कलिंगड पिकावर येणारा भुरी रोग| Powdery mildew In Cucumber| Powdery Mildew| Powdery mildew In watermelon

*कारणीभूत बुरशी*:-Podosphaera xanthi.


*यजमान पिके*:- सर्व वेलवर्गीय फळभाज्या


 *लक्षणे:-*

*पानांवर व देठावर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसून येते.

*जास्तीत जास्त जमिनीलगत असणाऱ्या पानांवर बुरशीची वाढ होते पण बाकीच्याही भागांवर लक्षणे दिसून येतात.

*जास्त आद्रतेमध्ये या रोगाची वाढ झपाट्याने होते. पांढऱ्या रंगाची बुरशी संपूर्ण पानभर पसरते.

*पानांवरील पांढऱ्या थरामुळे प्रकाश संश्लेषन प्रक्रिया मंदावते.



*रोगाचे प्रसरण:-*

*हा रोग वाऱ्याद्वारे व रसशोषक किडींच्या मार्फत पसरवला जातो.

* रोगाचे  बीजाणू वाऱ्याद्वारे उडून दुसऱ्या निरोगी रोपास रोगग्रस्त बनवू शकतात.

* लोकरी मावा सुद्धा या रोगाचा वाहक म्हणून काम करतो.

*मावा हा भुरी रोगासोबत कलिंगडावरील इतर रोगांच्या प्रसारणाचे कारण ठरू शकतो.


एकात्मिक रोग व्यवस्थापन:-

रोगप्रतिकारक वानांची लागवडीसाठी निवड करावी.

रोगाचे प्रमाण कमी असताना रोगग्रस्त पाने शेताबाहेर नष्ट करावीत.

दोन रोपांमध्ये योग्य अंतर ठेवावे.त्यामुळे रोगप्रसारण वेगाने होणार नाही.

शेतातील तण व्यवस्थापण गरजेचे आहे.

रसशोषक किडींच्या नियंत्रनासाठी सुरवातीपासून पिवळे निळे चिकट सापळे लावून घ्यावेत. त्यामुळे कीड व रोगप्रसार होन्यास आळा बसेल.

नुकसान आर्थिक उंबरठा पातळीच्या पुढे जात असेल तेव्हाच रासायनिक फवारणीचा विचार करावा.

कोणतेही कॉपरयुक्त किंवा सल्फरयुक्त बुरशीनाशक भुरीचे व्यवस्थापन चांगल्या रीतीने करू शकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean