पिवळे-निळे चिकट सापळ्यांचे कीड व्यवस्थापनातील महत्व| Use of Sticky Trap | Yellow Sticky Trap| Blue Sticky Trap

 *🏫IPM SCHOOL🌱*




पिवळे-निळे चिकट सापळ्यांचे कीड व्यवस्थापनातील महत्व



*पिवळे व निळे चिकट सापळे हे मुख्यत: रसशोषक किडी नियंत्रणाचे काम करतात.


*पिवळा चिकट सापळा:-* पांढरी माशी,मावा,तुडतुडे  हे कीटक आकर्षित होतात.

*निळा चिकट सापळा:-* फुलकिडे(थ्रीप्स),नागअळीचे पतंग,चौकोनी टिपक्यांचे पतंग हे कीटक आकर्षित होतात.


* एकरी किमान 30 ते 40 चिकट सापळे लावले जातात. सर्व पिकामध्ये आपण या सापळ्यांचा वापर करू शकतो. एखाद्यावेळी कांद्यासारख्या पिकामध्ये फुलकिड्यांचा(थ्रीप्स) नियंत्रणासाठी 60 ते 80 निळे चिकट सापळे लावावे लागतात.

* रसशोषक किडी पिकातील हरितद्रव्य शोषून घेतात त्यामुळे पिकाची आंतरिक प्रक्रिया खालावून किट इतर रोगांना बळी पडते. 

* पांढरी माशी,मावा,थ्रीप्स, हे कीटक विषाणूजन्य रोगांचे वाहक म्हणून काम करतात. त्यामुळे विषाणूजनीत रोग पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवले जातात.

* उदा. मिरची मध्ये येणारा चुरडा-मुरडा,भेंडी मध्ये येणारा येल्लो व्हेन मोझ्याक,वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये येणारा कुकुरबीट मोझ्याक व्हायरस, हे विषाणूजन्य रोग पिकाची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यानंतर पिकात शिरकाव करतात. 

* जेव्हा रसशोषक कीड जसे पांढरी माशी एखाद्या रोगग्रस्त झाडातील रस शोषते आणि तीच माशी पुन्हा उडत जाऊन नवीन निरोगी झाडातील रस शोषते तेव्हा विषाणू हा रोगी झाडाकडून निरोगी झाडाकडे संक्रमित होतो. हे सर्व काही मिनिटामध्ये घडत असते त्यामुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.


* पिकाच्या सुरवाती पासून जेव्हा आपण पिवळे व निळे चिकट सापळे लावतो तेव्हा मावा,तुडतुडे,पांढरी माशी,थ्रीप्स यांच्या नियंत्रणाबरोबरच विषाणूजन्य रोग पिकामध्ये पसरवण्यापासून रोखले जातात. त्यासाठी होणारा कीटकनाशकांवरील फवारणी खर्च वाचतो.त्यामुळे पिवळे व निळे चिकट सापळे किट व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावतात.


*एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..*👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest