भेंडी | Disease Resistance | Varieties |
महाराष्ट्रामध्ये वेगवेगळा भाजीपाला कमी अधिक प्रमाणात सर्व भागामध्ये पिकवला जातो. त्यामध्ये सर्व हंगामामध्ये भेंडीचे पीक घेतले जाते.कोणत्याही पिकाचे चांगले उत्पन्न मिळण्यासाठी कीड आणि रोग व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे.त्यामध्ये रोग प्रतिबंधक कीड प्रतिबंधक वाण वापरल्यास नक्कीच चांगल्या पद्धतीने कीड आणि रोगापासून पिकाचे संरक्षण आणि चांगले उत्पन्न नक्की मिळू शकते.
*भेंडी पिकाचे रोग प्रतिरोधक वाण:-*
*फुले विमुक्त:-*
येलो व्हेन मोझॅक विषाणू रोग प्रतिरोधक भेंडी जातीची फुले विमुक्ताची शिफारस केली जाते.आकर्षक हिरव्या रंगाची फळे, चमकदार,पिवळ्या शिरा मोज़ेक विषाणू रोगास प्रतिरोधक, पांढऱ्या माशी, जॅसिड्स आणि फळ पोखरणाऱ्या अळीस सहनशील हा वाण आहे.
*पुसा सावनी:-*
आय.ए. आर.आय विकसित या जातीची फ़ळे १०-१५ से.मी लांब हिरवी मुलायम झाडावर काटेरी लव देठावर तांबूस छटा फुले पिवळी व प्रत्येक पाकळीवर पिवळा ठिपका,सुरुवातीला येलो मोझॅक व्हायरस रोगास प्रतिकारक परंतु सद्या व्हायरस रोगास बळी पडते. हेक्टरी ८-१० टन उत्पादन मिळते.
*परभणी क्रांती:-*
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित जात आहे. फळे ७-१० सेमी लांब हिरवी पुसा सावनी पेक्षा कणखर व व्हायरस रोगास प्रतिकारक,फळे नाजूक तजेलदार हिरवी असतात.पेरणी पासून ५५ दिवसात पहिला तोडा सुरु होतो. उन्हाळ्यात १४-१६ तोडे तर खरिपात २० तोडे होतात.याचे हेक्टरी ७-८ टन उत्पादन मिळते.
*अंकुर ४०:-*
सरळ वाढणारी जात.पेरांमधील अंतर कमी फळे हिरवी.या जातीपासून हेक्टरी ८-१० टन उत्पादन मिळते.
*महिको 10:-*
अधिक लोकप्रिय जात.फळे गर्द हिरवी.व्हेक्टरी १०-१२ टन उत्पादन.
*वर्षा:-*
हि जात अधिक लोकप्रिय जात आहे.या फळाची लांबी ५-७ सेमी फळे हिरवी व लुसलूशीत तोडल्यानंतर काळी पडत नाहीत.याचे हेक्टरी १० ते १२ टन उत्पादन मिळू शकते.
*अर्का अनामिका:-*
झाड उंच फळे लांब कोवळी हिरवी, फळाचा देठ लांब. हे वाण व्हायरस रोगास प्रतिकारक आहे. याची फळे तोडण्यास सोईस्कर असतात. हेक्टरी 9-12 टन उत्पादन मिळू शकते.
अंकुर ४०,पुसा सावनी,महिको १०,परभणी क्रांती,वर्षा, अर्का अनामिका यासोबत सिलेक्शन २-२,फुले उत्कर्षा,या सुधारित जाती लागवडीस योग्य आहेत.
यासारख्या सुधारित आणि रोग प्रतिरोधक वाणांची निवड केल्यास नक्की शेतकरी भेंडीचे चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा