सापळा पिक | Trap Crop | एकात्मिक कीड व्यवस्थापन



एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धतीने कीड नियंत्रण करण्याच्या विविध घटकांपैकी सापळा पीक उपयुक्त पद्धत आहे. सापळा पिकाचा कीड व्यवस्थापनामध्ये वापर केल्यास निसर्गाचा समतोल राखून कीड आर्थिक नुकसान पातळी खाली रोखता येते. 

  सापळा पिके हा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक आहे. मुख्य पिकाचे हानिकारक किडीपासून संरक्षण करण्यासाठी हंगामानुसार किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावल्यास कीड त्या पिकाकडे आकर्षित होते. यामुळे मुख्य पिकाचे संरक्षण होते. सापळा पीक लावल्यामुळे रासायनिक कीटकनाशक फवारणीवर होणारा खर्च कमी होतो. मित्र किडींची संख्या संतुलित राहण्यास मदत होते. या सोबतच सापळा पिकापासून अतिरिक्त उत्पन्न मिळते. पर्यावरणाचे संवर्धन होते. मुख्य पिकाच्या उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. भाजीपाला आणि फळपिकामध्ये सापळा पिकाचा उपयोग अतिशय उपयुक्त आहे.


*कोणत्या सापळा पिकांकडे कोणती कीड आकर्षित होते?*


* एरंडी या सापळा पिकाची एक ओळ मुख्य पिकाच्या कडेने लावल्यास तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा मादी पतंग एरंडीच्या पानावर समूहाने अंडी घालते. त्यामुळे अंडीपुंज आणि प्रादुर्भावग्रस्त एरंडीची पाने अळीच्या समूहासहित नष्ट केल्याने मुख्य पिकाचे संरक्षण होते.


* मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावल्यास झेंडूच्या पिवळ्या फुलाकडे हिरव्या बोंड अळीचा मादी पतंग आकर्षिला जाऊन त्यावर अंडी घालतो.


* मुख्य पिकाच्या सोबत एक ओळ चवळी किंवा मका पिकाची पेरणी केल्यास मावा ही कीड चवळी वर मोठ्या प्रमाणावर येते. त्यामुळे ढालकिडा, सिरफीड माशी, क्रायसोपा या मित्रकीटकांची वाढ होते. मका, मूग, उडीद या पिकांवर मित्रकीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते.


* तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनाकरिता ज्वारी किंवा बाजरीची आंतरपीक म्हणून किंवा तूर पेरणीच्या वेळेस १०० ग्रॅम ज्वारी/बाजरी   बियाण्यासोबत मिसळून पेरणी करावी. यामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षिथांबे तयार होतात आणि हे पक्षी पिकावरील किडींना टिपून नष्ट करतात.


* तुडतुडे, खोडकिडीच्या व्यवस्थापनाकरिता बांधावर भात पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी. यामुळे शत्रू कीटकांवर जगणाऱ्या मित्रकीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते.


* कीड व्यवस्थापनाकरिता भाजीपाला पिकामध्ये झेंडू, बडीशेप, मोहरी, कोथिंबीर, गाजर, मका, ज्वारी या सापळा पिकांची लागवड करावी. यावर मित्र किडी, मधमाश्या आकर्षिल्या जातात.


* टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पिकाच्या कडेने एक ओळ झेंडू आणि दोन ओळी मक्याच्या सापळा पीक म्हणून लावाव्यात. झेंडूच्या मुळामधून अल्फा टर्थीनिल हे रसायन स्रावते. यामुळे सूत्रकृमी नियंत्रण करण्यास मदत होते.


* कोबीवर्गीय पिकाच्या कडेने एक ओळ मोहरीची लावावी.त्यामुळे चौकोनी ठिपक्यांचा पतंग मोहरीकडे आकर्षित होतो. 


* भुईमुग पिकाच्या बॉर्डर ओळीने सूर्यफुलाची सापळा पिक म्हणून लागवड केल्यास हेलीकोवर्पा, स्पोडोप्टेरा आणि केसाळ अळीच्या मादा पतंग पिवळ्या रंगाच्या फुलाकडे आकर्षित होऊन अंडी घालतात. अशा फुलांवरील अंडीपुंज आणि अळ्या वेचून नष्ट कराव्यात.


* घाटेअळी, सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तुरीच्या चार ओळींनंतर ज्वारीच्या दोन ओळी असे आंतरपीक घ्यावे.

 एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती  समजून घेऊन सापळा पिकांची मदत घेतल्यास नाक्कीस आपण पिकामध्ये येणारी मुख्य किडीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो. 

संदर्भ-ऍग्रोवन


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean