धान्य साठवणूक | Important things for Store Grains | काळजी |

 🏫IPM SCHOOL🌱




अन्नधान्याची मळणी केल्यानंतर किंवा वर्हसभरासाठी लागणारे धान्य खरेदी केल्यानंतर योग्य पद्धतींनी साठवणे गरजेचे आहे. शेतकरी घरासाठी लागणारे धान्य साठवून ठेवतात. परंतु घरामध्ये बऱ्याचदा साठवलेल्या धान्यांमध्ये किडे किंवा बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आढळतो. हवेतील आद्रता किंवा हवामान बदल, जागेची अस्वच्छता,साठवणुकीची पद्धत,धान्य नासाडी करणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त यामुळे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. तेव्हा साठवणुकीतील धान्य खराब होऊ नयेत यासाठी सोप्या आणि आरोग्याला नुकसान न पोचवणाऱ्या पध्दती उपयोग करणे गरजेचे आहे. 


 *प्रतिबंधात्मक उपाय:-*

* मळणीपूर्वी धान्य स्वच्छ करून घ्यावे. धान्य मळणी करण्याची जागा स्वच्छ, किडींपासून मुक्त असावी.तसेच लोकवस्ती व धान्य साठवणीपासून ती जागा दूर असावी. मळणी केल्यानंतर दाणे चांगले वाळवावेत. 

* कोठ्या सूर्यप्रकाशात ठेवून स्वच्छ करून वापराव्यात.

* गोदामात असलेली बिळे सिमेंटने बुजवून घ्यावीत. जेणेकरून उंदीर गोदामात पोहोचू शकणार नाही.

* धान्य साठवणुकीची जागा निर्जंतुक करण्यासाठी Malathion 50 टक्के प्रवाही 10 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकता. 

* धान्य साठवणीमध्ये धान्याची पोती जमिनीवर साठवू नयेत. धान्यास ओलावा लागणार नाही, याची काळजी घ्यावी.

* पावसाळ्यात धान्य हवाबंद ठेवावे.

* साठवणुकीसाठी आधुनिक आणि सुधारित कोठ्या वापराव्यात.

* धान्य साठवणीची जागा व आजूबाजूचा परिसर झाडून, धुवून स्वछ करावा. सर्व काडीकचरा जाळून नष्ट करावा.

* धान्य वाळवणे:- धान्य कडक उन्हात वाळवून, धान्यातील आर्द्रता १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याची खात्री करूनच साठवण करावी. 

* पोती साठवणूक करताना जमिनीपासून योग्य उंचीवर करावी.

* उधळणी किंवा चाळणी करणे- साठवणीपूर्वी व साठवणीच्या काळात शक्य तितक्या वेळेस किडलेले खराब दाणे चाळणी व उधळणीद्वारे वेगळे करून घ्यावे.

* गोदामातील कीड नियंत्रण करिता धुरिजन्य कीटकनाशकांचा वापर करावा.

* उघड्या धान्यावर कीडनाशके फवारू नये.

* धान्य साठवणूक साठी नवीन गोणपटे किंवा पोते वापरावी.

* पावसाळ्यात धान्य हवाबंद जागी ठेवावे. तसेच पावसाचे पाणी लागून धान्य खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.

* उन्हाळ्यात धान्याला मोकळी हवा मिळेल अश्या ठिकाणी ठेवावे.

* धान्याची पोती भिंतीपासून थोडी दूर ठेवावी.

* धान्य साठवणूक करताना कडुनिंबाचा पाला, बियांची पावडर वापरू शकता.

* मोहरी तेल, तीळ तेल, जवस तेल, एरंडेल तेल इत्यादी पैकी कोणत्याही एका खाण्यायोग्य वनस्पती तेलाचा वापर धान्याचे किडीपासून संरक्षण करण्याकरता केला जाऊ शकतो. त्यासाठी धान्य चांगले वाळल्यानंतर तेलाच्या उपलब्धतेनुसार एक क्विंटल कडधान्याला किंवा डाळीला 500 मिली तेल मिसळून चोळावे व असे धान्य पोत्यात, मडक्यात किंवा कनगीत साठवावे.

* धान्यामध्ये सेलफॉस चा वापर केल्यानेही धान्य कीडत नाही. 

   धान्याची साठवणूक करताना या काही महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घेण्याची घेतल्यास धान्य चांगले राहुन किडीच्या प्रादुर्भावामुळे खराब होणार नाही. 



एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean