जुलै २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

 


जुलै २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे...

1. विशाल पाटील, सेनापती कापशी ता.कागल जि.कोल्हापूर

जैविक कीटकनाशक वापरतो , चिकट सापाळा 


2. संजय रामचंद्र कांबळे, नंद्याळ ता. कागल जि. कोल्हापूर 

चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे, दशपर्णी अर्क तसेच निम अर्क फवारणी घेणे.


3. शिवाजी पांडुरंग चौगले, मु. पो. सोन्याची शिरोली, ता.राधानगरी, जि.कोल्हापूर 

एकात्मिक कीड नियंत्रण  करू जैविक कीड नियंत्रण करू  प्रकाश सापळे फेरोमेन ट्रॅप याचा वापर करू  निमार्क डदशपर्णी अर्क वापरू.


4. सयाजीराव गोपाळराव पोखरकर, कोतूळ,(गोपाळ बाग) ता. अकोले, जि. अहिल्यानगर

  रशक किड्यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी आम्ही कोबी वर्गीय पिकामध्ये चिकटसापळे,वेलवर्गीय पिकांमध्ये फेरोमेन ट्रॅप्स, प्रकाश सापळे, यांचा वापर करतो. तर वांगी पिकामध्ये कडुनिंबाचा पाला तसेच करंज झाडाचा पाला वाटून, वस्त्रगाळ करून, त्याचे द्रावण पिकांवर फवारतो त्यामुळे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो/होत नाही.

5. निखिल सुभाष जगताप, मु. पो. उडतरे, ता.वाई, जि.सातारा 

माझ्या मते कीड नियंत्रणासाठी फक्त रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून राहणे योग्य नाही. कारण सतत रासायनिक औषधांचा वापर केल्याने किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते, उत्पादन खर्च वाढतो आणि जमीन, पाणी तसेच उपयुक्त मित्र कीटकांनाही नुकसान होते.

म्हणून मी नियमित शेताची पाहणी करतो. कीड सुरुवातीच्या अवस्थेतच ओळखून पिवळे व निळे चिकट सापळे, फेरोमोन ट्रॅप, प्रकाश सापळे, तसेच नीम आधारित आणि जैविक उपायांचा वापर करतो. शेतातील तण व रोगग्रस्त झाडांचे अवशेष काढून स्वच्छता राखतो. पीक फेरपालट, संतुलित खत व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य पाणी व्यवस्थापन यावर भर देतो. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते आणि किडीचा प्रादुर्भावही कमी राहतो.

रासायनिक कीटकनाशकांची फवारणी मी गरज असेल तेव्हाच, शिफारशीनुसार आणि आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेऊन करतो. माझा विश्वास आहे की शेती ही फक्त आजच्या उत्पादनासाठी नसून पुढच्या पिढ्यांसाठीही आहे. म्हणून पर्यावरणाचा समतोल राखत, जमिनीचे आरोग्य जपत आणि सुरक्षित अन्न उत्पादन करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) हीच सर्वोत्तम दिशा आहे.

6. सचिन चंदर धिंडले, मु. पोस्ट कोतुळ, अहिल्यानगर

*जैविक कीटकनाशके: कडुनिंबाची पाने, निंबोळी तेल, किंवा दशपर्णी अर्क यांसारख्या नैसर्गिक वनस्पतिजन्य औषधांचा वापर केला जातो.

*मित्रकीटकांचे संवर्धन: शेतात मित्रकीटक (जसे की लेडीबर्ड भुंगे) जोपासले जातात, जे पिकांनावरील हानिकारक किडींना खाऊन नष्ट करतात.

*सापळे आणि अडथळे: कामगंध सापळे (Pheromone Traps) आणि पिवळे/निळे चिकट सापळे लावून किडींना आकर्षित करून पकडले जाते.

7. शरद केशवराव बोंडे. रा. भिलोना तालुका अचलपूर जिल्हा अमरावती 

एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM - Integrated Pest Management) पद्धतीचा वापर करू शकता. यामुळे पिकांचे रक्षण होते आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहते.१. जैविक नियंत्रण (Biological Control):मित्र कीटकांचा वापर: कीटकांवर उपजीविका करणारे मित्र कीटक (उदा. लेडीबर्ड बीटल, ट्रायकोग्रामा) शेतात सोडून कीटकांचा नायनाट करता येतो.जैविक औषधे: निंबोळी अर्क (Azadirachtin), बिव्हेरिया बासियाना, किंवा व्हर्टिसिलियम लेकानी यांसारख्या जैविक बुरशी आणि औषधांची फवारणी करावी.२. कृषी पद्धती (Cultural Practices):पीक फेरपालट: एकाच जमिनीत दरवर्षी एकच पीक न घेता पिकांची अदलाबदल करावी (उदा. तृणधान्यानंतर कडधान्य). यामुळे कीटकांचे जीवनचक्र तुटते.आंतरपीक पद्धती: मुख्य पिकांच्या ओळीत झेंडू, मोहरी किंवा कोथिंबीर यांसारखी पिके लावल्याने कीटक दूर राहतात.खोडवा पिके नष्ट करणे: काढणीनंतर पिकांचे अवशेष जाळून किंवा जमिनीत गाडून नष्ट करावेत.३. यांत्रिक आणि भौतिक नियंत्रणे (Mechanical & Physical Controls):कामगंध सापळे (Pheromone Traps): शेतात कामगंध सापळे लावून नर पतंगांना आकर्षित करून नष्ट केले जाते.प्रकाश सापळे (Light Traps): रात्रीच्या वेळी शेतात दिवा लावून कीटक गोळा करून मारता येतात.हाताने वेचणी: अळ्या किंवा मोठी कीडे हाताने वेचून नष्ट करणे.४. प्रतिबंधात्मक उपाय (Preventive Measures):प्रमाणित बियाणे: नेहमी रोगमुक्त आणि कीडमुक्त बियाण्यांचा वापर करावा.खतांचे योग्य प्रमाण: नत्राचा (Nitrogen) अतिवापर टाळावा, कारण यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो.तुम्ही कोणत्या पिकाची लागवड केली आहे आणि तुम्हाला कोणत्या विशिष्ट कीडीचा त्रास होत आहे, हे सांगितल्यास मी तुम्हाला अधिक अचूक आणि स्थानिक पद्धती सुचवू शकेन.

8. सागर आसवले, रा दौलतवाडी ता कागल जि कौल्हापुर
नमस्कार मी माझ्या शेतामध्ये जैविक किड नियत्रण करतो जसेकी निबोळी अर्क  चा वापर करतो.

9. आशिष विजय हुरबडे, मु पो भंडारज ता अंजनगाव सुर्जी जि अमरावती 
सेंद्रिय पद्धतीनी तयार केलेले  रसायन याचा वापर करतो आहे.

10. सुयश संजय लोखंडे, गाव कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर 
मी रासायनिक कीटकनाशकांवर पूर्ण अवलंबून राहत नाही. शेतात नियमित फेरफटका मारून कीड दिसताच हाताने अळ्या वेचतो, फेरोमोन व लाइट ट्रॅप लावतो, निंबोळी अर्क व जैविक कीटकनाशकांचा वापर करतो, शेत स्वच्छ ठेवतो, पीक फेरपालट करतो आणि उपयुक्त मित्र कीटकांचे संरक्षण करतो. त्यामुळे रासायनिक फवारणीची गरज कमी पडते.

11. संजय नानाभाऊ लोखंडे, मु. पो. कोतुळ, ता.अकोले, जि.अहिल्यानगर 
मी संजय नानाभाऊ लोखंडे प्रगशील शेतकरी कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून मी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतीचा अवलंब करतो. यामध्ये नियमित पीक निरीक्षण करून आर्थिक नुकसान पातळी (ETL) नुसारच उपाययोजना करतो. फेरोमोन सापळे, प्रकाश सापळे, पिवळे व निळे चिकट सापळे यांचा वापर करून किडींचे निरीक्षण व नियंत्रण करतो. जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा, क्रायसोपरला यांसारख्या उपयुक्त कीटकांचा वापर तसेच Trichoderma, Beauveria bassiana, Metarhizium anisopliae यांसारख्या जैविक घटकांचा वापर करतो.

नीम अर्क (Azadirachtin) सारख्या वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करतो. पीक फेरपालट, प्रतिकारक्षम वाणांची निवड, योग्य अंतरावर लागवड, संतुलित खत व्यवस्थापन व शेत स्वच्छता यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करतो. यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन पर्यावरणपूरक शेती, कमी खर्च आणि सुरक्षित उत्पादन मिळण्यास मदत होते.

12. सुधाकर कृष्ण मेटील, मु. पो. सिध्दनेर्ली, ता.कागल, जि.कोल्हापूर 
पक्षी थांबे, चिकट सापळे, इत्यादी

13. किरण वळते, मु. पो. उमरेड, ता.करमाळा, जि.सोलापूर
दशपर्णी अर्क

14. बाळकृष्ण दादू आंबिलढोके, मु.पो.नंदयाळ.ता.कागल.जि.कोलहापूर 
किड नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकांचा आपल्या पिकावर वापर करता येतो.तयापैकी 1. दशपर्णी अर्क.2.निंबोळी अर्क.3.लसुण ढेचा अर्क.4.ताक अंडी अर्क.किडीचा प़ारदुभाव होऊ नये यासाठी सुरवातीला आपल्या शेतामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे लावने गरजेचे आहे.तसेच ट़प व पक्षी थांबे लावने हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

15. मनोज मानापुरे, मु. पो. मौशी, ता.नागभीर, जि.चंद्रपूर
दशपर्णी अर्क,निंबोळी अर्क,ट्रॅप,कामगंध सापळे, निळे पिवळे चिकट सापळे,पाखरांना बसण्यासाठी मचान.

16. विजय हिमतराव भुतेकर, मु. पो. सवणा, ता. चिखली, जि. बुलढाणा
दश पर्णी अर्क व डॉ किशन चंद्रा सरांनी तयार केलेले इको फंगी बी उत्तम पर्याय आहे रासायनिक ऐवजी

17. औदुंबर उत्तम जाधव, मु.पो.लवंग ता.माळशिरस जि.सोलापुर
मेटारायजीम,बिव्हेरीया, दशपर्णी अर्क, हिंग तंबाखू वावडिंग मिश्रीत अर्क

18. महादेव बाळू मगदूम , मु. पो. बांबवडे, ता.शाहूवाडी, जि.कोल्हापूर
किड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके न वापरता आपण शेतात एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत वापरून किडींचे अधिक प्रभावी आणि सुरक्षित नियंत्रण करू शकतो.
*खोल नांगरट जमीन खोल नंबर करून दोन महिने तापून देणे.
*एक फेरपालट दरवर्षी एकच पीक न घेता पिकांची आदलाबदल करणे. 
*कामगंध सापळे हेक्टरी ठराविक सापळे लावून कीटकांचा प्रादुर्भाव थांबवणे.
 *तसेच इतर सापळ्यांमध्ये प्रकाश सापळे चिकट सापळे यांचा वापर
*मित्र कीटकांचे संरक्षण करणे.
 अशा पद्धतीने एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास रासायनिक कीटकनाशके वापरण्याचे प्रमाण कमी राहते किंवा त्याची गरज ही भासत नाही.

19. कृष्णात मारुती पाटील, मौजे सांगाव ता. कागल जि. कोल्हापूर 
कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशका ऐवजी निळे पिवळे चिकट सापळे, कामगंध सापळे आणि जैविक कीड नाशकांचा वापर करतो.

20. उल्हास भीमराव बोरगे , मु. पो. पूर शिरोली, ता.जुन्नर, जि.पुणे
Nimastra kiva दशपर्णी ark tayar karun फवारणी karato गावठी गाईचे गोमूत्र पण फवारणी करू शकतो.

21. विष्णू महादू पांडे, मु. पो. सेलूद तालुका भोकरदन जिल्हा जालना
कडुलिंब करंजी सिताफळ धोत्रा पपई निर्गुंडी कनेर गुळवेल अशा दहा प्रकारच्या वनस्पतींचा पाला प्रति दोन किलो दहा लिटर गोमूत्र दोन किलो शेण 200 ग्रॅम गूळ व 100 लिटर पाणी सर्व बारीक करून मिसळून सावलीत 21 ते 30 दिवस झाकून ठेवल्यानंतर ते आपण दररोज ढवळून गाळून  त पाच ते दहा लिटर अर्क 100 लिटर पाण्यासोबत फवारू शकतो याच्या या जैविक औषधामुळे किड्यांची नियंत्रण होते.

22. स्वप्नील माळी, मु पो बस्तवडे, ता कागल, जि. कोल्हापूर
चिकट सापळे( पिवळे, निळे ), कामागंध सापळे, प्रकाश सापळे, निम ऑइल, दशपर्णी अर्क, एकात्मिक कीड व्यवस्थापण, जैविक कीटकनाशके (उदा. ब्यूव्हेरिया, व्हर्टिसिलियम, मेटारायझियम, बॅसिलस थुरिंजिएन्सिस) वापरतो.पिकांची फेर पालट 

23. विशाल पाटील, सेनापती कापशी ता.कागल जि.कोल्हापूर
Neem oil, pheromone trap, Trap crop 

24.पुंडलिक कैलास तांदळे, मु. पो. देवनागर, ता.चाकूर, जि.लातूर
Thiamethoxam 12.6% +lambda-cyhalothrin9.5%zc +emamectin benglore 5%sg

25. विजय हिमंतराव भुतेकर, मु. पो. सवण, ता. चिखली, जि. बुलढाणा 
*दशपर्णी अर्क, *मिरची लसुन तंबाखु याचे मिस्रण करुन फवारणी,*एच एन पि व्ही जिवानु, *मेटाराईझम, *तसेच डॉ किशन चंद्रा सराचे इको फंगी बी, *हिगं व कापुर *निबोळी अर्क, *पक्षी थाबे लावतो, *फेरोमोन सापळे लावतो.

26. कृष्णात मारुती पाटील, मौजे सांगाव ता. कागल जि. कोल्हापूर 
रासायनिक किडनाशक सोडून निळे पिवळे चिकट सापळे लावणे, जैविक किडनाशक चा वापर करणे तसेच कामगंध सापळे लावणे व शेतात पक्षी थांबे उभे करणे 

27. सयाजीराव गोपाळराव पोखरकर, कोतूळ,(गोपाळ बाग) ता. अकोले, जि. अहिल्यानगर
कीटकनाशक सोडून किड नियंत्रणासाठी आम्ही रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी चिकटसापळे, प्रकाश सापळे, फेरोमॅन ट्रॅप चा वापर करतो तसेच कडुलिंबाचा अर्क िडीयाचा पाला इतर गुंजपाला इत्यादींची मिश्रण तयार करून त्याची फवारणी केल्यास, किडींचा प्रादुर्भाव चांगल्या प्रमाणात असेल तरीही नियंत्रण मिळते.म्हणून सेंद्रिय आणि मेकॅनिकल पद्धतीने रस शोषक किडी व पाने खाणाऱ्या आणि पाने गुंडाळणाऱ्या किडींचा बंदोबस्त करता येतो.

28. जिवन हरीचंद्र घोरमोडे, मुर्तिजापूर, अकोला 
निंबोळी अर्क, दशपर्णी 

29. योगेश लबडे, मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव 
दशपर्णी अक्र कामगंध सापळे निंबोळी अर्क वापरतो.

30.  श्री महेश विरेश व्यवहारे, मु होनमाळ पो अजनी (बु) ता. शिरुर अनंतपाळ जि लातुर.
किड नियंत्रणासाठी (1)शेतामध्ये पक्षी थांबे उभे करणे बंधाऱ्यावर मध्यभागी पक्षी थांब्यावर पक्षी बसल्यामुळे पक्षी हे आळ्या किटक  वेचून खातील.(2)  गुळाचे पाणी फवारणी केल्यामुळे गोडामुळे मुंग्या लागुन अळ्या नष्ट होतात .(3) पिक लहान असताना कोळपणी करावी त्या मुळे किटक खाली पडतात व नष्ट होतात.

31. विशाल फकीरचंद धनावत, चंडोल, ता.जि. बुलढाणा.
*दशपरणी अर्क फवारणी 
*निमोळी अर्क फवारणी 
*मेटॅरिजम आणि बिवेरिया फवारणी 
*फोरोमन ट्रॅप लावणे 
*चिकट साफळे लावणे 
*पक्षी थांबे लावणे 

32.गणपत मिसाळ, रा जानेफळ दाभाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना 
रासायनिक कीटकनाशक सोडून मी हे करतो:
*निंबोळी अर्क / दशपर्णी अर्क* फवारणी
*पिवळे चिकट सापळे + फेरोमोन ट्रॅप* लावणे  
*जिवाणू* - ट्रायकोडर्मा, बिव्हेरिया वापर
*हाताने कीड वेचणे + शेत स्वच्छ ठेवणे*

33. श्री सुरेश नाभीराज मगदूम, कसबा सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर 
दशपर्णी अर्क किंवा निमार्क 10000 p p m वापरता येत 

34. शिवचरण फकीरचंद धनावत, रा. चांडोल ता. जि. बुलडाणा 
दशपर्णी अर्क, निमास्त्र, बिव्हेरिया, मेटराझीम 

35.     समाधान रमेश लावले, चंडोल, ता.जि. बुलढाणा.
निंबोळी अर्क फवारणी.मेटारिझम फवारणी बिवेरिया फवारणी 

36. सौरव पाटील, मु. पो. तांदळवाडी, ता.रावेर, जि.जळगाव
जळगाव जिल्ह्यात केळी हे प्रमुख पीक म्हणून लागवड होत असते,तसेच आता शेतकरी हळद,पपई, व टरबुज या पिकांकडे वळलेला आहे, केळी हे पिक वार्षिक ( सध्या कमी ) पीक असल्यामुळे शेतकरी केळी घडाचे चांगले वजन मिळावे या साठी कापणी पर्यंत रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो त्या नंतर आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतामध्ये शेणखताचा वापर करतो ( अपूर्ण कुजलेले )आणि मग त्यामुळे हुमणी अळी white grub चा प्रादुर्भाव जास्त बघायला मिळतो बरेच शेतकरी रासायनिक घटक वापरतात पण आम्ही जैविक कीटकनाशक वापरतो (BVM) तसेच केळी या पिकावर cmv या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि तो रोपांवर रस शोषण करणाऱ्या किडींमुळे पसरतो त्या साठी रोप फवारणी साठी नीम अर्क चा वापर करतो (Antifeedant) म्हणून व पिवळे आणि निळे चिकट सापळे शेतात लावतो.
सध्या केळी बागांमध्ये सूत्रकृमी चा सुद्धा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे त्या साठी नीम अर्क व जैविक म्हणून pacilo आणि trico harzanium( Can Biosys कंपनी चे Nemastin) वापरतो.
* हळद - या मध्ये सुद्धा हुमणी आणि कंद माशी मुळे कंद मध्ये होणाऱ्या अळ्या या साठी BVM चा वापर करतो.
* टरबुज मध्ये नाग अळी साठी नीम अर्क आणि BVM फवारणीतून वापरतो तसेच रस शोषक किड साठी पिवळे निळे पांढरे चिकट सापळे लावतो आणि फळमाशी नियंत्रणासाठी frut Fly trap ( मक्षीकारी ) लावतो.
*पपई - या पिकावर मिलिबग दिसत असेल तर साबण चुरा शॅम्पू याची फवारणी करतो.


37. शिवश्री. रमेश संभाजी खंडागळे, मु. पो. अग्रण धुळगांव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली
मी पिकांमध्ये कीड नियंत्रणासाठी सुरुवातीच्या अवस्थेतच प्रतिबंधात्मक उपायांवर भर देत आहे. Green Revolution च्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या कामगंध (फेरोमोन) सापळ्यांचा प्रभावी वापर केल्यामुळे फळ पोखरणारी अळी, लष्करी अळी, खोड कीड यांसारख्या अनेक किडींचे पतंग अवस्थेतच नियंत्रण करणे शक्य होत आहे.
तसेच, पीक प्राथमिक अवस्थेत असतानाच ५% निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क यांची नियमित फवारणी करत आहे. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव सुरुवातीलाच आटोक्यात राहतो, रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी होते आणि अत्यल्प खर्चात प्रभावी पीक संरक्षण साध्य होते.
या एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते, पर्यावरणाचे संवर्धन होते आणि शेतकऱ्यांना अधिक किफायतशीर व शाश्वत शेती करण्यास मदत मिळते.
"प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय कामगंध सापळे, निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्काचा अवलंब करून; कमी खर्चात प्रभावी पीक संरक्षण मिळवा!" 🌾


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नारळामधील सर्वांत धोकादायक कीड । सोंड्या भुंगा । नुकसान आणि नियंत्रण उपाय । Red Palm Weevil

आंबा फळगळ समस्या । कारणे आणि उपाय । Mango Fruit Dropping Problem & Solutions

भाजीपाला पिकातील रोग व्यवस्थापन । मर रोग कारण आणि नियंत्रण । Vegetables wilt disease