यल्लो वेन मोझँक। भेंडी । भेंडी पिकावरील रोग । Yellow Vain Mosaic Virus YVM

*यल्लो वेन मोझँक*

येल्लो वेन मोझँक हा भेंडी पिकावर येणार विनाशकारी विषाणूजन्य रोग आहे.ह्याचा प्रादुर्भाव होताच पानावरील शिरा पिवळ्या दिसायला लागतात.


नुकसान:-

ह्या रोगामुळे झाडाची प्रकाश संस्लेशन प्रक्रिया मंदावते,झाडांच्या सर्व अवयवांची वाढ खुंटते,फुलगळ होते तसेच आलेले फळ आहे तेवढेच राहते.

परिणामी बाजारभाव कमी होवून नुकसान 40 टक्यांपर्यंत जाऊ शकते.


प्रतिबंधक उपाय:-

या विकाशकारी रोगावर कोणतेही रासायनिक औषधे उपलब्ध नाहीत,त्यामुळे आपण शक्य तितके प्रतिबंधक उपाय करावेत.

सलग भेंडी पीक घेऊ नये,पिकाची फेरपालटनी करावी.

परभणी क्रांती, अर्का अभय, अर्का अनामिका आणि वर्षा उपर यांसारख्या प्रतिरोधक वाणांची निवड करून रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो.

रोगग्रस्त झाडे दिसताच त्वरित उपसून शेता बाहेर नष्ट करावीत.

शेतात आलेला रोग स्वतःहुन पसरत नाही,तर तो रसशोषक किडीच्या मार्फत पसरवला जातो आणि पांढरी माशी(Bemisia tabaci) ही मुख्यतः या रोगाची वाहक म्हणून काम करते.

या पांढऱ्या माशीचे आपण सुरवातीपासून नियंत्रण केले तर येल्लो वेन मोझँक पसरण्यापासून  पूर्णतः रोखु शकतो.

https://t.me/Green_Revolutions_IPM_School

आपल्याला जी बाजारात औषधे येल्लो वेन मोझँक आल्यानंतर फवारणी साठी दिली जातात,ती मुख्य म्हणजे पांढऱ्या माशीच्या नियंत्रनासाठी असतात,त्यांचा आणि मुख्य रोगाचा काहीही संबंध नसतो. जसे की ऍसिफेट किंवा इमिडोक्लाप्रिड 

:no_entry_sign:भेंडी लावल्यानंतर लगेच आपण पिवळे व निळे चिकट सापळे लावले तर पांढऱ्या माशीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते.तसेच पीक रोगग्रस्त होण्यापासून वाचते व फवारणीच्या खर्चात बचत होते.

 तरीही पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर निंबोळी अर्काची फवारणी  करून आपले पीक रसायन मुक्त ठेवू शकतो.


*एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇*

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing