्रिंकलर पद्धतीचा वापर पाणी देण्यासाठी करावा. त्यामुळेही थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी करण्यामध्ये होईल. 

* पिकामध्ये किडीमुळे जास्त प्रभावित झालेली रोपे आणि विषाणूजनित रोगाचा  प्रादुर्भाव झालेली झाडे काढून टाकावीत. 

* झेंडू आणि सूर्यफूल यांसारखी सापळा पिके लावा आणि पूर्ण प्रादुर्भाव झाल्यावर काढून टाका.

* पिकाचे नुकसान कमी करण्यासाठी निंबोळी तेलाची फवारणी करा.

* बी.बॅसियाना या जैविक घटकाचा उपयोग थ्रिप्स ची संख्या कमी करण्यासाठी करू शकता. 

* आवश्यकतेनुसार थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. 

* किडीमध्ये प्रतिकारशक्तीचा विकास रोखण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक कीटकनाशके वापरा.

* किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% SL 3.0 मिली/10 लि., फिप्रोनिल 5% SC 1.5 मिली/लि., मिथाइल डिमेटॉन 25% EC 1.0 मिली /लि., स्पिनेटोरम 11.7 SC 1.0ml/लि., थियाक्लोप्रिड 21.7% SC 6.0 मिली/10 लि. या कीटकनाशकांचा वापर तुम्ही करू शकता. 


उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

अभिजित विश्वास गावडे, येडगाव पुणे 

मनोज मधुकर मानापुरे, नागभीर चंद्रपूर 

जीवन हरिचंद्र घोरमोडे, मूर्तिजापूर अकोला 

सारिका उत्तम गायकवाड, हातकणंगले कोल्हापूर 

विशाल कऱ्हाळे, नांदेड 

संकेत लब्दे, देवगड सिंधुदुर्ग 

निखिल मधुकर तेटू, कुऱ्हा अमरावती

ओंकार शिवाजीराव जगदंबे, धर्माबाद नांदेड 

मयुरी पाटील, कागल कोल्हापूर 

पुंडलिक कैलास तांदळे, देवानगिरी 

सचिन चव्हाण, 

ओंकार मसकल्ले, देवणी लातूर 

अभिषेक खेरडे, अचलपूर अमरावती

   उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद


*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipm_school #IPM #chilli #pest #thrips #chillifarming #agriculture


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

आंब्यामधील फळमाशी । जीवनचक्र आणि व्यवस्थापन । Fruit Fly Management