कांदा पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन| Integrated Pest Management in Onion


 या रब्बी हंगामात शेतकरी वेगवेगळी पिके घेत आहेत. साधारणत: वांगी, टोमॅटो, खरबूज, काकडी बरोबरच गहू, कांदा, लसूण यासारखी पिकेही घेतली जातात. भाजीपाल्यासोबत वेगवेगळ्या फळांचा देखील हा हंगाम आहे ज्यातून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.

  या हंगामात अनेक भागात कांदा पिकाची लागवड केली जाते. त्यात मुख्य म्हणजे पुणे भागातील नारायणगाव आणि नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मध्ये कांदा पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तसेच इतर भरपूर भागात कांद्याचे पीक कमी अधिक प्रमाणावर घेतले जाते. पिकावर इतर कीड जास्त प्रमाणात दिसत नाही पण थ्रिप्स (फुलकिडे)चा प्रादुर्भाव दिसून येतो. मात्र विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होत आहे. तर आज आपण जाणून घेऊया कांदा पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे.


कांद्यामध्ये एकात्मिक किड व्यवस्थापन:-

* शेताची चांगली नांगरणी करावी जेणेकरून जमिनीतील किडींच्या वेगवेगळ्या अवस्था नष्ट होतील.

* शेतात उरलेले जुने पिकांचे अवशेष नष्ट करा.

* सर्व पिकांप्रमाणेच वेळेवर पेरणी करा.

* रोपलागण करताना दोन रोपांमध्ये योग्य अंतर ठेवा.

* लावणी करताना झाडांची मुळे कार्बेनडेंझीमच्या द्रावणात बुडवा.

* रोपांची लागवड करताना किडी व रोगांची तपासणी केल्यानंतरच रोपांचे रोपलागण करावे.

* एकाच शेतात एकच पीक पुन्हा पुन्हा घेऊ नका कारण किडीचे जीवनचक्र तिथेच पूर्ण होते आणि किडीचा प्रादुर्भाव पिकावर वाढू शकतो.

* ज्या शेतात कांद्याची लागवड करणार आहात अश्या शेतात इतर पिकासोबत पिकाची फेरपालट करावी.

* थ्रीप्सच्या व्यवस्थापनासाठी कोरड्या वातावरणात 2-6 आठवड्यांच्या अंतराने कांद्याची लागवड करावी जेणेकरून थ्रिप्सचे जीवनचक्र नियंत्रित करता येईल.

* थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्प्रिंकलर म्हणजेच तुषार सिंचनाचाही वापर केला जाऊ शकतो.

* थ्रिप्सचे व्यवस्थापन करण्यासाठी थ्रीप्स ल्यूर आणि ब्लू स्टिकी ट्रॅप 70 - 80 प्रति एकर लावा.

* जिथे जिथे कांदा बियाणे उत्पादन घेतले जाते तिथे बिया खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी हेलिको ल्यूर आणि फनेल ट्रॅप 10 ते 12 प्रति एकर शेतात लावा.

* बिया खाणाऱ्या अळी दिसल्यावर HANPV विषाणूची फवारणी करा.

* पिकाच्या सुरुवातीपासून 15 दिवसांच्या अंतराने निंबोळी तेलाची फवारणी करावी.

* जेव्हा किड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जाईल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करा.

* थ्रिप्सचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रोफेनोफोस किंवा फिप्रोनिल किंवा स्पिनोसॅड या  रासायनिक कीटकनाशकांची फवारणी आलटून पालटून करा.

* ओनियन मॅगॉट म्हणजेच कांद्यामध्ये होणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी, रोपलागणीच्या वेळी क्लोरपायरीफॉस 3-4 लीटर/हेक्टर आळवणी केल्यास 9 आठवडेपर्यंत किडीचे नियंत्रण मिळू शकते. किंवा लागवडीपूर्वी फोरेट 10 जी 1 किलो/हेक्‍टरी या दराने जमिनीत टाकल्यास या किडीचे नियंत्रण करता येते.

   सुरुवातीपासून एकात्मिक किड व्यवस्थापन या पद्धतींचा वापर करून जर गरज असेल किंवा कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तरच रासायनिक कीड नियंत्रणाचा वापर करा तरच शेतकरी मित्र किडी चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

स्रोत-ICAR


*उत्तर देणारे शेतकरी मित्र:-*

🌱महादू विष्नु काकडे, जालना. 

*🙏उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*

एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean