पेरू पिकामध्ये किडीच्या प्रादुर्भाव | Insect infestation in guava crop

 





पेरू हे एक बागायती पीक आहे ते देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक बागायती शेतीमध्ये तसेच डोंगर भागातही शेतकरी पेरूची लागवड करतात. पेरूला विविध बाजारपेठांमध्ये नेहमीच मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळू शकतो.
  कोणत्याही पिकातून चांगला नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्याने पिकातील कीड व रोगांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. चांगल्या प्रकारे किड व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याला पिकामध्ये कोणत्या किडी येतात हे माहित असणे महत्वाचे आहे, तरच शेतकरी पिकाच्या सुरुवातीपासून किडीचे चांगले व्यवस्थापन करू शकतो आणि चांगले उत्पादन घेऊ शकतो. तर आज जाणून घेऊयात पेरू फळबागेमध्ये कोणत्या किडी पिकाचे नुकसान करू शकतात.

पेरू फळबागेमधे येणाऱ्या किडी:-
फळमाशी:-
फळमाशी हि पेरू उत्पादनातील सर्वात नुकसानदायक कीड आहे. पेरूच्या फळांवर अनेक फळमाशांचे प्रादुर्भाव होतो.
     फळमाशीची मादी फळांना छिद्रे पाडतात आणि सालाखाली अंडी घालतात. अंड्यातून बाहेर येणारे मॅगोट्स फळाचा आतील भाग खातात. आंबा काढणीनंतर या किडीचा परिणाम मोठ्या प्रमाणात असतो. हि किड जुलै-ऑगस्टमध्ये जास्त प्रमाणात वातावरणात उपलब्ध असतात आणि त्याचा प्रादुर्भाव पेरूच्या फळबागेवर होतो. या किडीमुळे फळांचे मोठे नुकसान होऊ शकते.

फळ पोखरणारी कीड:-
    नर पतंग चमकदार निळसर रंगाचा असतो आणि मादी पतंग तपकिरी रंगाची असते आणि त्याच्या पुढच्या पंखांवर नारिंगी ठिपका असतो. नवीन कोवळ्या फळे आणि फुलांवर अंडी घातली जातात, अंड्यातून बाहेर पडलेली अळी फळे पोखरून खातात आणि फळे खराब करतात. अळी गडद तपकिरी रंगाची असते आणि संपूर्ण शरीरावर लहान केस आणि पांढरे ठिपके असतात. अळी कधी कधी फळांमध्ये किंवा मातीमध्ये कोषावस्थेत जातात. कोष अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्यामधून पतंग बाहेर येतो. सर्वसाधारण एका वर्षात किडीच्या चार पिढ्या पूर्ण होतात.
   अळी फळात शिरून आतील मऊ भाग खाते त्यामुळे फळांवर गोल छिद्रे दिसतात. किडीने नुकसान केलेल्या फळांवर बुरशीचा देखील प्रादुर्भाव होतो. शेवटी फळे गळून खाली पडतात आणि अश्या फळामधून एक विशिष्ट दुर्गंध येतो.

पिठ्या ढेकूण:-
या किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या दिवसांपासून पेरूवर दिसून येतो. किडीची लहान पिल्ले आणि प्रौढ दोघेही पानांच्या खालच्या बाजूला, कोवळ्या पानांवर आणि फळावर दिसून येतात आणि त्यामधून रस शोषतात, परिणामी पाने आकसलेली आणि पिवळी पडलेली दिसतात.
    प्रौढ मादी गुलाबी रंगाच्या असतात आणि पांढर्‍या मेणासारख्या थराने त्यांचे शरीर झाकलेले असते. सर्वसाधारणपणे दर महिन्यामध्ये एक पिढी पूर्ण होते, परंतु हिवाळ्याच्या दिवसामध्ये जीवन चक्र लवकर पूर्ण होते.

सूत्रकृमी:-
 गेल्या एक-दोन वर्षात पेरूच्या बागांमध्ये सूत्रकृमी आणि झाड सुकणे या रोगाचा प्रादुर्भाव बहुतांशी बागांमध्ये दिसून येत असल्याने पेरूची झाडे सोकलेली दिसतात. रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाडांची पाने हलकी व पिवळी दिसतात. पाने गळायला लागतात, झाडांची वाढ थांबते आणि झाडे सुकतात आणि झाडे काढल्यावर झाडाच्या मुळांमध्ये गाठी दिसतात.

गोलाकार वर्तुळे करणारी पांढरी माशी (स्पायरलिंग व्हाइट फ्लाई):- 
प्रौढ पांढऱ्या माशीचा रंग पांढरा असतो आणि त्यांच्या शरीरावर मेणाचा लेप असतो. डोळे गडद लालसर तपकिरी आहेत. समोरच्या पंखांना तीन विशिष्ट ठिपके असतात. अंडी पानांच्या खालच्या पृष्ठभागावर गोलाकार आकारामध्ये घातली जातात. अंड्याचा कालावधी 5-8 दिवसांचा असतो. पिल्ले अवस्था 22-30 दिवस आहे. प्रौढ 13-21 दिवस साधारणपणे जगतात. किडीचे संपूर्ण जीवनचक्र 40-50 दिवसात पूर्ण होते.
     प्रौढ आणि लहान पिल्ले पानांच्या खालच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात जमतात आणि रस शोषतात. यामुळे आकसलेली पान गळणे, पिवळे ठिपके, आकुंचन आणि कुरळी होतात. रस शोषल्यानंतर किड मधासारखा स्राव पाठीमागे सोडतात आणि त्यावर काजळीसारखी बुरशी वाढते.

झाडाची साल खाणारी अळी:-
हि किड प्रामुख्याने लहान झाडांवर हल्ला करते. अळी देठावर किंवा फांद्याजवळ छिद्र करून नागमोडे बोगदे बनवते आणि सालीच्या आत राहून उपजीविका करते. अळ्या दिवसा छिद्राच्या आत लपून राहुन रात्री बाहेर पडतात आणि रात्रीच्या वेळी सालीमधील हिरवा भाग खातात. अळ्यांच्या जाळया आणि विष्ठा खोड/फांद्यावर स्पष्ट दिसतात. कधीकधी, प्रादुर्भावग्रस्त फांद्या वाऱ्यामुळे मोडून सुद्धा पडतात. सामान्यपणे, प्रादुर्भाव जुन्या झाडांमध्ये जास्त आढळतो.
      या किडींबरोबरच काही वेळा टी-मॉस्किटो बग या किडीचाही प्रादुर्भाव फळांवर दिसून येतो, त्यामुळेही पिकाचे नुकसान होऊ शकते. साधारणपणे या किडी पिकांमध्ये आढळतात आणि यांसोबतच विविध राज्यांमध्ये इतर विविध कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे या किडींचा विचार करून शेतकरी किडीचे व्यवस्थापन करून चांगले उत्पादन आणू शकतो.
स्रोत-इंटरनेट


*उत्तर देणारे शेतकरी मित्र:-*
🌱विजय साठे, सातारा.
🌱महादू विष्नु काकडे, जालना. 
🌱 प्रशांत बागल सोलापूर. 
🌱विकास धुमाळ बेकनाळ ,गडहींग्लज. 
🌱स्वप्नील महाजन, चिखली बुलढाणा.
🌱ओमकार मस्के 
🌱अनिल थोरात नाशिक 
🌱बाळकृष्ण आंबिलढुके, कोल्हापूर
*🙏उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*

एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean