गांडूळ खत | Benefits of Compost | वापरण्याचे फायदे |

 🏫IPM SCHOOL🌱




  शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे कारण वर्षांनुवर्षे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. जमीन सुपीक ठेवण्यासाठी आपण शेतीमध्ये रासायनिक खतांचा, औषधांचा वापर मर्यादित करणे त्याचबरोबर जमीन सुपीक ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमध्ये आपण गांडूळ खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो, म्हणूनच त्यामध्ये असणारे घटक आणि त्यांचा वापर शेतीसाठी कसा फायदेशीर ठरू शकतो. 


गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण हे ४० ते ५० टक्के असते. या मध्ये ४०  ते ५७ टक्के कार्बन, ४ ते ८ टक्के हायड्रोजन, ३३  ते ५४  टक्के ऑक्सिजन, ०.७  ते पाच टक्के सल्फर व दोन ते पाच टक्के नत्र असते. गांडूळ खतामध्ये मोनोसॅक्रेईडीस, पॉलिसॅकॅराइड्स यासारखी पिष्टमय पदार्थ असतात. अमिनो आम्ले व प्रथिने, स्निग्ध पदार्थ, न्यूक्लिक ॲसिड व ह्युमसचे प्रमाण सर्वाधिक असते व ते पिकांना उपयोगी ठरते.

 गांडुळ कंपोस्ट हे एक सेंद्रिय खत आहे जे माती, शेण, तण, कोरडी पाने, फळे आणि भाज्यांच्या साली आणि गांडुळांपासून तयार केले जाते. गांडूळ खतामध्ये  ०.८ टक्के नत्र, ५७ टक्के स्फुरद. १ टक्के पालाश तसेच मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरॉन यासारखी सूक्ष्म द्रव्य मोठ्या प्रमाणात असतात. गांडूळाच्या विष्टेत नत्राचे प्रमाण जमिनीच्या पाच पटीने जास्त असते. स्फुरदचे प्रमाण व जमिनीच्या सात पट असते तसेच पालाशचे प्रमाण अकरा पटीने जास्त असते आणि हे घटक सगळ्या प्रकारच्या पिकांना आवश्यक आहे व गांडूळ खताच्या वापरामुळे ते पिकांना सहजासहजी उपलब्ध होतात.


  गांडूळ खत वापराचे फायदे


* गांडूळ खत वापरल्यामुळे जमिनीचा पोत चांगला प्रमाणे सुधारतो.

* मुळ्या अथवा झाडांना कुठल्याही प्रकारची इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.  त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.

* जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

* गांडूळ खत वापरल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन फार कमी प्रमाणात होते.

* जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो.

* गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.

* गांडूळ खत वापरामुळे उपयुक्त जिवाणूंच्या संख्येमध्ये वाढ होऊन खते व पाण्याच्या खर्चात बचत होते.

* झाडाची निरोगी वाढ होऊन किडींना व रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

* अगदी कमी खर्चात ते सहज तयार करता येते.

* शेणखत आणि इतर कंपोस्ट खताच्या तुलनेत नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅश हे गांडूळ खतामध्ये जास्त प्रमाणात आढळतात.

* याच्या वापरामुळे पिकाची वाढ चांगली होऊन चांगले उत्पन्न मिळते. 

   गांडूळ खत वापरल्यामुळे शेती मध्ये जिवाणूंची संख्या वाढते, मातीचा पॉट सुधारतो आणि चांगले उत्पादन देखील मिळते. त्यामुळे भरमसाट किमतीची रासायनिक खते वापरून जमिनीची उत्पादकता बिघडवण्यापेक्षा गांडूळ खताचा वापर करून जमिनीचे आरोग्य टिकवून ठेऊ शकते आणि होणार खर्चही टाळू शकतो. 

संदर्भ-इंटरनेट 



एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy