टोमॅटो ब्राऊन रोगस फ्रुट व्हायरस| Brown Rogus Fruit Virus(BRFV)| Disease of Tomato
हा टोमॅटो वर येणारा हानिकारक रोग,सर्वात पहिल्यांदा 2014 मध्ये इस्रायल मध्ये ओळखला गेला त्यानंतर युरोपियन देशांत तसेच आशियाई देशात याचा प्रादुर्भाव दिसून असला.
कारक विषाणू:-
या रोगाच्या विषाणूमध्ये,टोबॅको मोझ्याक (TMV)व टोमॅटो मोझ्याक (ToMV) या दोन्हींचे जीन्स दिसून आले त्यामुळे या विषाणूला टोमॅटो ब्राऊन रोगस फ्रुट व्हायरस(TBFRV) नाव दिले गेलं.
लक्षणे:-
१.सुरवातीस लक्षणे वरील कोवळ्या पानांवर दिसायला लागतात.
२.पानांच्या कडा आखडायला लागतात,तसेच शिरा पिवळ्या पडायला चालू होतात.
३.प्रादुर्भावग्रस्त फळावर पिवळे ठिपके पडायला चालू होतात,त्यानंतर त्यावर तपकिरी खडबडीत सुरकुत्या पडतात.
४.फळे जखमी झाले सारखी दिसायला लागतात.
५.पाणी तानाच्या वेळी किंवा कडक उन्हात ही लक्षणे तीव्रतेने दिसतात.
६.रोगाची तीव्रता व लक्षणे झाडाच्या वयानुसार थोडीफार बदलतात.
७.परिणामी बाजारभाव कमी होऊन नुकसान 30 ते 70 टक्या पर्यंत होऊ शकते.
एकात्मिक व्यवस्थापन:-
१.या रोगासाठी कोणतेही विषाणूनाशक उपलब्ध नाही,कारण दोन विषाणूंचा मिळून हा विषाणू बनलेला आहे.
२.तसेच टोमॅटोचे कोणतेही वाण यासाठी प्रतिरोधक नाही.
३.हा विषाणू काही महिने ते वर्षांपर्यंत सुप्तावस्थेत राहू शकतो, जसे की पिकाचे अवशेष,वेलीच्या तारा.
४.हा विषाणू पेशी रसातून पसरला जातो.म्हणजेच जर का शेतात काम करताना अवजाराने एखादे झाड जखमी झाले तर तिथुन हा विषाणू संक्रमित होतो.तसेच रोगग्रस्त झाडाचा पेशी रस रसशोषक किडीच्या मार्फत सुद्धा प्रसार झपाट्याने होतो.
५.तसेच बुमल माशी फुलातील रस शोषते त्यासोबत ती फुलाचे परागकण आपल्यासोबत दुसरीकडे वाहून नेते,त्यामुळे सुद्धा हा विषाणू पसरतो.
वरील गोष्टी लक्ष्यात घेता यासाठी एकात्मिक व्यवस्थापनच प्रभावी ठरू शकते.
१.पिकात काम करत असताना झाडांना अवजारांनी इजा होऊ नये याची दक्षता घेणे.
२.पीक लागवडी अगोदर निरोगी रोपांची निवड करावी.
३.या रोगाची लक्षणे दिसताच रोप शेताबाहेर पुरून टाकावे.
४.पीक पाण्याच्या तानावर जाऊ देऊ नये.
५.रसशोषक किडींच्या नियंत्रनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे लावून घ्यावेत व त्यांचा पुरेपूर बंदोबस्त करावा.
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा