कुकुरबिट मोझ्याक |cucurbit mosaic virus| Disease of watermelon

  कलिंगडावर येणाऱ्या रोगांपैकी एक म्हणजे कुकुरबिट मोझ्याक (cucurbit mosaic virus) व लीप कर्ल. यांनाच आपण आपल्या भाषेत चुराडा-मुरडा, आकड्या,बोकड्या किंवा कोकळा असे म्हणतो.



हा विषाणूजन्य रोग आहे.कुकुरबीट मोझ्याक व्हायरस या विषाणू मुळे हा रोग वेलवर्गीय फळभाज्यावर येतो.


*रोग वाहक:-पांढरी माशी🪰*

:no_entry_sign:लक्षणे:-

1.मुख्य लक्षणे पानांवर दिसू लागतात. रोगाच्या प्रादुर्भावानंतर पाने आखडायला चालू होतात.

2.पिकाची वाढ खुंटते,फुले  अवेळी गळून पडतात.

3.फळे लागण्यास सुरवात झाली असेल तर फळांची वाढ थांबते.

4.वेलीची वाढ थांबून कोवळा भाग,पाने आखडून जातात.


*:x:नियंत्रण उपाय:-*

1. रोगप्रतिकारक वाणांची लागवड करणे.

2. पिकात सुरवातीपासून पिवळे व निळे चिकट सापळे लावून पांढरी माशी नियंत्रनात ठेवावी.कारण पांढरी माशी सर्व विषाणूजन्य रोगांची वाहक म्हणून काम करते.

3. आंतरमशागत करत असताना पिकास इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

4. सुरवातीस प्रादुर्भाव कमी असताना रोगग्रस्त झाडे शेताबाहेर नष्ट करावीत.

5. तणविरहित शेत राहील याकडे लक्ष द्यावे जेणेकरून पांढरी माशीची वाढ होणार नाही.

6. ज्या पिकांवर पांढरी माशी सर्रास येते जसे की कापूस,भेंडी,मिरची,टोमॅटो अशी पिके कलिंगडासोबत घेणे टाळावे.

7. पांढरी माशी व इतर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव खूपच जास्त असेल तरच रासायनिक फवारणीचा विचार करावा.


*एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇*

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing