पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जून २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

इमेज
  जून २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे 1. समीर सुर्वे, मु.पो - पावशी, ता-कुडाळ, सिंधुदुर्ग Right time sowing seeds, pond water irrigation, 2. कृषिभूषण सयाजीराव गोपाळराव पोखरकर, कोतूळ,ता. अकोले,जि. अहिल्यानगर  दुबार पेरणीची समस्या टाळण्यासाठी अवलंब करण्याच्या पद्धती..... *जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. *साधारणपणे 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. *उताराच्या आडव्या दिशेने पेरणी करावी, जेणेकरून झालेल्या पावसाचे पाणी अडवून नैसर्गिक रित्या त्या ओलाव्यावर पिकाची उत्तम वाढ होऊ शकेल. *संरक्षित पाण्याची व्यवस्था करून ठेवावी. * पावसाच्या कालखंडात अचानक पावसाने हुलकावणी दिल्यास एक दोन ओलिता वाचून पीक हातचे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संरक्षित पाणी देण्यासाठी शेततळे किंवा इतर ठिकाणची पर्यायी व्यवस्था तयार करावी. *कमी पावसात तग धरू शकतील अशा पिकांची पेरणीसाठी निवड करावी. *साधारणपणे या प्रमुख बाबींचा अवलंब केल्यास दुबार पेरणीचे संकट टाळता येऊ शकते. 3. गणपत रावसाहेब मिसाळ,...