ऊस खोडवा | पाचट ठेवण्याचे फायदे | Organic Farming | Sugarcane|




पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते. त्यामुळे जीवाणू वा गांडुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. पीक वाढीनुसार पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, कमी होणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होत आहे. यावर ऊस पाचट व्यवस्थापन हा योग्य व शाश्वत उपाय आहे.  खोडवा उसाकडे दुर्लक्ष होते. उसाची तोडणी झाल्यानंतर बहुतांशी क्षेत्रावरील उसाचे पाचट जाळून टाकले जाते. तसेच शेणखत वापराचे प्रमाण कमी झाले आहे. पाचट जाळल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जळून नष्ट होतात, परिणामी जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण फारच कमी होते. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर बिघडत आहे.  ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक सरी ठेवून कुजविल्यास पाण्याचा वापर ५० टक्‍क्‍यांपर्यंत कमी होऊ शकतो. जमिनीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकते. अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा खर्चात बचत होते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून ओलावा जास्त काढण्यास मदत होते. 

 

* एक हेक्‍टर क्षेत्रामधून सुमारे १० ते १२  टन वाळलेले पाचट मिळते. हे पाचट न जाळता ते कुजवल्यास सहा ते सात टन सेंद्रिय खत मिळते. यामुळे जमिनीची सुपीकता सातत्याने वाढते. 

* पाचट तंत्रज्ञानामुळे जमिनीची सुपीकता तीन ते चार वर्षे टिकून राहील तितकेच खोडव्याचे पीकही सातत्याने घेता येईल. यामुळे बेणे, मशागत व मजुरी खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल.


* उत्पादनात भरीव वाढ कोणत्याही निविष्ठावर विनाकारण खर्च न करता पाचट तंत्रज्ञानामुळे उत्पादनात १० ते  १५ टक्के वाढ होते. पाचट शेतात ठेवल्यामुळे पाल्यातील मुख्य अन्नद्रव्य उदा. नत्र  ४० ते ५० किलो, स्फुरद २० ते ३०  किलो, पोटॅश ७५ ते १०० किलो तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, मंगल, तांबे, जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पाचटाचे विघटन होताना ऊस पिकास उपलब्ध होतात. त्याचा परिणाम उत्पादन वाढीवर दिसून येतो. 

* आंतर पीक खोडवा उसामध्ये पाला एक आड एक सरीमध्ये ठेवल्यामुळे एक सरी रिकामी राहते. या सरीत शेतकऱ्यांनी मूग, उडीद, चवळी इत्यादी द्विदलवर्गीय पिके घेऊन ती पक्व झाल्यानंतर त्यांच्या केवळ शेंगा काढून घ्यावेत. उर्वरित अवशेष त्याठिकाणी सरीत राहू दिल्याने सेंद्रिय खत उपलब्ध होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता सुधारते. साधारणपणे दहा गुंठयात अर्धा ते एक किलो कडधान्य पेरल्यास सुमारे २५ ते ३० किलो पर्यंत उत्पादन मिळू शकते. 


* उसाचे पाचट न जाळता ते एक आड एक ठेवल्यास किंवा सर्व सरीत पाचट दाबून बसवावे.  या आच्छादनामुळे जागेवर तण उगवत नाहीत. त्यामुळे अन्नद्रव्यांचा होणारा अपव्यय व तण व्यवस्थापनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.

ओलावा टिकतो.  

* पाचट ठेवल्यामुळे जमिनीमध्ये पाणी व हवा योग्य संतुलन राहून मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

संदर्भ-ऍग्रोवन. 


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy