Grapes | Pest Attack | द्राक्ष बागेमध्ये येणारी कीड
महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यातील काही भागामध्ये तसेच नाशिक मध्ये द्राक्ष पिकाचे उत्पादन घेतले जाते. इतर पिकाप्रमाणे द्राक्ष पिकामध्येही मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीपासून पिकामध्ये येणाऱ्या किडीचे नियंत्रण केल्यास पिकाचे नुकसान वाचवता येते त्याचबरोबर कीड नियंत्रणासाठी होणारा खर्चही नियंत्रणात राहतो.
द्राक्ष बागेमध्ये येणारी कीड:-
थ्रिप्स(फुलकिडे):-
हि कीड सुरुवातीला फक्त काही भागामध्ये आढळून येत होती पण सध्या सर्वत्र या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. थ्रिप्स सुरूतीला पानांमधील रस शोषतात आणि नंतर द्राक्षाच्या घडावरही हल्ला करतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे मण्यांवर डाग / चट्टे पडतात. त्यामुळे मोठे प्रमाणात नुकसान होते.
पानावरील तुडतुडे:-
या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालील बाजूस राहून पानांमधील रस शोषण करतात. किडीच्या प्रादुर्भावामुळे पानावर पांढुरके ठिपके दिसून येतात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर पाने पिवळी पडायला लागतात आणि नंतर तपकिरी पडून पाने गळू लागतात.
पिठ्या ढेकूण:-
हि कीड वेलीच्या बुंध्यातील, पानातील,फुलोऱ्यातील तसेच घडातील रस शोषण करतात. किडीचा प्रादुर्भाव वाढीच्या ठिकाणी झाला तर नवीन वाढ खुंटते. किडीची पिल्ले आणि प्रौढ आपल्या शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकतात त्यामुळे पानावर,घडावर बुरशीचा प्रादुर्भाव वाढू लागतो.
खोडकिडा:-
किडा खोडास छिद्र करतो आणि त्यामुळे छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो. आणि नवीन वाढणाऱ्या शेंड्यावर ओरखडून त्याचे नुकसान करतो.प्रादुर्भाग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून गळायला सुरुवात होते. नंतर फांद्या वाळतात आणि झाड मरायला सुरुवात होते.
*उडद्या भुंगेरा:-
प्रौढ भुंगेरे नवीन फुटलेले डोळे, कोवळे कोंब, पाने तसेच काही वेळेस घड देखील खातात. नवीन वाढ होणाऱ्या कोवळ्या फुटीवर हि कीड ओरखडे ओढते त्यामुळे त्यावर पांढऱ्या रेषा उमटतात. हि कीड पक्व झालेली पाने देखील खाते. किडीच्या अळ्या झाडाच्या कोवळ्या मुळ्या खातात त्यामुळे झाडाची पाने पिवळी पडून गळतात.
त्याचबरोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घाटेअळी, पाने खाणारी स्पोडो अळी, पाने गुंडाळणारी अळी, केसाळ अळी, खवले कीड, लाल कोळी यांच्याबरोबरच फळांमधील रस शोषण करणारे पतंग यादेखील किडींचा प्रादुर्भाव द्राक्ष बागेमध्ये झालेला दिसून येतो.
संदर्भ-राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,पुणे
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा