कलिंगड | पिकामध्ये येणाऱ्या किडी | Pest of Watermelon |
महाराष्ट्रामध्ये सध्या कलिंगड लागवड काही ठिकाणी झाली आहे काही ठिकाणी लगबग चालू आहे.सर्वच पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे या पिकामध्येही किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. पण सुरुवातीपासून एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यास नक्कीच कीड नियंत्रण होण्याबरोबच त्यासाठी होणार खर्चही आटोक्यात राहील.तर आज आपण या कलिंगड पिकामध्ये येणाऱ्या किडी कोणत्या आहेत ते पाहूया.
कलिंगड पिकामध्ये येणाऱ्या किडी:-
फुलकिडे (थ्रिप्स):-
किडीची मादी माशी पानांवर अंडी घालते. अंड्यांतून बाहेर पडलेली पिले व प्रौढ कीटक पाने, फुले यामधील रस शोषून घेतात. क्वचित प्रसंगी खोड व फळे यावर प्रादुर्भाव दिसून येतो.किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर 10 दिवसानंतर - नियंत्रणाच्या दृष्टीने ही कीड सर्वांत तापदायक आहे.
पांढरी माशी:-
या किडीची मादी पानांच्या खालच्या बाजूला अंडी घालते. प्रौढ पानांच्या खालच्या भागावर मोठ्या संख्येने लपून राहतात आणि पाने व फुलांतील रस शोषतात. त्यामुळे फुले गळतात. या किडीमधून एक चिकट द्रव स्रवतो, त्यावर बुरशी वाढते.
नागअळी (लीफ मायनर):-
या किडीची प्रौढ मादी पानावर अंडी घालते. अंड्यामधून बाहेर पडलेली अळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे फळांचे पोषण होत नाही.
फळमाशी:-
खरबूज व कलिंगड या दोन फळांसाठी ही कीड अतिशय हानिकारक आहे. किडीची मादी माशी फळाच्या सालीमध्ये अंडी घालते. अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या फळांमध्ये शिरतात व आतील गर खातात. त्यामुळे फळे कुजतात व त्याचा घाणेरडा वास येतो.या किडीचा प्रादुर्भाव फळ धारणा चालू झाल्यानंतर लगेच दिसायला लागतो.
लाल भुंगेरे:-
हे लाल रंगाचे लहान भुंगेरे आपल्याला पिकामध्ये प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो. हे भुंगेरे कलिंगडाची पाने व फुले कुरतडतात.यांच्यामुळे तुम्हाला पिकामध्ये नुकसान झालेले मिळते.
कलिंगड पिकामध्ये सुरुवातीपासून या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. सुरुवातीपासून एकात्मिक दृष्टिकोन ठेऊन आपल्याला कीड व्यवस्थापन करावे लागते.म्हणजे चांगल्या पद्धतीने कीड नियंत्रण होऊन शकते.
संदर्भ-इंटरनेट
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा