पिठ्या ढेकूण | Mealy Bug | व्यवस्थापन |

 🏫IPM SCHOOL🌱




मिलीबग (पिठ्या ढेकूण) 


मिलीबग(पिठ्या ढेकूण) ही फळ बागेवर येणाऱ्या प्रमुख कीडींपैकी एक होय.मिलीबगची  कीड आणि तिची पिल्ले आंब्याच्या तसेच इतर फळामधून आणि फळांच्या देठामधून रस शोषून घेतात. 


जीवनक्रम:-

मिलीबगचे प्रजनन नर मादीच्या मिलनातून होते. तसेच मादी(पार्थीनो जेनेटीकल)या प्रकारातील असून मिलनाशिवाय देखील अंडी घालते. कीडींची एक पिढी पूर्ण होण्यासाठी २५ ते३० दिवसांचा कालावधी लागतो.एका मादीच्या जीवनचक्रामध्ये  १५० ते ४०० अंडी कापसासारख्या कवचात टाकुन त्यापासून पुढे ८ ते१० दिवसांत पुन्हा पिलं जन्माला येतात तर प्रतिकुल परिस्थीतीमध्ये कीड एक पिढी पुर्ण करण्यासाठी ४० दिवसही घेते. मिलीबग हे प्रतिकूल परिस्थितीत जमिनीत सुप्तावस्था पुर्ण करतात.


नुकसान:-

सद्यस्थितीमध्ये खोडाच्या मोकळ्या सालीत अंडीपुंजासह मिलीबग आढळत आहेत.आंब्यात प्रामुख्याने देठाजवळ किडींचा प्रादुर्भाव दिसुन येतो तर सिताफळामध्ये हि किड खोडातून व फळातून रस शोषन करते. ऊसामध्ये ही किड खोडातुनच रस शोषण करते, ज्याने साखरेचे प्रमाण कमी होते.


हया किडींच्या शरीरातुन व रस शोषन केल्यामुळे पानातुन चिकट मधासारखा पदार्थ बाहेर पडतो.या स्रावावर आर्द्रतायुक्त वातावरणात कॅप्नोडियम ही काळी बुरशी (काजळी) वाढते. त्यावर बुरशीचा विकास होवुन झाड काळवंडते. यामुळे झाडाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत अवरोध निर्माण होतो व झाडाची वाढ खुटते. हया पदार्थावर आवर्जुन मुंग्यांची संख्या वाढते व हया किडीला एका झाडावरून दुस-या झाडावर पसरण्यात मदत होते.


नियंत्रण:- 

  • * ऊन्हाळ्यात खोलवर नांगरणी केल्याने जमिन तापुन त्यामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या किडींच्या अवस्थांचा नाश होतो.
  • * शक्य असल्यास किड प्रतिकारक जातींची निवड करावी.. 
  • * ऊसात प्रादुर्भावग्रस्त बेणे वापरल्याने किडीचा उपद्रव वाढतो, त्यासाठी ऊस लागवडीपूर्वी बेण्याला मेलाथियोन ( ५० मि.ली/१० लि. पाणी) बेणे प्रक्रीयेसाठी वापरावे.
  • * ऊसातील खोड किडीच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणा-या कार्बोफ्युरॉन ३ टक्के दाणेदार औषधाने सुध्दा हया किडीचे नियंत्रण होते.
  • * ही किड अनेक तणांवर गुजराण करते. त्यासाठी शेतातुन व बांधावर अशा तणांचा बंदोबस्त करावा.
  • * आंब्याच्या बागेत झाडांच्या खोडाजवळील जमिनीत खड्डा केल्याने तेथील किडींच्या अंडी व पिल्ले या अवस्थांचा नाश होतो. मेलाथियोन ( ५० मि.ली/१० लि. पाणी)
  • * डिसेंबर-जानेवारी महिन्यात फळझाडाच्या खोडाजवळ मिथाईल पराधियोन २ टक्के भुकटी (२५ ग्रॅम प्रति झाड) धुरळावी. 
  • * झाडाला जमिनीपासुन २ ते ३ फुट उंचीपर्यंत ग्रीस किंवा चिकट पदार्थ किंवा पॉलिथीनचा ३० ते ५० से.मी चा पट्टा केल्यास किडीच्या पिल्लांना झाडावर चढणे शक्य होत नाही.
  • * शेतातील मुंग्यांची वारूळे शोधुन त्यात क्लोरोपायरीफॉस २० टक्के ई.सी. चे प्रभावी मिश्रण (२५ मि.ली/१० लि. पाणी) ओतुन मुंग्यांचा नाश करावा.
  • * किडीचा उपद्रव जास्त प्रमाणात आढळून आल्यास खालील पैकी कोणतेही एक किटकनाशक फवारावे. ईमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एस.एल.-६ मि.ली/१० लि. पाणी किंवा सिफेट ७५ टक्के एस.पी.- २० ग्रॅम / १० लि. पाणी किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के ई.सी- २० मिली/१० लि. पाणी किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के ई.सी-१५ मिली/१० लि. पाणी किंवा थायोडीकार्य  ७५ टक्के वे. पा- १५ ग्रॅम/ १० लि. पाणी किंवा क्विनॉल्फॉस २५ टक्के ई. सी. २० मिली / १० लि. पाणी अशा १० लि. च्या मिश्रणात १० ग्रॅम डिटरजंट पाऊडर टाकल्यास योग्य व त्वरीत नियंत्रण मिळते. कोणत्याही एकाच किटकनाशकाचा वापर पुन्हा पुन्हा करू नये, त्यामुळे किडीची प्रतिकारक क्षमता वाढते.



एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean