ऑगस्ट २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

 


ऑगस्ट २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे...

1. चेतन हरणे, अल्लीपूर ता. हिंगणघाट जि. वर्धा 

पांढरी माशी व मावा तुरतुडे साठी फवार मारतात व पिकवाढीसाठी एखादे संजीवक फवाऱ्यासोबत देतो.

2. मुनीर पटेल, इचलकरंजी जि. कोल्हापूर

औ पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत प्रामुख्याने रस शोषक किडींचा बंदोबस्त करावा. 

त्यासाठी थायोमेथॉग्जाम इमिलाक्लोप्रीड, ऍसिटॅमि प्रीड 

सारख्या औषधांचा उपयोग करावा. 

3. धर्माबाद, नांदेड 

वरील फोटोमध्ये दाखवलेल्या पिकामध्ये रस शोषक किडींचा त्यामध्ये मुख्यतः पांढरी माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि त्यामुळे पांढरी माशी ही वरील येलो-मोजक या विषाणूजनित रोगाचा प्रसार पिकामध्ये मोठ्या प्रमाणात करत आहे त्यामधून वरील परिस्थिती निर्माण झाली त्यासाठी सर्वप्रथम पांढरी माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मी माझ्या प्लॉटमध्ये चिकट सापळ्यांचा वापर करेल जेणेकरून या विषाणूजन्य रोगाचा वाहक म्हणून प्रसार करणाऱ्या पांढरी माशीची नियोजन करता येईल व प्रादुर्भाव आहे त्या परिस्थितीत थांबवता येईल त्याची वाढ थांबेल त्यानंतर देखील सदरील रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यास मी पांढरी माशी कंट्रोल करण्यासाठी केमिकल रसायनाचा वापर करण्याचा विचार करेल.

4. भागिनाथ बाबासाहेब आसने, मु.पो.ब्राह्मणगाव ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर 

पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मी प्रतिबंधात्मक उपायांना अधिक महत्त्व देतो. रोगमुक्त व प्रमाणित बियाणे/रोपे वापरणे, शेतातील रोगट झाडे त्वरित काढून नष्ट करणे, तणांचे नियंत्रण करणे आणि पिकाची नियमित पाहणी करणे हे उपाय करतो. विषाणूजन्य रोगांचा प्रसार प्रामुख्याने मावा, पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडींमुळे होत असल्याने त्यांचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करतो. तसेच शेतात स्वच्छता राखणे, योग्य अंतर ठेवणे, संतुलित खत व्यवस्थापन करणे आणि आवश्यकतेनुसार जैविक उपायांचा वापर करतो. त्यामुळे रोगाचा प्रसार सुरुवातीच्या अवस्थेतच रोखण्यास मदत होते.

5. संजय रामचंद्र कांबळे, नंद्याळ ता. कागल जि. कोल्हापूर 

खरं तर पिकावर येणारे रोग होऊच नये यासाठी पिक घेण्या अगोदर पासून करणे गरजेच आहे. योग्य वाणाची निवड करणे, कीड रोग पसरू नये म्हणून पिवळे निळे चिकट सापळे, आणि कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्क फवारणी, महत्त्वाचं म्हणजे तण नियंत्रण करणे.

6. Amol Laxman Galgunde, Bembale

Sticky traps+thrips sathi spray

7. Prakash Kadgave, Nippani, Belgaum Karnataka 

We spray Neem oil and fungicide for control.........

8. विशाल फकीरचंद धनावत, मु पोस्ट चांडोल ता. बुलढाणा जि. बुलढाणा 

पिकांमध्ये येणाऱ्या विशानुजन्य रोगाच्या नियंत्रना साठी 

१.सर्व प्रथन पांढरी माशी. मावा. तुडतूडे यांचे एकात्मितिक नियंत्रण करावे लागेल 

२.यासाठी एकरी २० पिवळे चिकट साफळे २०निळे चिकट साफळे लावावे लागेल

३.निमोळी अर्क फवारणी करावी लागेल 

४. सापळ्यांचा वापर: रसशोषक किडींना पकडण्यासाठी व त्यांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी एकरी २० ते २५ पिवळे व निळे चिकट सापळे लावा.

५. संरक्षक पिकांची लागवड (Barrier Crops): मुख्य पिकाच्या सभोवती मका किंवा ज्वारीच्या २-३ ओळी लावा, ज्यामुळे रसशोषक किडी थेट मुख्य पिकावर येण्यापासून रोखल्या जातील.

६. निंबोळी अर्काची फवारणी: किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीनंतर सुरुवातीपासूनच ५% निंबोळी अर्क किंवा कडुलिंबाच्या तेलाची (५ मिली/लिटर) प्रतिबंधात्मक फवारणी करा.

७. संतुलित खत व्यवस्थापन: पिकाला नत्रयुक्त (युरिया) खतांचा अतिवापर टाळा आणि पालाश, झिंक व बोरॉन यांसारख्या अन्नद्रव्यांचा योग्य वापर करा, ज्यामुळे झाडांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते.

८. रासायनिक कीटकनाशकांचा वापर: पांढरी माशी व मावा यांसारख्या वाहक किडींच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार थायमेथोक्सम (२५% WG), ॲसिटामिप्रिड (२०% SP) किंवा डायफेंथियुरॉन (५०% WP) ची फवारणी करा.

९. पीक फेरपालट: एकाच जमिनीत दरवर्षी एकाच कुळातील पिके घेण्याचे टाळा आणि पिकांची योग्य फेरपालट करा (उदा. पालेभाज्या किंवा तृणधान्ये).

१०. स्वच्छता व निर्जंतुकीकरण: शेतात काम करताना रोगाची लागण झालेल्या झाडांना हात लावल्यानंतर निरोगी झाडांना स्पर्श करू नका, तसेच छाटणीची अवजारे (कात्री, कोयता) निर्जंतुक करूनच वापरा.

9. सागर आसवले, दौलतवाडी ता कागल जिल्हा कौल्हापुर

हा रोग रस विषयी किडीमुळे होतो त्याच्यासाठी चिकटसापळे लावणी हा एकमेव पर्याय आहे

10.सागर आसवले, राहणार दौलतवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर

रोगग्रस्त झाडे मुळासकट उकळून टाकणे व चिकट साखळी लावणी हे पर्याय करावे

11.रविराज विश्वंभर देवराये, मु. पो. पवना ता.हिमायतनगर. जिल्हा. नांदेड...

🙏 जैविक ओर्गेनिक खते वापरावे व शक्यतो तणनाशक वापर टाळावा... 👏👏

12.Maruti Chavan, At post hitani,Tal gadhinglaj

Fungicides ,insecticide and micronutrients चा उपयोग करणे किंवा फवारणी करणे 

13.Satyajit Madhusudan Mirapure, Pekarda Po. Shendri Bk.Tq.Darwha Di.Yavatmal 

निरोगी बियाणे व वाण: - लागवडीसाठी नेहमी प्रमाणित, निरोगी आणि विषाणू-रोगप्रतिकारक किंवा सहनशील वाणांची निवड करावी. कीटक नियंत्रण (वाहक): 

विषाणूचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांसारख्या रसशोषक किडींमुळे होतो. यांच्या नियंत्रणासाठी पिकाच्या सुरुवातीपासूनच एकरी ३० ते ४० पिवळे व निळे चिकट सापळे (Yellow & Blue Sticky Traps) शेतात लावावेत. 

बॉर्डर क्रॉपिंग (संरक्षक पीक):- मुख्य पिकाभोवती मक्का, ज्वारी किंवा बाजरी यांसारख्या उंच वाढणाऱ्या पिकांच्या २ ते ३ ओळी लावाव्यात. यामुळे बाहेरील किडी मुख्य पिकापर्यंत पोहोचण्याआधीच त्यांचे विषाणू लोड कमी होतात. 

रोगट झाडे नष्ट करणे:- शेतात एखादे झाड विषाणूने ग्रस्त (पानं आकडलेली, पिवळी पडलेली) दिसल्यास ते तात्काळ उपटून नष्ट करावे, जेणेकरून त्याचा प्रसार इतर निरोगी झाडांवर होणार नाही.

 शेत स्वच्छता:- शेत आणि बांध तणविरहित ठेवावेत, कारण तणांवर रसशोषक किडी आश्रयाला व प्रादुर्भावाला वाढवतात. तसेच नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा.

