आंब्याच्या बागेमध्ये मोहोर येण्यापूर्वी करण्याच्या उपाययोजना । Precautions Before Mango Flowering

 


आंबा बागेमध्ये मोहोर येण्याअगोदर खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. हा काळ आंब्याच्या चांगल्या उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. यावेळी योग्य काळजी घेतल्यास कीड, रोग आणि इतर कारणामुळे होणारे नुकसान थांबवता येऊन चांगले उत्पादन घेता येऊ शकते. सध्या काही भागात आंब्याला मोहोर येणे चालू झाले आहे तर काही ठिकाणी मोहोर येण्यासाठी काही अवधी आहे. 

  तर आज आपण जाणून घेऊया कि आंबा बागेमध्ये मोहोर येण्याअगोदर कोणती काळजी घ्यावी?

मोहोर येण्याअगोदर घ्यावयाची काळजी:-

मोहोर येण्याचा काळ साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर असतो. या काळात झाडांवर योग्य ताण (Stress) देणे आणि अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते.

1.पाणी व्यवस्थापन:-

* पाणी देणे थांबवणे:- मोहोर येण्याच्या साधारण दोन महिने आधी (नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुरुवातीस) बागेचे पाणी पूर्णपणे थांबवावे. यामुळे झाडांवर पाण्याचा ताण निर्माण होतो. कारण हा ताण आल्याशिवाय झाडामध्ये नवीन पालवी येण्याऐवजी मोहोर येण्यास मदत होते.

* महत्वाचे:- मोहोर स्पष्टपणे दिसू लागल्यावर आणि तो 50% विकसित झाल्यावरच हलके पाणी देणे सुरू करावे.


2.कीड आणि रोग नियंत्रण:-

मोहोर येण्यापूर्वी कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा प्रतिबंधात्मक फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण एकदा मोहोर आल्यावर रासायनिक फवारणी टाळावी.

तुडतुडे आणि थ्रिप्स नियंत्रण:-

* या किडींच्या व्यवस्थापनासाठी पिवळे निळे चिकट सापळे मोहोर यायला सुरुवात झाल्यानंर लगेच लावावेत. त्यामुळे किडीची संख्या मर्यादित राहून णूनक्सन कमी होते. 

* तसेच मोहोर येण्यापूर्वी व किडीची संख्या जास्त दिसू लागल्यास या रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड किंवा थियामेथॉक्सम यांसारख्या प्रभावी कीटकनाशकाची फवारणी करावी.

भुरी आणि करपा:-

आंब्यामध्ये मोहोर अवस्थेत  हे दोन प्रमुख बुरशीजन्य रोग मोहराचे मोठे नुकसान करतात. यांच्या प्रतिबंधासाठी सल्फर (गंधक) किंवा कार्बेन्डाझिम, टेबुकोनाझोल यांसारख्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

महत्वाचे:- पहिली फवारणी मोहोर दिसण्यापूर्वी आणि दुसरी फवारणी मोहोर 50% झाल्यावर करावी.


3.अन्नद्रव्य (खत) व्यवस्थापन:-

* पोटॅशियम आणि फॉस्फरस:- मोहोर येण्यापूर्वी झाडांना पोटॅशियम (K) आणि फॉस्फरस (P) युक्त खते द्यावीत. ही अन्नद्रव्ये मोहोर येण्यास आणि फळधारणा चांगली होण्यास प्रोत्साहन देतात.

* नत्रयुक्त खताचा वापर कमी करणे:- या काळात नत्र युक्त खते देणे टाळावे, कारण नत्रामुळे पालवी वाढते आणि मोहराची वाढ खुंटते.

* मोहोर प्रवृत्त करण्यासाठी उपाय:- जर झाडांना योग्य ताण मिळत नसेल किंवा मोहोर कमी येत असेल, तर पॅक्लोबुट्राझोल (Paclobutrazol) (व्यावसायिक नावे: कल्टार/मीटक/प्लिक्स) यासारख्या रासायनिक द्रव्यांचा वापर करणे.

 (वापरताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा) 

* वापरण्याची वेळ:- हे रसायन साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झाडाच्या बुंध्याजवळ मातीत दिले जाते. हे रसायन झाडाची पालवी वाढवण्याची प्रक्रिया थांबवून मोहोर येण्यास मदत करते.


4.बागेतील स्वच्छता आणि छाटणी:-

* वाळलेल्या फांद्यांची छाटणी:- झाडांच्या आतील बाजूच्या वाळलेल्या, रोगग्रस्त आणि अनावश्यक फांद्यांची छाटणी करावी. यामुळे झाडामध्ये सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते.

* स्वच्छता:- झाडाखालील पालापाचोळा आणि रोगग्रस्त फांद्या गोळा करून नष्ट कराव्यात, जेणेकरून किडींना लपायला जागा मिळणार नाही.

 या काळजीमुळे झाड योग्य वेळी, मोठ्या प्रमाणात आणि चांगला मोहोर तयार करते, ज्यामुळे पुढे चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.

हि काळजी घेतल्यास आंब्याच्या झाडाला भरपूर मोहोर येऊन जास्त उत्पन्न मिळेल. 

स्रोत-इंटरनेट 

उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

नारायण नागपुरे, नागपूर

शिवाजी चौगले, राधानगरी कोल्हापूर

 उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipmschool #IPM #gogreen #mango #mangofarming #precautions #beforeflowering #horticulture #mangofarmer #smartfarming 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest