पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऑगस्ट २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

  ऑगस्ट २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे... 1. चेतन हरणे, अल्लीपूर ता. हिंगणघाट जि. वर्धा  पांढरी माशी व मावा तुरतुडे साठी फवार मारतात व पिकवाढीसाठी एखादे संजीवक फवाऱ्यासोबत देतो. 2. मुनीर पटेल, इचलकरंजी जि. कोल्हापूर औ पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत प्रामुख्याने रस शोषक किडींचा बंदोबस्त करावा.  त्यासाठी थायोमेथॉग्जाम इमिलाक्लोप्रीड, ऍसिटॅमि प्रीड  सारख्या औषधांचा उपयोग करावा.  3. धर्माबाद, नांदेड  वरील फोटोमध्ये दाखवलेल्या पिकामध्ये रस शोषक किडींचा त्यामध्ये मुख्यतः पांढरी माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि त्यामुळे पांढरी माशी ही वरील येलो-मोजक या विषाणूजनित रोगाचा प्रसार पिकामध्ये मोठ्या प्रमाणात करत आहे त्यामधून वरील परिस्थिती निर्माण झाली त्यासाठी सर्वप्रथम पांढरी माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मी माझ्या प्लॉटमध्ये चिकट सापळ्यांचा वापर करेल जेणेकरून या विषाणूजन्य रोगाचा वाहक म्हणून प्रसार करणाऱ्या पांढरी माशीची नियोजन करता येईल व प्रादुर्भाव आहे त्या परिस्थितीत...