14.शरद केशवराव बोंडे, राहणार भिलोना तालुका अचलपूर  जिल्हा अमरावती 

पिकांमधील विषाणूजन्य रोगांवर (व्हायरस) थेट उपचार करणारे कोणतेही औषध नाही. त्यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रोगट झाडे नष्ट करणे आणि रस शोषणाऱ्या कीटकांवर (पांढरी माशी, मावा, तुडतुडे) नियंत्रण ठेवणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे.प्रतिबंध आणि नियंत्रण उपायरोगट झाडे नष्ट करणे: विषाणू लागलेली झाडे मुळासकट उपटून नष्ट करा. त्यांना शेतात किंवा कंपोस्ट खतात अजिबात टाकू नका.वाहक कीटकांचे नियंत्रण: पांढरी माशी, मावा आणि थ्रिप्स यांसारखे कीटक विषाणू पसरवतात. यांच्या नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकांची फवारणी करा.पिवळे चिकट सापळे: शेतात पिवळे अडकणारे सापळे (Yellow Sticky Traps) लावा. यामुळे पांढरी माशी व इतर कीटक आकर्षित होऊन मरतात.प्रतिकारक वाणांची निवड: पेरणी किंवा लागवड करताना विषाणू-प्रतिकारक वाणांची निवड करा.प्रमाणित बियाणे वापरा: निरोगी व प्रमाणित केलेले बियाणे किंवा रोपे खरेदी करा.शेताची स्वच्छता: शेत तणमुक्त ठेवा. कामाची अवजारे आणि हात वेळोवेळी निर्जंतुक करा.तुम्हाला कोणत्या पिकातील विषाणूजन्य

15.संकेत सुभाष जाधव, मु. पो. भोसरे तालुका खटाव जिल्हा सातारा 

पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर थेट उपचार नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. माझ्या शेतात विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसल्यास प्रादुर्भाव झालेली झाडे मुळासकट काढून शेताबाहेर नष्ट करतो. तसेच रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा, पांढरी माशी, तुडतुडे, थ्रिप्स इत्यादी रसशोषक किडींचे नियमित निरीक्षण करून त्यांचे नियंत्रण करतो.

निरोगी व प्रमाणित बियाणे/रोपे वापरणे.

रोगट झाडे त्वरित काढून नष्ट करणे.

पांढरी माशी, मावा व थ्रिप्ससाठी पिवळे/निळे चिकट सापळे वापरणे.

शेतातील व बांधावरील तण काढून टाकणे, कारण तण हे विषाणूचे पर्यायी यजमान ठरू शकतात.

एकाच पिकाची सतत लागवड न करता पीक फेरपालट करणे.

संतुलित खत व्यवस्थापन करून झाडांची प्रतिकारक्षमता व वाढ चांगली ठेवणे.

शेतात काम करताना रोगट झाडांपासून निरोगी झाडांकडे रोगाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेणे.

शक्य असल्यास विषाणू प्रतिरोधक/सहनशील वाणांची निवड करणे.

सुरुवातीच्या अवस्थेत नियमित पाहणी करून रोगाची लक्षणे दिसताच तातडीने उपाययोजना करणे.

महत्त्वाचे म्हणजे विषाणूजन्य रोगासाठी एकदा झाड संक्रमित झाल्यानंतर औषधाने ते पूर्णपणे बरे होत नाही; त्यामुळे “रोगट झाड काढणे + रोगवाहक किडींचे नियंत्रण + स्वच्छता + निरोगी लागवड साहित्य” ही एकात्मिक व्यवस्थापनाची मुख्य पद्धत आहे.

NPK जिवाणू कॉन्सोर्शिया/जैविक निविष्ठांचा वापर मातीचे आरोग्य व झाडांची एकूण वाढ सुधारण्यासाठी करता येतो; मात्र त्याला विषाणूवर थेट उपचार म्हणून वापरू नये.

16. सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट, भोसरे मु. पो. भोसरे तालुका खटाव जिल्हा सातारा 

पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर थेट उपचार करणे कठीण असल्याने मी प्रतिबंधात्मक आणि एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन (IPM) पद्धतीचा अवलंब करतो.

