सेंद्रीय शेती किंवा नैसर्गिक शेती
नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती या पध्दती जवळपास एकच आहेत.कारण दोन्हीमध्ये नियम तत्वे कार्य एकच आहेत.नैसर्गिक शेतीमध्ये स्थानिक किंवा आपल्या शेत परिसरातील नैसर्गिक स्रोतांचा किंवा निविष्ठाचा वापर करणे. नैसर्गिक शेतीमध्ये पर्यावरणात मिळणाऱ्या घटकाचाच वापर शेतीमध्ये केला जातो.तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण सेंद्रिय जैविक खते कीडनाशके विकत घेऊन त्यांचा वापर शेतीमध्ये केला जातो.
सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय.शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष शेण गोमूत्र नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते.सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे यामुळे वाफ्यात पाणी टिकून राहते.बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते.नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
*वैशिष्ट्ये:-*
* मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.पिके व आजुबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्त्वांचा व सभोवतालच्या सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर.
* निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी अनैसर्गिक वस्तू, निसर्गाशी अनोळखी जीवांचा (कीटकनाशके, रासायनिक पदार्थ, जीएमओ इत्यादी) उपयोग न करणे.
* शेतीवर अवलंबून असणाऱ्या जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देते.
* पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका.
* अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत.
* आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन.
* एकमेकाशी निगडित पद्धती चा उपयोग करणे.
* सेंद्रिय शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीचा उपयोग केला जातो.
* सेंद्रिय शेतीमध्ये पाळीव प्राण्यांचाही उपयोग केला जातो.
*सेंद्रिय खतांचे प्रकार:-*
वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.
*विविध टप्पे:-*
* शेतातील मातीचे संवर्धन व पोषण : रसायनांचा वापर बंद. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करणे. आधी घेतलेल्या पिकांचे उरलेल्या पाने, बुंधे, फांद्या इत्यादीचा वापर. पीक क्रमचक्र व पिकांत विविधता आणणे. अधिक नांगरणी टाळणे व शेतातील मातीस ओल्या किंवा हिरव्या गवताखाली झाकणे.
* तापमान अनुकूलन : शेताच्या मातीचे तापमान योग्य राखणे व शेतीच्या बांधांवर वनस्पती लावणे, जेणे करून जास्त उष्णता निर्माण होणार नाही.
* पावसाच्या पाण्याचा व सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग : पाझर तलाव,शेत तळे तयार करणे, उताराच्या शेतीवर पायरी पद्धत.सारख्या उंचीचे बांध घालणे. सौर ऊर्जेचा वापर. जास्तीत जास्त हिरवळ तयार करणे.
* नैसर्गिक साखळी, निसर्गचक्राचे पालन : जैववैविध्याची निर्मिती. कीटकनाशके न वापरणे.शेतीचे क्षेत्र, माती, हवामान यास अनुकूल असे पीक घेणे.जैविक नत्राचे स्थिरीकरण करणे.
* प्राण्यांचे एकीकरण : पाळीव जनावरांच्या शेण व मूत्राचा वापर, पशु-उत्पादन.सौर ऊर्जा, बायोगॅस इत्यादीचा वापर करणे.
* स्वावलंबन : स्वतःस लागणार्ऱ्या बियाण्यांचे उत्पादन. शेणखत, गांडूळखत, द्रव खते, वनस्पती अर्क इत्यादीचे स्वतःच उत्पादन करणे.
*एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा