पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जुलै २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

इमेज
  जुलै २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे... 1. विशाल पाटील, सेनापती कापशी ता.कागल जि.कोल्हापूर जैविक कीटकनाशक वापरतो , चिकट सापाळा  2. संजय रामचंद्र कांबळे, नंद्याळ ता. कागल जि. कोल्हापूर  चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे, दशपर्णी अर्क तसेच निम अर्क फवारणी घेणे. 3. शिवाजी पांडुरंग चौगले, मु. पो. सोन्याची शिरोली, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर  एकात्मिक कीड नियंत्रण  करू जैविक कीड नियंत्रण करू  प्रकाश सापळे फेरोमेन ट्रॅप याचा वापर करू  निमार्क डदशपर्णी अर्क वापरू. 4. सयाजीराव गोपाळराव पोखरकर, कोतूळ,(गोपाळ बाग) ता. अकोले, जि. अहिल्यानगर   रशक किड्यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी आम्ही कोबी वर्गीय पिकामध्ये चिकटसापळे,वेलवर्गीय पिकांमध्ये फेरोमेन ट्रॅप्स, प्रकाश सापळे, यांचा वापर करतो. तर वांगी पिकामध्ये कडुनिंबाचा पाला तसेच करंज झाडाचा पाला वाटून, वस्त्रगाळ करून, त्याचे द्रावण पिकांवर फवारतो त्यामुळे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो/होत न...