1)निरोगी बियाणे व रोपांची निवड – प्रमाणित, रोगमुक्त व चांगल्या प्रतीचे बियाणे/रोपे वापरतो.

2)शेताचे नियमित निरीक्षण – पिकाची नियमित पाहणी करून पानांवर पिवळे-हिरवे चट्टे, पाने वाकडी होणे, खुंटलेली वाढ, पानांचा आकार बदलणे किंवा झाडाची वाढ थांबणे अशी लक्षणे सुरुवातीच्या अवस्थेतच शोधतो.

3)रोगट झाडे त्वरित काढणे – विषाणूची लक्षणे असलेली झाडे मुळासकट उपटून शेताबाहेर नष्ट करतो. रोगट झाडे शेतात ठेवत नाही.

4)रोगवाहक किडींचे नियंत्रण – मावा, पांढरी माशी, तुडतुडे व थ्रिप्स यांसारख्या रसशोषक किडी विषाणूचा प्रसार करतात. त्यामुळे त्यांचे नियमित निरीक्षण करून योग्य वेळी नियंत्रण करतो.

5)चिकट सापळ्यांचा वापर – पांढरी माशी व मावा यांसाठी पिवळे चिकट सापळे, तर थ्रिप्ससाठी निळे चिकट सापळे वापरून किडींचे निरीक्षण व नियंत्रण करतो.

6)तण नियंत्रण – शेतातील तसेच बांधावरील अनावश्यक तण वेळेवर काढतो. काही तणे विषाणू व रोगवाहक किडींचे आश्रयस्थान बनू शकतात.

7)पीक फेरपालट – एकाच पिकाची सतत लागवड न करता योग्य पीक फेरपालट करतो, त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव व रोगवाहक किडींची संख्या कमी करण्यास मदत होते.

8)शेतातील स्वच्छता – मागील पिकाचे रोगट अवशेष, स्वयंउगवलेली पिके आणि रोगट झाडे शेतात ठेवत नाही.

9)संतुलित खत व पाणी व्यवस्थापन – पिकाला आवश्यकतेनुसार संतुलित अन्नद्रव्ये व पाणी देतो. अति नत्राचा वापर टाळून झाडांची निरोगी वाढ राखतो.

10)जैविक उपायांना प्राधान्य – शक्य तिथे जैविक निविष्ठा व उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर करून जमिनीचे आरोग्य आणि पिकाची वाढ चांगली ठेवण्यावर भर देतो.

11)रोग दिसताच तज्ज्ञांचा सल्ला – विषाणूजन्य रोग आणि अन्नद्रव्यांची कमतरता किंवा इतर रोग यांची लक्षणे सारखी दिसू शकतात. त्यामुळे अचूक निदान करूनच पुढील उपाययोजना करतो.

12)अनावश्यक फवारणी टाळतो – विषाणूजन्य रोगावर केवळ बुरशीनाशक किंवा कोणतेही औषध फवारून रोग बरा होत नाही. त्यामुळे रोगाचे कारण व रोगवाहक कीड ओळखूनच आवश्यक ती उपाययोजना करतो.


माझ्या मते, विषाणूजन्य रोग नियंत्रणाचा मुख्य मंत्र म्हणजे — “निरोगी लागवड साहित्य + नियमित निरीक्षण + रोगट झाडांचे निर्मूलन + रोगवाहक किडींचे नियंत्रण + तण व शेत स्वच्छता + संतुलित पीक व्यवस्थापन.” अशा एकात्मिक पद्धतीने रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

17.कृष्णात पाटील, भाटणवाडी, ता. करवीर, जिल्हा. कोल्हापूर.

प्रमाणित बियाणांचं वापर, पिवळे निळे चिकट सापळे लावणे,रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करणे, तसेच पिकाची फेरपालट करावी.

18.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नारळामधील सर्वांत धोकादायक कीड । सोंड्या भुंगा । नुकसान आणि नियंत्रण उपाय । Red Palm Weevil

आंबा फळगळ समस्या । कारणे आणि उपाय । Mango Fruit Dropping Problem & Solutions

आंब्याच्या बागेमध्ये मोहोर येण्यापूर्वी करण्याच्या उपाययोजना । Precautions Before Mango Flowering