हरभरा पीक । घाटेअळी नियंत्रण। घाटेअळी एकात्मिक व्यवस्थापन । Pod Borer in Chick Pea
🏫IPM SCHOOL🌱
दि 26 डिसेंबर 2023
प्रश्न क्र.56 हरभरा पिकामधील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय काय करता?
उत्तर:-
शेतकरी मित्रहो,
हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पिकात सुरवातीपासून घाटे भरण्याच्या अवस्थेपर्यंत घाटेअळीचा प्रादुर्भाव हमखास दिसून येतो. त्यासाठी सुरवातीपासून उपायोजना करणे अतिशय महत्वाचे आहे. यासोबत या घाटेअळीचे जीवनचक्र अभ्यासणे गरजेचे आहे, कारण या किडीची प्रादुर्भाव तीव्रता ३०-५० टक्क्यापर्यन्त असू शकते.
हि कीड हरभऱ्याव्यतिरिक्त टोमटो,तूर, सोयाबीन, कापूस, मिरची, मक्का, वाटाणा, भेंडी या पिकावर सुद्धा प्रादुर्भाव करू शकते.
*आर्थिक नुकसान संकेत पातळी:-* सरासरी १ अळी प्रति मीटर ओळीत किंवा ५ टक्के घाट्यांचे नुकसान
*जीवनचक्र:-*
किडीचे जीवनचक्र वातावरणानुसार ३०-४५ दिवसात पूर्ण होते. तसेच पतंग-अंडी-अळी-कोष या चार अवस्थतेतून पुढे जाते.
*पतंगावस्था:-* पतंग दुधी राखाडी रंगाचे असतात, हे पतंग कोवळ्या शेंड्यावर फुलावर अंडी देतात. पतंग ७-१२ दिवसात पतंगावस्था पूर्ण होते. मादी पतंग नर पतंगापेक्षा अधिक काळ जिवंत असतो.
*अंडी अवस्था:-* हि अंडी पिवळसर रंगाची असतात व पानांवर सुटी सुटी दिली जातात. दोन ते पाच दिवसात या अंड्यातून अळ्या बाहेर पडतात.
*अळी अवस्था:-* पिकाचे प्रामुख्याने नुकसान करणारी हि अळी अवस्था. अळी सुरवातीच्या काळात पाने खरवडते. अळीचा रंग पिकाच्या अवस्थेनुसार बदलतो. हरभरा पिकात अळीचा रंग हिरवा दिसून येतो. ४ वेळेस कात टाकून अळी मोठी होते. अळी अवस्था १० - २१ दिवसापर्यंत पिकात सक्रिय असते.
*कोषावस्था:-* ४ वेळेस कात टाकून अळी मातीमध्ये,पाल्यापाचोळ्यात कोषावस्थेत जाते. कोश तपकिरी रंगाचा असतो. या कोषातून आठवड्याभरात पतंग बाहेर पडतात.
*प्रादुर्भाव लक्षणे:-* अळीचा प्रादुर्भाव पानावर फुलांवर व घाट्यावर दिसून येतो. पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळी पाने खरवडते. त्यानंतर घाटे खायला सुरवात करते. अळी घाट्यात तोंड खुपसून आतील भाग खाते. उर्वरित शरीर घाट्याच्या बाहेर दिसते. घाटे खाल्यामुळे पीक भरत नाही. फुलगळ होते. पाने खाल्ल्यामुळे फक्त देठाचा भाग शिल्लक राहतो. प्रादुर्भावामुळे नुकसान ३० -५० % पर्यंत होऊ शकतो.
*एकात्मिक व्यवस्थापन:-*
या किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनाची अंमलबजावणी सुरवातीपासून करावी. त्यामुळे किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या नेहमी खाली राहील. त्यासाठी खालील बाबींचे पालन करावे.
*उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यामुळे किडीचे कोष नष्ट होतात.
*पिकावर घाटेअळीच्या नियंत्रणासाठी तिचे नैसर्गिक शत्रू जसे क्रायसोपा, लेड़ी बर्ड बीटल व रेड्युहीड़ ढेकूण यांची संख्या वाढण्यासाठी झेंडू किंवा कोथिम्बिरीचे आंतरपीक घ्यावे.
*तसेच घाटेअळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पक्षी पिकात येण्यासाठी शैतामध्ये पक्षी थांबे उभारावेत (प्रतिएकरी २० पक्षी थांबे).
एकरी ८-१० हेलिको ल्युर व फनेल ट्रॅप पिकाच्या सुरवातीपासून उभे करावेत.
*शेतक-यांनी पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर सर्वप्रथम वनस्पतिजन्य किंवा जैविक कीटकनाशकांना प्राधान्य द्यावे. त्यासाठी पहिली फवारणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ऑझंड़ीरेंक्टीन 300 पीपीएम ५0 मिलि. प्रति 10 लिटर पाणी किंवा
खालील कोणत्याही एका कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून साध्या (नॅपसॅक) पंपाने फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी. क्रेिनॉलफॉस २० टक्के प्रवाही २० मिलिं. , इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ३ ग्रॅम, डेल्टामेश्रीन २.८ टक्के प्रवाही १० मिलेि., लॅमडा साथहॅलोमेश्रीन ५ टक्के प्रचाही १० मिलेि., क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही २.५ मिलि
*अळ्या दिसू लागताच घाटेअळीचा विषाणू एचएनपीव्ही हेक्टरी ५०० एल.ई ५० ग्रॅम राणीपाल किंवा वातावरणात सापेक्ष आर्द्रता पुरेशी असल्यास व्यूहेरीया बॅसीयांना या जैविक बुरशीनाशक ६० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे कराची. त्यामुळे घाटेअळीचे नियंत्रण होऊन तिच्या नैसर्गिक शत्रू कीटकांना अपाय न होता त्यांचीसुद्धा घाटेअळीचे नियंत्रण करण्यास मदत होईल.
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*
🌱महादू विष्णू काकडे,जालना
🌱प्रतीक येवले,नाशिक
🌱प्रशांत बागल,सोलापूर
🌱सागर सोनावणे,नाशिक
🌱बाळकृष्ण अंबिलढोके, कोल्हापूर
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#घाटेअळी #heli #podborer #chana #chickpea #farming #pestmanagement #gogreen #pestmanagement #farmingtips #organicfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा