जून २०२६ चा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी दिलेली उत्तरे

 


जून २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे आणि त्यांनी दिलेली उत्तरे

1. समीर सुर्वे, मु.पो - पावशी, ता-कुडाळ, सिंधुदुर्ग

Right time sowing seeds, pond water irrigation,


2. कृषिभूषण सयाजीराव गोपाळराव पोखरकर, कोतूळ,ता. अकोले,जि. अहिल्यानगर

 दुबार पेरणीची समस्या टाळण्यासाठी अवलंब करण्याच्या पद्धती.....

*जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. *साधारणपणे 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. *उताराच्या आडव्या दिशेने पेरणी करावी, जेणेकरून झालेल्या पावसाचे पाणी अडवून नैसर्गिक रित्या त्या ओलाव्यावर पिकाची उत्तम वाढ होऊ शकेल. *संरक्षित पाण्याची व्यवस्था करून ठेवावी. * पावसाच्या कालखंडात अचानक पावसाने हुलकावणी दिल्यास एक दोन ओलिता वाचून पीक हातचे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संरक्षित पाणी देण्यासाठी शेततळे किंवा इतर ठिकाणची पर्यायी व्यवस्था तयार करावी. *कमी पावसात तग धरू शकतील अशा पिकांची पेरणीसाठी निवड करावी. *साधारणपणे या प्रमुख बाबींचा अवलंब केल्यास दुबार पेरणीचे संकट टाळता येऊ शकते.


3. गणपत रावसाहेब मिसाळ, जानेफळ दाभाडी ता. भोकरदन जि. जालना 

*दुबार पेरणी टाळण्यासाठी मी 5 उपाय करतो: *हवामान बघून पेरणी:* मेघदूत ॲप वर 3-4 दिवस चांगला पाऊस आहे हे बघूनच पेरणी करतो. *वापसा तपासतो:* 4 इंच खोल मातीचा गोळा झाला तरच पेरणी. कोरड्यात बी टाकत नाही. *BBF पद्धत:* रुंद वरंबा सरी वर पेरणी. याने कमी पावसात ओल टिकते, जास्तीत निचरा होतो. *बीजप्रक्रिया + सुधारीत वाण:* बियाण्याला जिवाणू संवर्धक लावतो व JS-20-34 सारखे ताण सहन करणारे वाण पेरतो. *आच्छादन:* पाचट टाकून जमिनीतली ओल टिकवतो. *यामुळे मागच्या वर्षी 1.5 एकर दुबार पेरणी वाचली.*

4. गजानन रमेश वाटाणे, आसेगाव पूर्ण,ता. चांदुर बाजार,जि. अमरावती

jarmineshan  and bijaprakiya


5. सोमवंशी विजय बाळासाहेब, मु. सुंदरपुर ता.निफाड जि. नाशिक 

पुरेशी ओल असल्या नंतर पेरणी करणार


6. शरद केशवराव बोंडे (भिलोना तालुका अचलपूर  जिल्हा अमरावती)
             खरीप हंगामात दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करणे, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे, आणि बीजप्रक्रिया करणे यासारख्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत。
      या समस्येपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी खालील शास्त्रीय आणि व्यावहारिक उपाययोजना करता येतील: *१. योग्य वेळेची निवड आणि हवामान अंदाजघाई टाळा: पावसाच्या केवळ १-२ सरींवर लगेच पेरणी करू नका. जमिनीत पुरेसा ओलावा (किमान १० सें.मी. खोल ओल) निर्माण झाल्याशिवाय (साधारण ७५ ते १०० मिमी पाऊस) पेरणी करू नये. हवामानाचा सल्ला: पेरणी करण्यापूर्वी भारतीय हवामान विभाग (IMD) किंवा स्थानिक कृषी विभागाचा अधिकृत हवामान अंदाज तपासा。*२. बियाण्यांची निवड व बीजप्रक्रियाउगवण क्षमता चाचणी: पेरणीपूर्वी बियाण्यांची 'घरगुती उगवण क्षमता चाचणी' (उदा. १०० बिया ओल्या कापडात गुंडाळून) करून पहावी。बीजप्रक्रिया: बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो ३ ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझिम यांसारख्या बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी。 त्यानंतर 'रायझोबियम' किंवा 'पीएसबी' जिवाणू संवर्धनाची (Seed treatment) प्रक्रिया अवश्य करावी. *३. सुधारित पीक पद्धतीआंतरपीक पद्धत: केवळ एकच पीक न घेता आंतरपिकांचा (उदा. सोयाबीन + तूर, किंवा बाजरी + तूर) वापर करा。 यामुळे पावसाच्या खंडातही एखादे पीक पदरात पडते आणि दुबार पेरणीचा धोका टळतो.कमी कालावधीचे वाण: हवामान बदलाचा विचार करून कमी कालावधीत तयार होणाऱ्या आणि रोगप्रतिकारक वाणांची निवड करावी。*४. योग्य पेरणी तंत्रचाड्यावर खत आणि बियाणे: पेरणी करताना एकाच पाभरीने किंवा तिफणीने चाड्याद्वारे बियाण्यासोबत खताची मात्रा द्यावी. यामुळे पिकांची जोमदार वाढ होते。*कोरडवाहू तंत्रज्ञान: जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी खोल नांगरट आणि योग्य मशागत करून घ्यावी。पेरणीच्या वेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि दुबार पेरणीची वेळ टाळण्यासाठी कोणती रणनीती अवलंबावी, याविषयीच्या माहितीसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो:1:12पेरणीपूर्वी या 5 गोष्टी लक्षात ठेवा!  
 *तुम्ही यंदाच्या खरीप हंगामात कोणते पीक (उदा. सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी) लावण्याचा विचार करत आहात आणि तुमची जमीन कोणत्या प्रकारची (हलकी, मध्यम की भारी) आहे,  त्यानुसार मी किंवा ग्रीन रेवोल्युशन IPM स्कूल  तुम्हाला अधिक तपशीलवार व अचूक कृषी- मार्गदर्शन करतील.

7. विजय पुंडलिक बोडखे, मु. पो. पानवडोद खु, तालुका सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
जमिनीत योग्य ओलावा, बियाण योग्य खोलीवर,, दर्जेदार बियाण घेऊनच पेरणी केली तर दुबार पेरणीच संकट येणार नाही,  सोबतच योग्य बियाणे प्रक्रिया करूनच पेरणी करावी.

8. मनोज मानापुरे, मौशी,ता. नागभीर,जि. चंद्रपूर
आम्ही धान आवत्या टाकतो.

9. भागीनाथ बाबासाहेब आसने,मु.पो. ब्राह्मणगाव ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर
*पुरेशी वोल झाल्यावरच पेरणी करणे *बियाण्याची उगम क्षमता तपासणी *बियाण्याला बीज प्रक्रिया करणे *खात्रीशीर बियाण्याची निवड

10. योगेश टुपके, तळेगाव मळे
*खरीप हंगामामध्ये  पेरणी करताना, हा स्फुरद या दाणेदार खताची पेरणी ही  बियाण्यासोबत सोबत करावी स्फुरद मुळे जी वनस्पतीची मुळे असतात ती अतिशय प्रभावीपणे वाढतात आणि स्फुरद हे जे खत आहे ते पाण्यासोबत वाहून जात नाही त्यामुळे पेरणी करताना जर स्फुरद म्हणजेच दाणेदार जर आपण वापरले त्यामुळे मुलांची ग्रोथ चांगली होते आणि  वनस्पती उगवल्यानंतर त्याला दुरून पाणी खेचण्यासाठी मुळं जी आहे ती प्रभावीपणे कार्यक्षम झालेले असतात.
*बीज प्रक्रिया करताना एनपीके जिवाणू सोबत जर आपण बीज प्रक्रिया केली तर उगवण चांगली होते आणि जर उगवण चांगली झाली तर दुबार पेरणीचे संकट हे टाळते.
डाळवर्गीय पिका असेल तर आपण ऍझोटोबॅक्‍टर या जिवाणूची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. 
*केमिकल बीज प्रक्रिया जर आपण केली बिजासोबत आपण थायरम या केमिकलची लिपिंग आपण जर बियाणावर लावली तर विविध कीटकांपासून बीजाचे रक्षण होते त्यामुळे दुबार पेरणीचे संकट वाचते. 
*पेरणी केल्यानंतर जर पाण्याची समस्या उद्भवत असेल तर आपण पिकांमध्ये अंतर मशागत केली पाहिजे अंतर मशागतीमुळे पिकामध्ये पोल म्हणजेच बाष्प टिकून राहते ज्या कॅपिलरीज बनलेल्या आहेत त्या बनलेल्या केपीलरीज या आंतरमशागतीमुळे नष्ट होतात आणि जमिनीचे बाष्प हे टिकून राहते.
*जर पाण्याची समस्या असेल तर आपण स्प्रिंकलर चा उपयोग करू शकतो त्यामुळे पाणी हे कमी लागते आणि पिकाची उगवण वरती त्याचा जास्त परिणाम होत नाही आपण जर दांडाने भुई दांडाने जर पाणी दिले तर पीक हे *पीक पेरण्यापूर्वी जमिनीमध्ये पुरुषी होल असल्यास तरच पिकाची पेरणी करावी अन्यथा जर जमिनीमध्ये ओलच नसेल तर पिकाची पेरणी करू नये त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढ होत नाही सर्वसाधारणपणे पाऊस झाल्यानंतर एक ईत भर ऑल तरी पाहिजे मगच आपण पेरणी करावी. 
*जे बीज आपण पेरणार आहोत त्याची आपण आधी उगवण क्षमता तपासली पाहिजे त्यासाठी शंभर बिया घ्यावे आणि ते  ओल्या पोत्यावरती झाकून ठेवाव्यात आणि मग आपल्याला समजेल किती वं क्षमता आहे जर 90 बियांचा अं करून झालं तर आपण समजू शकतो उगवण क्षमता ही 90% आहे आणि जर 60 बियांची उगवण झाली तर आपण म्हणू शकतो उगवण क्षमता ही 60% आहे जर बियाण्यांची उगवण क्षमता ही 70% पेक्षा जास्त असेल असेच शक्यतो बी हे पेरणीसाठी निवडावे. 
*पेरणीपूर्वी जमीन ही नांगरट केलेली असावी आणि  रोटावेटर ने  भुसभुशीत केली असावी , त्यामुळे पेरणी. यंत्र व्यवस्थित चालते. बियाणे ची नासधूस होत नाही.
*पेरणी सोबत मिश्र खते पेरू नये जर पाण्याची कमतरता असेल तर कारण जर मिश्र कधी जर तुम्ही पेरली आणि पाण्याची कमतरता असेल तर मात्र पिकाला पाणी लागेल कारण खते दिल्यानंतर पिकाची भूक वाढते पाण्याची भूक वाढते आणि त्यामुळे अजून समस्या वाढू शकते त्यामुळे दुष्काळासारखी सारखी जर परिस्थिती असेल तर मिश्र खते देणे टाळावे पेरणी करताना.

11. प्रशांत सुधाकर चौधरी,चोपडा, जळगाव
 *सुधारीत बियाणे निवड *बियाण्याची उगवण क्षमता तपासणे *बियाण्यास बीजप्रक्रिया करणे *चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये.

12. मुनीर पटेल, इचलकरंजी
Trichoderma 
Psudomonus 2kg per acre

13. संकेत लब्दे, मु. पो. कुणकेश्वर ता. देवगड जि.सिंधुदुर्ग 
सगुणा regenarative तंत्र याद्वारे दुबार पेरणी टाळता येते.
बियाणे चांगल्या प्रतीचे आणि योग्य ठिकाणाहून खरेदी करावे. पावसाचा ताण असेल तर सूक्ष्म सिंचन सोय असेल तर करावी.

14. संतोष कांबळे, तारदाळ  
100 मिली मीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करत नाही

15.सोमनाथ शंकर नाईकवाडी, मु कौडगाव पो अंबेजवलगे ता जिल्हा धाराशिव
जमिनीमध्ये पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी. बियाणे योग्य खोलीवर पेरणी करावे. बुरशीनाशक व कीटकनाशकाची बीजे प्रक्रिया करून करावी.

16. गजानन अंबादास नवले, हिवरा पूर्णा पो. आसेगाव तह. अचलपूर जिल्हा अमरावती 
पुरेसा पाऊस झाल्यानंतर योग्य त्या बियाण्याची निवड करून शासनाच्या मार्गदर्शनाने पेरणी करणार आहे.

17. सुनील कुलकर्णी, मु. पो. मेहकर, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक
*पर्याप्त पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी *अधिकृत वेधशाळेचेच पावसाचे अंदाज गृहीत धरावे *पर्याप्त ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी *बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, जेणेकरून उगवण पूर्ण टक्केवारीत होईल *अंकुर उगवणी दरम्यान लक्ष द्यावे, त्यास खरपडे,गोगलगाय अथवा पैसा सारखे किट खात असल्याने त्वरित उपाय योजना कराव्यात. *उगवणी नंतरचे पाऊस लांबल्यास शक्य तितके हळुवार पाणी पिकास द्यावे.

18. सागर आसवले
मी चागल्या पाऊस झाल्या शिवाय पेरणी करनार नाही.

19. तुकाराम क्षिरसागर, मु.पो. धौलगाव ता. वसमत जि. हिंगोली 
*70 mm पाऊस पडला असावा. *बियाची उगवणशक्ती तपासवी. *बिजपक्रिया करावी.

20. संदीप चव्हाण
दुबार पेरणी होऊ नये म्हणून   ओलावा वाफ जमिनीत. बियाणे बीज प्रक्रिया. जर्मिनेशन होईल योग्य बियाणं निवड शेत मशागत ही काळजी घेतली दुबार

21. दादासो बापू चौगुले, मु पो आनुर ता कागल जि. कोल्हापूर
*70 मिली मिटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणार कारण इतका पाऊस झाल्यानंतरच जमिनीत भरपूर ओलावा होईल आणि उगवण क्षमता नक्की  चांगली आणि खात्रीशीर होणार.

22. ओंकार लक्ष्मण पाटील, मोहोळ,जि. सोलापूर
Jaminitil oal pahun perni karavi

23. सुदर्शन जमादार, ओझरता जावडे ता. शहादा जि. नंदुरबार
*biyane ugavan xmta chek karu, te kiti,% ugavate 
*seed treatment (gaucho)& npk baktria
     & Triyco
*pratham jamini purna oalav 

24. निता सुरेश कोळी, जुने खेड ता- वाळवा जि- सांगली 
उगवण क्षमता तपासणे व बीज प्रक्रिया

25. अविनाश हेमंत सोनवाने,चिमूर ता चिमूर जिल्हा चंद्रपूर
जमिनीमध्ये 7-10 सेमी खोली पर्यंत ओलावा झाल्यावर च पेरणी बिजप्रक्रिया करून व उगवण शक्ती तपासून पेरणी करावी किंवा 75 ते 100 मी मी पाऊस झाल्यावर पेरणी करावी.

26. भगवान कृष्णाजी पाटील, टोप ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
बीज उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया 

27. विनोद पवार, देवळाली ता.जि.धाराशिव 
 पेरणी अगोदर उगवणक्षमता तपासणी,  शिफारशीनुसार बीजप्रक्रिया , प्रमाणीत बियाणे, योग्य ओल 75 mm पाऊस झाल्यानंतर पेरणी, योग्य खोलीवर पेरणी.

28. ऋषिकेश शिवाजी पाटील, सावर्डे तर्फ सातवे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर
बियाणाची उगवण क्षमता बघून बियाणे निवडणे, मायक्रोराईझा ची बीज प्रक्रिया , 70-100 मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर पेरणी, ओलावा धरून ठेवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर.

29. सुचितकुमार दिनकर शिंदे, जोंधळखिंडी ता. खानापूर जि.सांगली
*70 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्यास किंवा 6 इंचापेक्षा जास्त खोलीवरती पावसाच्या पाण्याचा ओलावा असल्यास पेरणी केली असता दुपार पेरणीची समस्या टाळता येते. 

30. सौ.सुनिता ओमकार मसकल्ले, महादेववाडी दवनहिप्परगा ता देवणी जि लातूर
१)बीज उगवण क्षमता तपासणी २) बुरशीनाशक, कीटकनाश , जैविक जीवाणूसंघाची बीजप्रक्रिया ३) ७५ते १००मि मीपाऊस झाल्यावर पेरणी ४)BBF पद्धतीने उतारास आडवी पेरणी ५) बियाणे हे योग्य खोली वर म्हणजे ४" वर पेरणी करणे इ. 

31. महादेव गायकवाड, लोनविरे सांगोला ,जि. सोलापूर
*100 mm पाउस झाल्याशिवाय पेरणी करणार नाही. *प्रमाणित बियाने *बबफ ने पेरणी *उताराला आडवी पेरणी *बिजप्रक्रिया  *जमल्यास drip इर्रीगेशन 

32. निखिल जगताप, उडतरे ता. वाई ,जि. सातारा
खरीप हंगामातील दुबार पेरणीची समस्या टाळण्यासाठी मी हवामानाचा अंदाज पाहूनच पेरणी करतो. पुरेसा पाऊस आणि जमिनीत योग्य ओलावा झाल्यानंतर पेरणी करतो. प्रमाणित व चांगल्या दर्जाचे बियाणे वापरतो. शेतात पावसाचे पाणी साठवण्यासाठी जलसंधारणाची कामे करतो आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार योग्य वाण व पेरणीची वेळ निवडतो. त्यामुळे दुबार पेरणीची शक्यता कमी होते.

33. विशाल फकीरचंद धनावत, चांडोल बुलढाणा
*योग्य वाणाची निवड *बियाची उगवण क्षमता तपासून घेणे. ८०टक्के जरमिनेशन असेल तरच बियाणे पेरावे 
*बियाची रासायनिक आणि जैविक बीज प्रकिया करून घेणे *८ इंच ओल झाल्या वरच पेरणी करावी *आणि शक्यतोवर पेरणी बी बी एफ पद्धतीने करावी.

34. अजित होऊंजे, कोथळी
जमिनीत गरजे एवढी ओल असल्यावर पेरणी करावी पेरणी नंतर पाऊस मान कमी असेल तर जमिनीची खुरपणी टाळवी.

35. कालिंदा बाबुराव सुरवसे,  आंबानगर, ता देवणी जि लातूर
बी बि एफ पद्धतीने पेरणी करणार

36. राजेंद्र बाजीराव बिरादार, रा कोनाळी पो दावनगाव ता देवणी जि लातूर
१) बियांची उगवण क्षमता तपासणी करणार. २) 100 बिया काढून त्या पोत्यावर टाकून 2 ते 3 दिवस पाहुणी करु त्यातले 70/75 टक्के बी 🌰 मोड आले तरी ते पेरणी साठी वापर करू. ३) सोयाबीन पेरणी करण्या पूर्वी बुरशी नाशक कीटक नाशक जीवाणू संवर्धन करू. 

37.बाळकृष्ण दादू आंबिलढोके, मु.पो.नंदयाळ ता.कागल जि. कोल्हापूर
जमिनीत पुरेसा ओलावा असणे अत्यंत गरजेचे आहे पेरणी करताना उगवन क्षमता चाचणी तपासुन पेरणी करावी.बीज प़क्रिया करणं हेही तितकेच महत्त्वाचे आहे.पेरणी नंबर पक्षी खाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भात पिकांमधील उत्पादन वाढीचे तंत्र । युरिया ब्रिकेटचा वापर । Paddy Farming

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest