तण नियंत्रण पद्धती | Weed Management | Weed Management Practices

*तण नियंत्रणाच्या पद्धती*



१. प्रतिबंधात्मक उपाय:-

तणांचा प्रादुर्भाव व तणांची वाढ होऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचा समावेश प्रतिबंधात्मक उपायामध्ये होतो. उदा. प्रमाणित बियाणे वापरणे, तणविरहीत बियाणे पेरणे, पीक पेरणीपूर्वी तणांचा नायनाट करणे. पूर्ण कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत वापरणे, जमिनीची पूर्व मशागत योग्य रितीने करणे, शेताचे बाध पाण्याच्या च

री/पाट व शेतातील रस्ते तण विरहीत ठेवणे इत्यादी.


२. निवारणात्मक उपाय:-

तणाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तणांची तीव्रता कमी करण्यासाठी वापरावयाच्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात.

1.भौतिक व यांत्रिक पद्धतींचा समावेश होतो. उदा. हाताने तण उपटणे, कोळपणी, खुरपणी, खांदणी, मशागत,

कापणी, छाटणी, तण क्षेत्रात पाणी साठवणे, जाळणे, आच्छादन करणे इ. 

2. स्पर्धात्मक जलद वाढणारी पिके घेणे, योग्य पीक पद्धतींचा व योग्य पेरणी पद्धतीचा अवलंब करणे, हेक्टरी रोपांची संख्या योग ठेवणे, योग्य पीक फेरपालट, आंतरपिक पद्धतीचा अवलंब करणे, खते व पाणी देण्याच्या सुधारित पद्धतीचा वापर करणे इत्यादी (बिगर खर्चिक पद्धती) माशगत पद्धती आंतर्गत येतात. 

3. जैविक पद्धतीने तणांचा बंदोबस्त करणे.


4.रासायनिक पद्धतीने तणांचा बंदोबस्त करणे.

तण व्यवस्थापनाच्या विविध पद्धती वापरून त्यांचे दिसून येणारे अपेक्षित परिणाम व विशिष्ट प्रकारच्या पद्धतीचा

अवलंब करावयाची शक्यता खालील गोष्टींवर अवलंबून असते.

 अ. तणांचा प्रकार व त्याने व्यापलेले क्षेत्र.

ब.हवामान परिस्थिती.

क. त्या विभागाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती.

ड.तण व्यवस्थापनाच्या विविध पद्धती, आर्थिक बाजू व वापरावयाच्या पद्धतीची कार्यक्षमता,


अशा अनेक बाबींचा विचार करून, तणांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यासाठी एकच पद्धत न वापरता अनेक पद्धतींची योग्य सांगड घालावी लागते. यालाच 'एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धत असे म्हणतात.


एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धत:-


१.पेरणीनंतर लगेच पीक व तणे उगवणी पूर्वी तणनाशकाची फवारणी करणे(रासायनिक पद्धत) +पेरणीनंतर १-२ कोळपण्या करणे (यांत्रिक पद्धत)+जरुरीनुसार खुरपणी करणे(यांत्रिक पद्धत)


2.पेरणीनंतर १५-२० दिवसांनी कोळपणी अथवा खुरपणी करणे (यांत्रिक पद्धत)+खुरपणीनंतर १५-२० दिवसांनी उगवलेल्या तणांवर उगवणी नंतर वापरावयाच्या तणनाशकाची फवारणी करणे. (रासायनिक पद्धत)+जरुरीनुसार मोठी तणे हाताने उपटून अथवा विळ्याने कापून काढणे (यांत्रिक पद्धत)


3.पेरणीनंतर लगेच पीक व तणे उगवणी पूर्वी तणनाशकाची फवाराणी करणे (रासायनिक पद्धत)+३०-३५ दिवसांनी उगवलेल्या तणांवर तणनाशकाची फवारणी करणे.(रासायनिक पद्धत)+जरुरीनुसार मोठी तणे हाताने

उपटून अथवा विळ्याने कापून काढणे (यांत्रिक पद्धत)

यापैकी कोणत्याही एका पद्धतीची सांगड घालून प्रभावी तण व्यवस्थापण आपण करू शकतो.

एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean