पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आंबा फळ सेटिंग अवस्था । तुडतुडे नियंत्रण उपाय । Jassid Management in Mango

इमेज
  आंबा बागेत फळे सेट होत असताना (म्हणजेच फळे वाटाण्याएवढी किंवा सुपारीच्या आकाराची असताना) तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास फळगळ होण्याची मोठी शक्यता असते. या काळात तुडतुडे फळांच्या कोवळ्या देठातून रस शोषतात, ज्यामुळे फळे कमकुवत होऊन गळतात. अशा वेळी योग्य प्रकारे नियंत्रण उपाय केल्यास होणारे नुकसान टाळले जाऊ शकते.  आंबा बागेमध्ये तुडतुडे नियंत्रणासाठी उपाययोजना:- सुरुवातीला जैविक आणि नैसर्गिक उपाय वापर करा. ज्यामुळे किडीचा प्रादुर्भाव लक्षात येईल आणि किडीचा प्रादुर्भाव कमी असताना नियंत्रण उपाय करणे सोपे जाईल.  *मशागत आणि बागेमध्ये स्वच्छता (प्रतिबंधात्मक उपाय)- छाटणी : बागेत सूर्यप्रकाश खेळता राहील याची काळजी घ्या. झाडाच्या आतील दाटी करणाऱ्या आणि वाळलेल्या फांद्या काढून टाका. सूर्यप्रकाशामुळे तुडतुड्यांचे प्रमाण कमी होते. *चिकट सापळे वापर: बागेत प्रति एकरी ३० ते ४० पिवळे चिकट सापळे लावा. तुडतुडे पिवळ्या रंगाकडे आकर्षित होऊन या सापळ्यांना चिकटतात. *जैविक उपाय:- * बिव्हेरिया बासियानाचा वापर: हे एक मित्र बुरशी आहे. ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी केल्यास तुडतुड्...

ऊसाची उन्हाळ्यातील उशिरा लागण । घ्यावयाची काळजी । Precautions for Late planting of Sugarcane

इमेज
  फेब्रुवारी-मार्च महिन्यात केली जाणारी उसाची लागण ही 'सुरू' हंगामातील लागण मानली जाते. या काळात तापमान वाढू लागलेले असते, त्यामुळे जमिनीतील ओलावा लवकर कमी होतो. या उशिराच्या लागणीत जास्तीत जास्त फुटवा आणि जोमदार वाढ मिळवण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.  घ्यावयाची काळजी:- १. योग्य वाणाची निवड:- * उशिरा लागण करताना लवकर पक्व होणारे आणि उष्णतेला दाद देणारे वाण निवडावेत. * शिफारस केलेले वाण: को. ८६०३२ (नीरा), को.व्ही.एस.आय. ०३१०२, को.एम. ०२६५ (फुले २६५). *ऊस बेणेची निवड करताना ताज्या आणि रसरशीत बेण्याचा (१०-११ महिने वयाचा ऊस) वापर करावा. २. बेणे प्रक्रिया (Seed Treatment):-  * ऊसाची लागण करताना बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.  * उन्हाळ्यामुळे उसाचे डोळे मरण्याची शक्यता असते, म्हणून बेणे प्रक्रिया चुकवू नका.  * बुरशीनाशक: १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेंन्डाझिम मिसळून बेणे १० मिनिटे बुडवून ठेवावे. हे सुरुवातीच्या अवस्थेत रोगापासून संरक्षण करते.  * कीटकनाशक: खोडकिडीच्या प्रतिबंधासाठी याच द्रावणात क्लोरोपायरीफॉस किंवा इमिडाक्लोप्रीड मिसळावे. * जिवाणू संव...