कलिंगड | Fruit cracking | कारणे आणि उपाय |



उन्हाळ्यात सर्वात जास्त मागणी असणारे फळ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्यात सर्वांना आवडणारे आणि बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी कलिंगडला असते.त्यामुळे शेतकऱ्यांना कलिंगड पीक घेतल्यास चांगला फायदा नक्की मिळतो. 

 कलिंगड पीक घेताना शेतकऱ्याला वेगवेगळ्या समस्या येतात त्यापैकी एक म्हणजे फळ तडकण्याची समस्या. फळ पूर्ण तयार होऊन तडकल्यामुळे अश्या फळांना बाजारात मागणी नसते त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. तर आज आपण फळे तडकण्याची कारणे काय काय असू शकतात ते बघूया.  


फळे तडकण्याची कारणे 

पाणी व्यवस्थापन:-

 पिकाला फळ अवस्थेत दोन पाण्यांमधील अंतर जास्त राहिले तर जमीन जास्त काळ कोरडी पडते. याचा परिणाम वेलींना पाणी कमी पडल्यामुळे फळांमधील पाणी बाष्पीभवनामुळे उडून जाऊ नये म्हणून फळांची साल घट्ट बनते. परंतु अश्या वेलींना पुढे अचानक जास्त पाणी दिल्याने वेली वेगाने पाणी शोषून घेतात व जास्त पाण्यामुळे फळांमध्ये दबाव निर्माण होऊन फळांच्या सालीवर तडे जातात. यामुळे फळांची गुणवत्ता खालावते. 


हवामान बदल

 जास्त अथवा कमी तापमान, दिवस रात्रीच्या तापमानात जास्त तफावत आणि जास्त आर्द्रता यामुळे फळांच्या सालीवर आणि वाढीवर परिणाम होऊन फळांना तडे जातात. 


अन्नद्रव्ये व्यवस्थापन

 असंतुलित अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामुळे सुद्धा फळांना तडे जातात. पिकास कॅल्शिअम हे अन्नद्रव्ये कमी पडले तर फळांची साल मजबूत होत नाही त्याचबरोबर बोरॉन कमी पडल्याने फळांची साल कणखर होऊन तडे जातात. पोटॅश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळेसुद्धा फळांची साल पातळ होते आणि फळांची गुणवत्ता ढासळते. 


 उपाय

* पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीतच कलिंगड पिकाची लागवड करावी

* जमिनीत ओलावा टिकवून राहील अश्या पद्धतीने पाण्याचे नियमित नियोजन करावे शक्य असल्यास पिकांस ठिबक आणि मल्चिंगचा वापर करावा. 

* पीक वाढीच्या अवस्थेपासून पिकास मुबलक प्रमाणात कॅल्शिअम, बोरॉन, पोटॅश यांसारख्या अन्नद्रव्यांचा वापर करावा. 

* कॅल्शिअम आणि बोरॉन मुळे फळांची साल मजबूत व कठीण होते आणि फळांचा एकसारखा आकार होतो. 

* पोटॅश या अन्नद्रव्यामुळे फळाची साल जाड होते तसेच फळाचा रंग, गोडवा, वजन आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. 

* वातावरणाचा ताण येऊ नये/पिकावर फरक पडू नये यासाठी पिकास सिलिकॉन सारखे अन्नद्रव्ये फवारणीद्वारे वाढीच्या अवस्थेपासून वापरावे. 

संदर्भ-अ‍ॅग्रोस्टार



एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean