लिंबू । झाडाच्या फांद्या वाळणे । कारणे आणि उपाय ।
🏫IPM SCHOOL🌱
लिंबूच्या झाडावर फांदी वाळण्याचा प्रादुर्भाव माल सेको (खपलीची बुरशी) (Phoma tracheiphila) या बुरशीमुळे दिसून येतो.
लक्षणे
लक्षणे सुरुवातीला एकट्या फांदीवर किंवा भागात दिसतात आणि जर वेळीच उपाय केले नाहीत तर पूर्ण झाडावर पसरु शकतात आणि त्यामुळे झाड वाळू शकते. पहिले लक्षण वसंत ऋतुमध्ये कोंब आणि पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो व कालांतराने फांद्या वाळू लागतात. मरगळलेल्या फांद्यांवर उंचवटलेले काळे पुटकुळे किंवा राखेसारख्या राखाडी रंगाचे भाग दिसल्यास ते डाग बीजाणूच्या पुंजक्यांचे असतात. मोड आणि मुनवे अनुक्रमे संक्रमित फांद्याच्या व मातृवृक्षाच्या मुळाशी वाढणे हि लक्षणे यजमान पिकात सामान्यपणे आढळतात. जर संक्रमित फांद्या किंवा खोडाचे लाकुड कापले किंवा साल काढली तर लाकडात वैशिष्ट्यपूर्ण केसर-गुलाबी किंवा नारंगी-लाल रंगहीनता दिसते. ही अंतर्गत लक्षणे या शिरातुन पाझरलेल्या चिकट द्रावाशी संबंधित आहेत.
पान, फांद्या आणि मुळांतील जखमेतुन ही बुरशी आत शिरकाव करते. बीजाणू पाणीजन्य मानले जातात. बुरशी चार महिन्यांपेक्षा अधिक काळ मातीमध्ये संक्रमित फांद्यात टिकून राहू शकते. अनेक आठवड्यांपर्यंत संक्रमणाचा हा महत्वाचा स्त्रोत असु शकतो. झाडावरुन आणि पालापाचोळ्यातुन बीजाणू पावसाच्या उडणाऱ्या पाण्यामुळे आणि तुषार सिंचनामुळे पसरतात. काही बीजाणू वाऱ्याबरोबरही वाहुन जातात. बुरशीचे वहन स्त्रोतापासुन बहुधा १५-२० मी असे लहान अंतरावरच होते. तरीपण वाहत्या वाऱ्याच्या दिशेने वहन होत असल्यास हे अंतर थोडे जास्त होऊ शकते. १४ ते २८ डिग्री सेल्शियस तापमानात ज्यातही जास्त करुन २०-२५ डिग्री सेल्शियस तापमान स्थिर राहिल्यास या बुरशीची लागण होते.
प्रतिबंधक उपाय
* प्रमाणित बियाणेच वापरा.
* आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणांची निवड करा.
* जिथे हा रोग सामान्यपणे होतो त्या भागातील रोपवाटिकेची रोपे वापरु नका.
* पहिले लक्षण दिसताक्षणी झाडाची छाटणी करा.
* बागेचे नियमित निरीक्षण करा आणि संक्रमित झाड पाळामुळांसकट उपटून लगेच नष्ट करा.
* शेतात काम करताना झाडाला इजा होऊ नये याची काळजी घ्या.
जैविक नियंत्रण
कॉपरवर आधारीत बुरशीनाशकांचा वापर याविरुद्ध केला जाऊ शकतो. संवेदनशील काळ म्हणजे शरद ऋतुपासुन ते वसंत ऋतुपर्यंत संरक्षक कॉपर बुरशीनाशके वारंवार झाडावर वापरली गेली पाहिजे. स्युडोमोनास जिवाणू उदा. स्युडोमोनाज फ्ल्युरोसन्स आणि स्युडोमोनाज प्युटिडा जे मूळ पसरणाऱ्या भागात राहतात, ते फोमा ट्रेचिफिलाच्या वाढीस नियंत्रित करतात.
रासायनिक नियंत्रण
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. झायरम (झिंक डाय मिथिल डाय कार्बामेट) चिर आधारीत उत्पाद फोमा ट्राचिफिलाच्या नियंत्रणात अतिशय परिणामकारक आहेत. कार्बोक्झिन आणि बेन्झिमिडॅझॉल सारखे आंतरप्रवाही औषधे देखील प्रतिबंधक उपचार म्हणुन परिणामकारक आहेत. गोठणारे तापमान, गारपिट किंवा वादळ ज्यामुळे झाडाला जखमा होऊ शकतात, अशा हवामानानंतर संरक्षक आणि आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या वापरु शकतो.
संदर्भ-प्लांटिक्स
एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवनवीन अपडेट्स साठी सामील व्हा..👇
https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा