Vegetables Fruit Fly | वेलवर्गीय फळमाशी | एकात्मिक व्यवस्थापन




 वेलवर्गीय फळभाज्या जसे कलिंगड,काकडी,खरबूज, दोडका,कारले,भोपळा यांमध्ये प्रमुख कीड येते ती म्हणजे फळमाशी.

              सर्व फळमाश्या सारख्या दिसत असल्या तरी वेलवर्गीय फळभाज्यामध्ये येणारी फळमाशी वेगळी असते तर फळवर्गीय पिके जसे आंबा,पेरू,चिकू,सीताफळ, यावर येणारी फळमाशी ही वेगळी येते.


 फोटो:- वेलवर्गीय फळभाज्यामध्ये येणारी फळमाशी - मेलन फ्रुट फ्लाय(B.cucurbitae) 


जीवनचक्र:-

फळमाशीचे जीवनचक्र माशी-अंडी-अळी-कोष-पुन्हा माशी या टप्प्यामध्ये पूर्ण होते. जेव्हा वेलवर्गीय फळभाज्या फुलोरा अवस्थेत येतात,तेथून पुढे फळमाशीचा प्रादुर्भाव पिकामध्ये व्हायला चालू होतो. फळे लिंबू एवढ्या आकाराची असताना तेव्हा मादी माशी त्यावर बसून साली मध्ये अंडी देतात. काही दिवसात अंड्यामधून अळी (Maggots) बाहेर पडतात. ह्या अळ्या फळामधील गर खायला चालू करतात. पूर्ण वाढ झालेली अळी फळामधून बाहेर पडते. मातीमध्ये किंवा पालापाचोळ्यात कोषावस्थेमध्ये जातात. आठड्याभरात कोषावस्था पूर्ण करून त्यामधून माशी बाहेर पडते. हीच माशी पुन्हा फळांना डँख मारते. अश्या प्रकारे 25-35 दिवसात फळमाशीचे जीवनचक्र पूर्ण होते.


नुकसान:-

* जेव्हा माशी फळावर डँख मारते तेव्हा डँख मारलेल्या जागेमधून बुरशी,जिवाणू यांचा शिरकाव होण्याचा धोका संभवतो.

* अंड्यामधून बाहेर पडलेल्या लहान अळ्या फळातील गर खातात. त्यांच्या विष्ठेमुळे फळ खराब होते.

* फळामधून दुर्गंध पसरतो. फळे लहानच राहतात.

* डँख मारलेली जागा तशीच राहते. जसे फळ मोठे होईल तसे फळांचा आकार वेडावाकडा होतो. 

* एकात्मिक व नियंत्रण उपाययोजना न राबविल्यास 30-40 टक्क्याहुन अधिक नुकसान होऊ शकते.


एकात्मिक कीड व्यवस्थापन:-

* कीडग्रस्त व खराब फळे दिसता क्षणी शेताबाहेर नष्ट करावीत.

* पिकामध्ये सुरवातीपासून निम तेल,निंबोळी अर्क,मासळी तेल किंवा दशपर्णी अर्क यांच्या फवारण्या कराव्यात. त्यामुळे माशीस अंडी देण्यापासून परावर्तित करता येईल.

* फुलोरा अवस्था येण्याआधी एकरी किमान 10 मेलन फ्लाय ल्युर व IPM ट्रॅप लावून घ्यावेत. 

* सापळ्यांमुळे शेतामध्ये फळमाशीचे सर्वेक्षण व संपुर्ण नियंत्रण करणे अगदी सहज शक्य होते. सापळ्यांमध्ये सापडणाऱ्या माश्यांच्या संख्येवरून पुढील नियोजन ठरवू शकतो.

* यासोबतच आपले शेत तण मुक्त ठेवावे. किडीच्या विविध अवस्था व अनेक रोगांचे बीजाणू मुख्य पीक नसेल तेव्हा तणांवर सुद्धा उपजीविका करत असतात त्यामुळे शेत तणमुक्त ठेवणे अत्यावश्यक आहे.

* फळमाशीस नियंत्रित करण्यासाठी आजघडीस कोणतेही रासायनिक कीटकनाशक उपलब्धता नाही, त्यामुळे फळमाशीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन महत्वाचे आहे.



एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean